Thursday, January 28, 2010

इत्छापुर्ती





हा प्रश्न मी अनेकांना विचारला आहे,  माझ्या मनातील इत्छा तुम्हालाही कधीतरी झाल्या असतीलच ना?
मी पुढे काही विचारत नाही कि कधी त्या पूर्ण झाल्या का? लोकच आपोआप उत्तर देतात....................................


इत्छापुर्ती

तुझ्या पदरात बांधू का ग चंद्राला,

तुझ्या हातात ठेवू का ग आयुष्याला

लपेटून टाकू का ग रात्रीला तुझ्या केसात

पाहू का ग स्वप्न तुझ्या डोळ्यात,

तुझ्या बटाना सावरू का ग ओठांनी माझ्या

फिरवू का ग बोटे तनुवरून तुझ्या

हळुवारपणे  फिरवू का ग हात तुझ्या केसातून

घालू का ग विळखा तुझ्या कमरेला

ठेवू का ग हनुवटी माझी तुझ्या खांद्याला

टिपू का ग थेंब तुझ्या जीवणीवरचा

काढू का ग नक्षी तुझ्या पावलांवर

घासू का ग गाल माझे तुझ्या पोटावर

आठवतो आहे मी बसायचो  आपण तळ्याकाठी

वाट बघत पहिल्या चुंबनाची

छे तुझ्या ओठांना ते कधीच मंजूर नव्हते

कोण म्हणतो सगळ्या इत्छा पूर्ण होतात ......

महेश उकिडवे

आठवणी

आठवणी, ह्या विषयावर काहीतरी लिहायची इत्छा होती. सहज म्हणून लिहायला बसलो होतो, तर भलतेच काहीतरी लिहिले गेले.

बघुयात तुम्हाला ते आवडते का?


काल रात्री फिरायला बाहेर पडलो, थोडी थंडी होती,
म्हणून मग तुझ्या आठवणी घेतल्या लपेटून,
 
हळू हळू पाय थकत चालले , निशाहि मग जवळ येवू लागली.
जमिनीवरच मग ठवले डोके तुझी आठवण उशाशी घेवून,
 
हळू हळू थंडी वाढत चालली, मला हुडहुडी भरू लागली,
आठवणी हि मग मंद होवू लागल्या, उबही त्यांची कमी झाली
 
वाटला आता बहुतेक मृत्यू मला गाठणार, थंडी चा बहाणा करणार
तेवढ्यात कुडकुडत हात घातला खिशात, काहीतरी मिळाले
 
तुझा जुना फोटो,
 
ओढून मग धुक्याला रात्री , तोंड लपवून घेतले त्याच्या कुशीत
एक एक करून तारे, काजवे होवून चमकू लागले..................

सगळे शरीर गरम होतंय,  कळले कि चंद्र बाहेर येवून तापायला लागला होता
मी त्याला म्हटले का रे बाबा एवढा तू पेटलेला, तुझा शीतल पण कुठे हरवला
तो म्हणाला तिच्या आठवणी उशाशी घेवून झोपलायस, हातात फोटो तिचा
वर मला म्हणतोस का पेटला आहेस.
उरलेली रात्र संपूर्ण शरीर पेटून उठलेले
 
सकाळी कधीतरी महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टरांचे शब्द कानी आले
साला पिवून पडला होता, ताप आहे अंगात,  डोक्यावर पट्ट्या ठेवा उतरून जाईल
 
मी डॉक्टरांना एवढेच म्हटले 
बस एक दफा रूह को दफन करने दो
फिर बाकी जिंदगी सुकून से सास ले पाऊंगा
 
महेश उकिडवे

Tuesday, January 26, 2010

कळतंय काय तुला

एक तर्फी प्रेम ते हि तिचे,  थोडी वेगळी गोष्ट आहे, बहुतेक वेळेला एक तर्फी प्रेम हे मुलांच्या माथी मारले जाते.
तरीही, तिची भावदृष्टी, मनाची हुरहूर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न आहे.

_____________________________________________________________________________



कळतंय काय तुला

पाझरतात हल्ली अश्रू आठवणीत तुझ्या
देतात थंडावा मनाला माझ्या

कापतात ओठ माझे चाहूलीनी तुझ्या
घालतात साद मनाला माझ्या

भिरभिरतात डोळे माझे पाहुनी तुला
गुंफतात स्वप्ने मग मनी माझ्या

हुरहुरते मन माझे, भेटीस तुझ्या
का लावतोस ओढ हि जीवा

कळतंय काय तुला, काय होतंय मला
कि वेडी मी बघते चंद्राला, अमावास्येला

महेश उकिडवे

घेता मिठीत तुला ......

घेता मिठीत तुला च्या निमित्ताने.........

सहज सुंदर भावनाचे चित्रण आहे, तिचा लटका राग, खोटा प्रयत्न, हवा हवासा वाटणारा अधीरपणा हे सर्व काही टिपण्याचा प्रयत्न आहे.आयुष्यातील छोट्या छोट्या  गोष्टी, किती सहज घडणाऱ्या गोष्ठी आपण अनुभवतो का? कि हे सारे विसरून जातो रोजच्या राम रगाड्यात.विचार हा प्रश्न, मग कविता वाचा. .......रोज नाहीतरी नेहमी घडणारी घटना आहे हि.....त्याच्या कडे वेगळ्या दृष्टीने बघा, जीवन किती सुंदर आहे ते कळेल मग.

__________________________________________________________________________________



घेता मिठीत तुला , तुटले लाज बंध सारे
येण्या मिठीत मग का केलेस हे बहाणे

ओळखण्यास डाव माझा तुला न आला
हे पटण्या इतका प्रयत्न ना तुझा झाला

चुंबिता ओठांना गाल तुझा ग का लाल झाला
अपूर्ण प्रयत्न तो मला थांबवण्याचा माझ्या लक्षात आला

गुंतता श्वासात श्वास, आवेग तुझा का वाढला
सोडवण्या ओठानाही मग प्रयत्न तुझा का लांबला

मिठीत माझ्या फुलते हि  अशी कामिनी
विचार तुझ्या बटांना  कुठे हरवलीस तू दामिनी

उत्तरे ज्यांची नाहीत असे सारे तुझे प्रश्न आहेत
सोडवण्या येतेस  मिठीत माझ्या हा डाव मी ओळखला

पुरे कर ना आता हे चोरून वागणे
करण्यास प्रेम मजवरती सोडून दे हे असे लाजणे

महेश उकिडवे



Sunday, January 24, 2010

अजून काही त्रिवेणी

त्रिवेणी


तू मला नेहमी खोटारडा म्हणायचीस,

लोकांनी नाव दिले आज मला कवी


माझी ओळख मला इतक्या वर्षांनी झाली

________________________________________

काटेरी तारांवर कोणीतरी ओले कपडे वाळत घातलेले

थेंब थेंब रक्त सांडत होते त्यातून,


हल्ली म्हणे ती रोज त्याची आठवण काढते
_______________________________________

असे बरेच वेळेला होते, कि गोष्ट चांगली असते,

कधी खिशात पैसे नसतात, तर कधी दुकान बंद



असेच एकदा तुला मी विचारले होते माझ्या बद्दल
________________________________________

तुझ्या बरोबर पाहिलेली स्वप्ने,

प्रत्यक्षात कधीच खरी झाली नाहीत


नाही नाही, स्वप्ने निवडण्यात माझीच चूक झाली होती.
______________________________________

उधार ठेव माझे आयुष्य तुझ्या कडे

थोडे श्वास आणखी मागून आणतो


सावकारी मृत्यू साला व्याज त्यावर पण वाढवून मागतो
_______________________________________

झाली सकाळ तरी अजून चंद्र आकाशात घुटमळतोय

आकाश पण थोडं बावरून गेलंय, सूर्य हि फिका पडलाय


तू स्वप्नातून जागी हो ना प्लीज
____________________________________

श्वास गुंफून धुंध करशील का मला, स्पर्शाने तुझ्या मोहित करशील का मला

येवून जवळ घेशील का मिठीत मला, असे अनेक प्रश्न मनी माझ्या


होवून विश्वामित्र, संकटांची वाट रोजच बघतो मी........
___________________________________________________

रडवायला मला तुझ्या आठवणी आल्या

रात्र जागवायला पुन्हा पुन्हा आल्या


परीक्षा माझ्या अश्रूंची कि मनाची घेतेस तू?
_______________________________________________

आज पुन्हा एकदा त्या बगिच्या जवळून गेलो

जुनी आठवण परत आली,


काही नाही काही फुल आजही तशीच टवटवीत आहेत
______________________________________________

खूप सांभाळून ठेवले होते मी थोडेसे अश्रू

एक छोट्याश्या गोष्टी करिता सगळे वाहून गेले



आता रोज रोज नव्या जखमा कुठून आणू.
__________________________________________

फिरवून तक पाणी सार्या आयुष्य्वारुनी

लिहीन मी हि सारे नवीन पुन्हा एकदा


परत परत तुझेच नाव लिहायला कष्ट थोडे पडतात
__________________________________________

छत्री लपवून भिजत राहिलो आज दिवसभर

तोही बरसत होता बेहोष होवून


मग कळले तू त्याच्या बरोबर होतीस
_________________________________

वाद घालण्या एकमेकांशी पुन्हा दोन विचार आले

एकच होते भाव त्यांचे, विचार मात्र वेगळे होते


जो हरेल आज त्यात तोच तर जिंकेल

__________________________________________

रडतो आज काल मी खूप वेळा

केलेल्या प्रत्येक चुकीला बोल लावतो



जखमा साफ करताना वेदना तर होणारच ना?

__________________________________________

आठवणी काही रंगीत तर काही गंधित तुझ्या

विस्कटून सार्या पुन्हा पुन्हा एकत्र करतो मी



प्रेम मी केलं तुझ्यावर म्हणून तू काहीही मागू नकोस माझ्या कडे

______________________________________________



डोळे अगदी टच्च भरून वाहायला तयार आहेत

एक एक अश्रू मी सांभाळून ठेवला आहे



तू ये एकदा पुन्हा कधीतरी, मोकळे होवूदेत मला

______________________________________________



काल पहिले तुला रात्रभर तळमळताना

कूस बदलून झोपायची तुला सवय नाही



तू प्रेमात आहेस का कोणाच्या तरी?

__________________________________________

ती त्याला मिळणार नाही,तो त्याला पावणार नाही

हि कहाणी भक्ताची आहे, भक्त मग तो कोणीही आसुद्यात.त्याला प्राप्त होणार्या गोष्टींची आस आहे, काही मिळवण्याची नाही.प्रेमात, प्रेम मिळाले तर त्याची खरी गोडी असते. ते मिळवण्यापेक्षा प्राप्त होण्यात खरी त्याची प्रचीती असते.
ईश्वर भक्तीमध्ये तरी दुसरे ह्या हून वेगळे काय असते? प्रेयसी आणि ईश्वर दोघेही त्याचा अंत पाहतात.पटत असूनही मग, इतका वेळ का लावतात? असे अनेक प्रश्न मग डोळ्या पुढे येतात. त्यापेक्षा दोघेही एक उपाय का करत नाहीत ,
इथे मी कोणालाही मिळणार नाही आणि मी कोणालाही पावणार नाही, अश्या पाट्या लावून का बसत नाहीत?

परंतु दोघानाही ते मंजूर नाही, भक्ता वाचून त्यांची ओळख कुणाला पटणार नाही.

वरील पार्श्वभूमी वरती हि कविता.

ती- म्हणजे प्रेयसी, तो- म्हणजे -ईश्वर, मी म्हणजे भक्त.
एका वेगळ्या प्रेमाचा त्रिकोण मांडायचा प्रयत्न आहे हा बघुयात जमते का ते
=========================================================================================

ती त्याला मिळणार नाही,तो त्याला पावणार नाही
जाणूनही हे मी, भक्ती दोघांची सोडणार नाही,

तिला तो आवडते तरीही हे मानायची तयारी नाही
तो जाणतो कि हा भक्त खरा तरी तसे  दाखवत मात्र नाही
मला न परवा काही जाणून आथवा दाखवून घेण्याची

ती कशाला सोडेल मिठी तिच्या अभिमानाची
तो तरी का जाणेल भक्ती त्या पामराची
मला हे सारे कळते तरी भक्ती तीळभर हि ना ढळते

ती बघते त्याची परीक्षा का आणि कशासाठी
तो हि मग संकटांच्या  राशी लावतो त्याच्या पाठी
मी हि मग संकटांशी झुंझत परीक्षा सार्या देतो

ती म्हणते जगाला, तिला सुटायचे आहे त्याच्या प्रेमातून,
तो हि होऊ पाहतोय मोकळा त्याच्या भक्तीतून
मी हि मग आर्त स्वरांनी भक्तीत माझ्या त्यांना बांधू पहातो

पटते मला मग माझे, म्हणून ठेवले आहे कोणीतरी
मोहब्बत को खुदा केहना, या खुदा को मोहब्बत
दोन्ही हि सारखेच आहे, दोघांच्या मनात असूनही ,
भक्ताला मात्र दोघेही भासच आहेत

मी करतो भक्ती दोघांवरही कारण
माझ्या निकालाची वाट बघत आजूनही कितीतरी रांगेत आहेत
हटलो जर का आज मी इथून सोडून भक्ती
होईल प्रेम मग नास्तिक जगातून
कोणी मग प्रेम काव्य लिहिणार नाही
शमा जळेल रात्र भर त्याच्या साठी,  पतंग मात्र उरणार नाहीत...

जाणूनच हे मी ......लिहितो

ती त्याला मिळणार नाही, तो त्याला पावणार नाही
जाणूनही हे मी, भक्ती दोघांची सोडणार नाही,

महेश उकिडवे

Friday, January 22, 2010

ती, मी आणि ऋतू,.................................

तू भिजू नकोस ग पावसात एवढी,
पाहतो  तुला भिजताना मी मात्र जळत राहतो,
होवुनी तो (पाउस)  चिंब मला मात्र कोरडा पाडतो

त्याचे हे नेहमीच असे असते,
छत्रीत मी उभा
तर ती नेहमी धारांमध्ये नहात असते..

मग मी हि काही कमी नाही त्याला वेडावून दाखवतो,
म्हणतो साल्या (हि शिवी नाही)  किती दिवस असे वागशील
चार महिने संपले कि काय करशील....????
आईकुन मग हे,  तो आणखी मला चिडवतो
कोसळून मुसळधार तिला चिंब चिंब करतो....
संपतो त्याचा धिंगाणा मग चार महिन्यांनी
तिचेही मन तो तृप्त तृप्त करतो ......
एवढा तो कोसळूनही मी मात्र कोरडा कोरडा रहातो ....

येता थंडी मग, मला ती आठवू लागते......
थंडीत मग कधी गुलाबी, कधी रेशमी मिठी मला मारून बसते
उबदार मिठीत माझ्या हळू हळू ती फुलू लागते
पण आता तो जळत बसतो होवून शेकोटी
प्रणय माझा डोळे लाल करून  बघत असतो

हळू हळू थंडीही मग पळते, तशी तीही दूर जाते
विरहाची आग मग आम्हा दोघांना जाळू लागते
मग तो पुन्हा पुढे होतो, थंडीतला सगळा राग  तो काढतो
त्याच्या सहस्त्र किरणांनी दोघांना भाजून काढतो,
होते उदास मग मन दोघांचे

हळू हळू भेटीची ओढ वाढू लागते ,
एक मेकांच्या धुन्धीत बरसण्याची चाहूल लागू लागते
येतो मग आम्ही दोघे जवळ पुन हा एकदा
पाहून ते तो पुन्हा बरसू लागतो

मी भाबडा व्याकुळतेने तिला म्हणू लागतो

तू भिजू नकोस ग पावसात एवढी,
पाहतो  तुला भिजताना मी मात्र जळत राहतो,
होवुनी तो (पाउस)  चिंब मला मात्र कोरडा पाडतो

महेश उकिडवे

Wednesday, January 20, 2010

डांबिस नव्हे बावळट मी


डांबिस नव्हे बावळट मी
 
तुला मी त्या दिवशी भेटलो, बहुतेक पहिल्यांदाच आपण भेटत होतो
हळू  हळू ओळख वाढू लागली, ओढ एकमेकांना पटू लागली
त्यादिवशी धक्का लागून तुझी पर्स खाली पडली, अनेक गोष्टी मग रस्त्यावर
विखरून गेल्या, मी अधीरपणे विचारले त्यातल्या काही  उचलुका ?
तू पटकन नको नको म्हणालीस.
 
आठवते का तुला त्या दिवशी फिरताना
पाय तुझा अचानक मुरगळला, खड्या कडे पाहून मग मीही डोळा मिचकावला
तुला म्हटले मी धरू का? घरी तुला सोडू का?
तू परत नको नको म्हणालीस
 
त्यादिवशी दोघेच  जण बसलो होतो तळ्या काठी
हाती तुझ्या, शेंगदाण्याची पुडी, एक त्यातला खाताखाता
नको तिकडे उडाला, आणि आडकून बसला.
मी म्हटले काढू का ग त्याला? सोडवुका ग त्याला?
तू चटकन नको नको म्हणालीस
 
खाता खाता पाणीपुरी, एक पुरी ती टचकन फुटली
तुझ्या सार्या चेहर्यावरती पसरली,
मी झटकन रुमाल काढला, म्हटले तुला
पुसू का ग मी चेहरा तुझा?
तू परत नको नको म्हणालीस
 
फिरताना त्यादिवशी मधेच रस्ता ओलांडताना
भर्गाव वेगात गाड्या जाताना, तुझा चेहरा कावरा बावरा झाला
मी म्हटले तुला, धरू का ग हात तुझा?
तू बावरून नको नको म्हणालीस
 
त्यादिवशी कुठल्यातरी बहाण्याने सकाळी तुझ्या घरी आलो होतो
नुकतीच तू नाहून बाहेर आलेलीस, ओले मोकळे केस रुमालात बांधून
काही खात्याला केस मग त्या ड्रेस च्या हुक मध्ये आडकले
मी म्हटले तुला ते सोडवू का?
तू घाबरून नको नको म्हणालीस
 
त्यादिवशी सिनेमा  बघताना, बुड्ढी  के बाल खताना
काही तुझ्या नाकाला चिकटले
मी म्हटले तुला काढू देणा मला ते
तू पुन्हा एकदा नको नको म्हणालीस
 
त्या दिवशी आईसक्रीम खाता खाता हळूच तुझ्या
ओठांवरुनी एक थेंब हनुवटीवर ओघळला
मी अधीर पणे म्हटले टिपू का ग मी त्याला?
तू पुन्हा नको नको म्हणालीस
 
घरी होती आलेलीस तू, काहीतरी कामात होतीस मग्न तू
नकळत तुझे बोट कापले, रुधीरालाही मग पाय फुटले
मी म्हटले तुला पटकन, थांब मी हळद लावू का?
तू पुन्हा नको नको म्हणालीस
 
आज अचानक, घरी कोणी नाही बघून तू आलेलीस
मनात माझ्या घालमेल तू नजरेनेच जोखलीस
काही समजण्याच्या आता ओठ तुझे माझ्या ओठांवर टेकवलेस
आवेगाने मला मिठीत घेतलेस
 
पुरता बावरलो मी, तुझ्या अशा वागण्याने 
घाबरत घाबरत तुला विचारले
काय ग काय झाले तुला आज एकदम?
 
ती-  मुर्खा, किती दिवस नुसतेच प्रश्न विचारतोस,
सारे लक्ष तुझे माझ्या ओठांवरल्या  नकाराकडे लावतोस.
डोळ्यांची भाषा तुला समजत का नाही?
दोनदा नकार म्हणजे! होकार असतो एवढे साधे तुला कळत नाही
वाट पाहुनी मी कंटाळले, म्हटले याचे प्रश्न हे करू का ते करू का संपणार नाहीत
किती झाले तरी तू हिम्मत काही करणार नाहीस
नुसतेच प्रोफाईल  मध्ये नाव डांबिस लावतोस
प्रत्यक्षात बावळाटा सारखाच वागतोस.......
 
मुर्खा प्रश्न ओठांनी विचारतात उत्तर मात्र डोळ्यांनी देतात
........................................................
 
काही नाही तेंह्वा  पासून मी माझे नाव डाम्बिस बदलून ............. ठेवले
 
महेश उकिडवे
 
 

तुझ्या पासून किती दूर राहायचे

तुझ्या पासून किती दूर राहायचे
 
तुझ्या पासून दूर असे किती दिवस राहायचे
तुझ्या आठवणीत आजून किती झुरायचे
तुझ्या पासून दूर आता खरच राहवत नाही
या चातकाची तहान पाऊस पडला तरी भागात  नाही .........
 
आयुष्याचा हिशेब मांडतो मी आता
गुणाकार केला, भागाकार केला, मिळवले आणि वजा केले
झाली सगळी सूत्रे वापरून, झाली सगळी समीकरणे मांडून
हिशेब कसला   मांडू मी,प्रत्येक वेळेला उत्तर शून्यच येते,
 
तुझ्या पासून आता किती दूर दूर राहायचे,
प्रत्येक वेळेला मांडलेल्या हिशेबाचे उत्तर शून्यच यायचे
 
महेश उकिडवे

Tuesday, January 19, 2010

ती येते आणि मग..


ती येते आणि मग...
 
कधी कधी मग डोळ्यातून अश्रुंचे पूर येतात
 
कधी कधी मग मोकळ्या केसांचे वादळ घोंघावते
 
कधी कधी दिल खुलास मोकळ्या हास्याचे जाळे फेकते
 
कधी कधी मग हळुवार  बोलाने, दडपून टाकते
 
कधी कधी मग नजरेच्या तीराने घायाळ करते
 
कधी कधी मग मोहक ओठांनी, गुंतवून टाकते
 
कधी कधी मग मादक चालींनी, वेडे बनवते
 
कधी कधी मग नाजूक बोटांनी, इशार्यात अडकवते
 
काही नाही हो ह्या सगळ्या मी  संकटाना दिलेल्या सुंदर उपमा आहेत...
 
कधी कधी....

महेश उकिडवे
 
 
 

मोकळे केस तुझे............

मोकळे केस तुझे............
 
मोकळे सोडून केस , वर तुझे हे असे वागणे
जणू मोगार्यालाही वेडावून असे खुले धुंध सोडणे
 
मोकळे सोडून केस, वर तुझे हे असे लाजणे
जणू उन्मत्त वणव्याला  असे  खुले बोलावणे
 
मोकळे सोडून केस, वर तुझे हे  असे पाहणे
जणू पावसालाही अवेळी असे  चिंब भिजवणे
 
मोकळे सोडून केस, वर तुझे हे असे बोलणे
जणू वादळ वार्याला हे असे केसात बांधणे
 
मोकळे सोडून केस, तुझे हे असे सांडणे
जणू चंद्रालाही चांदण्यात हे असे पाहणे
 
म्हणून तू मोकळे केस सोडू नको
अश्या वणव्यात मला लपेटू नको
पाचोळा मी असा, परीक्षा माझी घेवू नको
 
महेश उकिडवे

Monday, January 18, 2010

सखे जाताना.......

सखे जाताना.......

सखे जाताना तो जाईच्या फुलांचा गजरा तेवढा माळून जा...
धुंध झालेला गंध तेवढा माझ्या साठी ठेवून जा....

सखे का तुझी आठवण यावी आता....
का जीव एवढा कासावीस होई  आता....
असून सगळे माझ्या कडे काहीच नाही आता....
रात्रीचा तो निशिगंध तेवढा पुन्हा एकदा फुलवून जा...

सखे जाताना तो जाईच्या फुलांचा गजरा तेवढा माळून जा.......

गंधाचा  बाजार भरला आहे सभोवताली
कुठला त्यातला माझा माहित नाही मलाही
सखे तू सांडलेला तो गंध फुलांचा तेवढा आवरून जा
जाता जाता एक थेंब त्यातला मला देवून जा

सखे जाताना तो जाईच्या फुलांचा गजरा तेवढा माळून जा.......

संपेल रात्र हि अशीच स्वप्ना मधुनी
उतरेल मग तो चंद्र हि त्या झुल्यावारुनी
जाता जाता त्याचे चांदणे तू घेवून जा
कवडसा असेल जर तुझ्या कडे एखादा तो मला देवून जा

सखे जाताना तो जाईच्या फुलांचा गजरा तेवढा माळून जा.......

सखे  उद्याही येशील याचे वचन मला देवून जा...

महेश उकिडवे

मृगजळ.


मृगजळ.
 
इंद्रधनुचे रंग मी, इवल्याश्या किरणाने बनवलेले
होतात क्षणार्धात नाहीसे, त्यांना आपलेसे करू पाहतेस.
 
अमावास्ये नंतर चा चंद्र मी, त्याला तू न्याहाळू पाहतेस,
शित्ल्तेच्या चांदण्यात तू अंगावर घेवू  पाहतेस
 
पाण्यातील मोती मी त्याला तू धरू पाहतेस
ओंजळीत पाणी तू साठवू पाहतेस.
 
काही करूनही येत नाही मी तुझ्या मिठी
मग मला तू मृगजळ म्हणू लागतेस...
 
धावत धावत माझ्या पाठी तू स्वतःलाच विसरू पाहतेस....

महेश उकिडवे
 

तुला पहिले मी नाहताना

तुला पहिले मी नाहताना, जीव कासावीस झाला माझा.
जळलो पार पाहिले त्या थेंबाला तनुवरून ओघळताना...

प्रत्येक थेंबा गणिक, खुलणारा देह तुझा,
नशिबी कोणाच्या काय आसते ठावूक न मला

अधीर डोळ्यांनी पाहिले मी तुला प्रत्येक वेळी नाहताना
स्वप्न नव्हे हे सत्य असे का हे गुंता सोडवेना मला...

मागितले देवा कडे धाड ना समीप मला तुझ्या
राहीन नाहताना नेहमी बरोबरी तुझ्या.

देवानेही करुणा माझी जाणली, सोडवीन हा गुंता आशी ग्वाही मला दिली.
कालच मेलो मी हे स्वप्न पाहताना.

आज पुन्हा मी सोबत तुझ्या नाहताना
अधीर पाणी होवून तापताना....

महेश उकिडवे

जळमटे

जळमटे

प्रेम तुझे माझे असेच खुंटेल  का ग
गैरसमज होतीलच, मग बोलणे तुटेल  का ग?

कालच स्वप्नात  आलीस तू, मग स्वप्न  माझे असे भंगेल का ग
झोपच ती मोडेलच  मग, स्वप्नात येण्याचे तू टाकशील का ग

तुला पाहताना डोळे कदाचित बोलतील का ग
अश्रूंची  भाषा तुला कळेल का ग

नसते प्रश्न मनात माझ्या सुरुवातीलाच येतात
आहे कुठे ती, आहे कुठे प्रेम, तरी पण जळमटे मात्र तयार आहेत.

महेश उकिडवे

चहा

चहा,

आयुष्य  हे नेहमी चहा  सारखे असते.........

पाणी- म्हणजे स्वतः
साखर म्हणजे -तू
चहा म्हणजे - दुख आणि सुख
आग म्हणजे- वेळ

वेळेच्या  विस्तवावर उकळत असते....
स्वप्ने वाफ होवून उडत जातात.....
चव मात्र ठेवून जातात....
मग कोणीतरी टाकते थोडेसे सुख आणि बरेचसे दुख
ते सुद्धा लागते उकळायला कारण चव येते म्हणतात
 
मग आठवते....तू येतेस ते साखर होवून
एक चमचा , ते सुद्धा जास्त मागता येत नाही
काय करणार डायबेटीस होतो म्हणतात
मग असा चहा आपण पितो ....झुरके घेत घेत
आठवणी काढत काढत ......
 
खरच  चहा आपण एवढ्या आवडीने का पितो मला हळू हळू उमगत चाललंय
 
महेश उकिडवे

Sunday, January 17, 2010

त्रिवेणी

माझे सगळ्यात आवडते कवी श्री. गुलझार साहेब यांची हि रचना. गझलेच्या पाठोपाठ मला सर्वात जास्त भावलेला हा प्रकार.त्रिवेणी हा विशिष्ट असा आकृतिबंध, ज्याला तीन शेर, किंवा ओळी आहेत. त्रिवेणी संगमा प्रमाणे ह्यांची रचना आहे. गंगा, जमुना आणि सरस्वती, ह्यांचा त्रिवेणी संगम होतो आसे आपण मानतो. प्रत्येक्षात मात्र संगमावर दोनच नद्या आहेत (गंगा आणि जमुना) sarswati लुप्त, किंवा सुप्त पणे आह तिथे.  तसाच हा त्रिवेणी आकृती बंध. त्रिवेणी लिहिताना, पहिले दोन शेर किंवा ओळी ह्या नेहमी सरळ अर्थ संगणाऱ्या तर तिसरी ओळ हि नेहमी सुप्त किंवा लुप्त असा अर्थ सांगणारी असावी. तिसरया ओळीचा उगम हा पहिल्या दोन ओळीं मधेच असावा.

थोडासा प्रयत्न मी पण करून पाहतोय......बघुयात आवडतो का तुम्हाला ते
__________________________________________________________________________________

कधी भास होतो तुझ्या कंकणाचा, कधी भास होतो तुझ्या पैंजणाचा,
हा भास कि  दोष मनाचा, कि तू मला छळतेस किती तो पुरावा.......
 
दाद मागितली देवाकडे, तोही म्हणाल हल्ली माझेही असेच काहीतरी होते.....

__________________________________________________________________________________

भेटलो जर कधी आपण , होतील ओल्या डोळ्यांच्या कडा 
कापतील ओठ परंतु शब्द मात्र फुटणार नाही 

अव्यक्त प्रेम सांगण्यासाठी शब्दांची गरजच उरणार नाही .....
__________________________________________________________________________________

मी जरा सावकाश रेंगाळतो स्वप्नांमाधुनी 
ते मात्र फार पुढे गेलं आहे.

छे ! मी वयाला गाठूच शकत नाही  

__________________________________________________________________________________

ती चिंब भिजायची पावसात सगळ विसरून
म्हणायची thats life     मिठीत शिरून

मग मला उमजले पाण्याला जीवन का म्हणतात  

__________________________________________________________________________________
पहाटेच्या दवातही वाहून जावेत असे तूझे नाजूक शब्द
मी कोवळ्या चांदण्याच्या भाराखाली दडवले आहेत...
..
आता त्यांना सोडवायला तूझे ऒठ ऊधार देशील का?
__________________________________________________________________________________
ओठ तुझे कि पाकळ्या गुलाबाच्या 
चुंबूनी टिपला मकरंद त्यावरचा 

मम जातकुळी ती भ्रमराची 
__________________________________________________________________________________
युंह तो दुनियाने मुझपर तोहमते हजारो रख्ही है  ...
बस एक बार तू मुझे दीवाना कहदेना 

बस ये एकही इल्जाम बाकि है 
__________________________________________________________________________________
उडती हुवे जुल्फे तेरी, लेहाराता आंचल, 
उप्पर से ये बारीश और बिजली का केहर 

या खुदा कीस कीस को संभालूं में
__________________________________________________________________________________
हर बार मै उसे बनाता हूँ, हर बार मिटाता हूँ
सजाता हूँ अपने रंगीन खयालोंसे, मिटाता भी मै ही हूँ 

क्या करूँ  तेरी यादे जो इतनी रंगीन है
__________________________________________________________________________________
ती तर भोळी राधा, कान्हा तिचा तू आसते जाणीव मनी
जाणीलेना तिच्या मना कुणी, 

कोण म्हणती वेश्या तिला ..
__________________________________________________________________________________
काल ऑफिस मधून बाहेर पडलो तर 
बाहेर उभा असलेला बांगडीवाला माझ्या कडे बघून हसत होता

काल म्हणे तिचं लग्न झालं 
__________________________________________________________________________________
तुझी गुलाबी मिठी, त्यात थंडीची हि लाट
सोमवारी  सकाळी होणारा घड्याळाचा गजर

ह्या पेक्षा नवीन वर्षाची खराब सुरवात ती कोणती
__________________________________________________________________________________
तू भेटायचे टाळलेस तरी माझी ओढ पूर्ण होतेच
प्रत्येकशात  नाही तरी स्वप्नात तू येतेस........

हल्ली झोपेच्या गोळ्यांचा डोस मी वाढवून घेतला आहे
__________________________________________________________________________________
बोलत नाहीस, भेटत नाहीस हल्ली तू 
एक बर झाले विसरलीस तू मला

तुझ्या आठवणीचे कपाट केन्हवाचे लावायचे राहून गेले आहे
__________________________________________________________________________________
मी प्रत्येक वेळेला तिच्या मना विरुद्ध वागतो तिला चीड येईल असेच करतो, 
ती चिडते हि दरवेळेस, मग मला फार फार आनंद होतो,

कारण चिडली कि  ती खूप छान दिसते, आणि मला हि तशीच बघायला आवडते
__________________________________________________________________________________
नात तुझ्याशी काय आहे माझं, मला कळत नाही
असलीस जवळ कि डोळ्यात लपतेस,

नसलीस कि डोळ्यातून ओसंडून वाहतेस
__________________________________________________________________________________

महेश उकिडवे

Friday, January 15, 2010

अर्जुनाचे द्वंद्व

कदाचित हि कविता बर्याच जणांना आवडणार नाही, किंवा पटणार नाही. हे साधे सुधे द्वंद्व आहे जो प्रतेय्क जण अनुभवतो आहे.
विचार हे प्रश्न स्वथाहालाच कदाचित ह्याचे उत्तर आजही अपूर्णच  आहे.

अर्जुनाचे द्वंद्व 

त्याला तीही आवडते आणि बायकोही 
कळेना कोणाच्या पारड्यात जावे 

तिच्या नेत्रातून त्याला जग बघायचे आहे
हिच्या नेत्रातून त्याला जग बदलायचे आहे

तिची प्रत्येक गोस्तच ह्याला अपूर्वाई 
हिची प्रत्येक गोस्त त्याला नवलाई 

तिच्या श्वासात ह्याला सापडतो गंध जाईचा
हिच्या श्वासात उगवतो निशिगंध निशेचा

ती सांगते मालकी हृदयावर त्याच्या
हिची मात्र त्याच्या आयुष्य्वर छाया

तिला तो सांगतो गुपिते सारी मनातली
हिला तो सांगतो स्वप्ने सारी मनातली 

ती म्हणते त्याला तूच होना माझा 
हिला मात्र वाटते तो आहेच कि माझा

ती आणि हि हया मध्ये कोण द्वंद्व अर्जुनाच्या मनात आहे
कृष्णसखा काय सांगणार राधा आणि रुक्मिणी हा प्रश्न तरी उनुत्तारीच आहे

कित्येक युगे गेली हया प्रश्ना मध्ये, 
रामायणे आणि महाभारते हि झाली आहेत

होवून कृष्ण मलाच हे सोडवावे लागेल
गीता नाही तरी नवीन काहीतरी लिहावेच लागेल;

महेश उकिडवे


Thursday, January 14, 2010

१४ फेब्रुवारी

मला आई सांगायची.............२ दिवसांचा होतो मी , झाल्या झाल्या दवाखान्यात मला इतर मुलां बरोबर ठेवत आसत.  माझ्या वेळेला दवाखान्यात इतर बाय्कान्नासुद्धा मुलगेच झाले होते,  एक बाई सोडली तर. तिला एक छान छोटीशी सावली मुलगी होती. नशीब बघा मला त्या मुली शेजारीच दवाखान्यात जागा मिळायची... नर्स  सांगायच्या तुमच मुलगा खूप कमी झोपतो  रडत पण फार नाही...त्याच्या उलट ती शेजारची मुलगी पहा फार रडते...पण ह्याला फरक पडत नाही...  वस्ताद आहे बेटा.   कट कट कट  भाग १.

थोडा मोठा झालो असेन २-३ वर्षांचा, बोर्न्हाल्याला बोलवतात न त्यात मला नेहमी कृष्णरूप घेवून बसवत...सांगायलाच नको मला पण ते फार आवडत आसे...काही काळात नसे त्या वयात पण आई सांगते  सोसायटी मधल्या सगळ्या वयाच्या मुली मला खेळायला घेवून जात आसत.  मला मात्र त्यातली एक मुलगी भारी आवडत आसे.......माझा लहानपणी फोटो सुद्धा आहे तिच्या बरोबरच...काही खेल्याचे म्हटले म्हणजे मी नेहमी तयार तिच्या बरोबर खेळायला.  कट कट कट  भाग २ 

शाळेत जावू लागलो तसा थोडी आकल यायला लागली. शाळेत नेहमी शिक्षा ओढवून घ्यायचो...म्हणजे मग बाई मुलींमध्ये बसवून ठेवायच्या. त्या शिक्षेचा परिणाम आस झाला , अभ्यास सोडून इतर कामातच  वेळ जावू लागला... कुणाची रिबीन ओढ, कोणाचीतरी वही ढाप, आसे काहीतरी .सगळी मुले मला चिडवायची  हे रे बायल्या मुलींमध्ये बसवतात तुला. त्यांना काय माहित मला ते आवडत आसे, तसेच त्या मुलींनाही. शाळेत वेळ फार मजेत जावू लागला, ठराविक काही तासांना मस्ती केली कि पाहिजेती शिक्षा मिळत होती.......कट कट कट  भाग ३

थोडी मोठी शाळा आता सुरु झाली होती, खर सांगायचे तर १० विची शाळा... सगळे आजू बाजूचे तसे गंभीर दिसायला लागले होते.. वर्गातील मुले मुली फार गंभीर वागायच्या.....आता हल्ली पूर्वी सारखी शिक्षा कोणी करत नसत...नालायक एवढे म्हणून बाई सोडून द्यायच्या....ठराविक मुली मात्र नेहमी हसायच्या... थोडा थोडा आर्थ आता त्या हस्न्यात्ला कळू लागला होता.....वायाच तसे होते काय करणार.....सेंडऑफ चा दिवस जवळ आला, त्या दिवशी ठरवला तिला सांगायचे मला आवडतेस तू.....   कट कट कट  भाग ४ 

कौलेज सुरु होवून सुद्धा आता २ वर्ष लोटली होती, कान्तीन मधल्या गप्पा, रोज दे, वालेन्तीने दय ह्यांची सवय झाली होती.....काही विशेष आसे दर वर्षी वाटत नसे. तेच ते त्याच मुली तोच तो मित्र परिवार  थोडासा कंटाळून गेलो होतो.  एकदम  बाबानि जागा आणि नोकरी बदलली दुसर्या गावात आलो.  नवीन सोसायटी .....आमच्या समोरच ती रहायची....  आगदी समोरचे शेजार...  काय करू माझे तिचे चांगले जमायला लागले  ती मेडिकल ला
होती आम्ही आपले वानिज्याचे विद्यार्थी   भरपूर वेळच वेळ .........तिचे मात्र थोडे वेगळे होते  कौलेज आणि तिचे विश्व काहीसे निराळे...  तिच्या घरच्यांना सुद्धा याचे नवल वाटायचे एवढी अबोल मुलगी ह्याच्याशी बरी गप्पा मारते.........   आमची दोस्ती आशीच पुडे वाढू लागली.....नवीन मित्र मिळाले...नवीन  कौलेज लाएइफ़ थोड वेगळे वाटू लागले होते  .........त्या दिवशी तिचा वाढदिवस होता ठरवला पक्का मनाशी  आता हीच म्हटले तिला सांगून टाकूयात घरी पण काही प्रोब्लेम असणार नाही कट कट कट ५

यंदाच्या वर्षी MBA  ची परीक्षा पास झालो आणि एकदम नवीन विश्वात जावून पडलो.....वेगळीच दुनिया होती.. फार फार वेगळे मित्र आणि मैत्रिणी होत्या. त्यातल्या त्यात  माझी आणि जूनिइर्स  चे छान जमू लागले होते..........त्यातली एक मुलगी मला उगाचच आवडू लागली होती. तशी तिची आणि माझी केमीस्त्तरी सर्वाना परिचयाची होती........ तसा मी थोडा घाबरत कारण तिच्या आणि माझ्या परिस्थिती मध्ये फारच फरक होता.....ती आपली बंगलेवाली आणि मी आपला १ बी एच के वाला .....तरी पण ती मात्र भिन्दास्त होती तिला कशाचीही फिकीर नसायची......तिचा तो मनमोकळा स्वभाव आणि वागणे मला फार आवडू लागले होते......................वाटला आपला शोध संपला   मिळाली जीवनसाथी मला... आता तिला सांगून टाकूच   मला काय वाटते ते. एक दिवस हिम्मत केली आणि तिला सांगितले . खो खो हसायला लागली ती , मला म्हणाली अरे वेड्या सांगतोस काय त्यात मला माहित आहे ते..........माझी काहीच हरकत नाही............मला वाटले कि तू विचारणार नाहीस ......म्हणून मग मीच स्वतहाला विचारले चालेल का हा ...............??????????  उत्तर आले धावेल  ......... कट कट कट ६ 

घरच्यांनी मुलगी पहिली माझ्या साठी गोड आणि एकदम सरळ साधी , दिसायला खूप सुंदर नसली तरी हसरी होती, मुख्य म्हणजे आईला पण आवडली होती.....मग काय विधिवत साखरपुडा आणि मग लग्न.......हनिमूनला गेल्यावर उगाच वाटू लागले  .........तिला बहुतेक आपण आवडत नसणार घरच्यांच्या जबरदस्ती करिता तिने बहुतेक लग्न केले आसवे......आगावू पण केला आणि तिला तसे सरळच विचारले........टचकन तिच्या बोलक्या डोळ्यातून पाणी आले ती म्हणाली मला दुसरे कोणी आवडायची संधीच कधी मिळाली नाही....आमच्या कडचे फारच जुन्या विचारांचे लोग आहेत त्यामुळे....तूच पहिला....आणि हो शेवटचा पण.....      उफ उफ उफ   म्हटलं चायला हल्ली आशी माणसा पण आसतात का? मला वाटले कि फक्त मराठी सिनेमात अशी पात्रं असतात...  कट कट कट ७ 

ऑफिस मध्ये तसा मी नेहमीच आवडता असलो तरी   विशेष करून माझी वरिष्ठा  जरा जास्तच प्रेमात होती माझ्या. सुट्ट्या, ऑफिस मधली सगळी चांगली कामे, सगळ्या चांगल्या टूर मलाच मिळू लागल्या. बहुतेक इतरांच्या पत्रिके मध्ये त्यावेळेला साडेसाती असावी   आणि माझी सुटली असावी ........बरेच वेळेला आम्ही दोघे टूरला बरोबर गेलो होतो...पण आजच्या टूर मध्ये तिचा मूड काहीतरी वेगळाच होता........वाईन घेवून (ढोसून) हमसाहमशी रडली ती माझ्या खांदयावर डोक ठेवून मला कळेना हिचे सांत्वन मी काय करणार...तिचा नवरा तिला विचारात नव्हता    म्हणून हि दुसरीच्या नवरा धरणार      मजेशीर होते सगळे........तिला म्हतातले तुला माझ्या कडून काय हवे आहे ? तिच्या उत्तरांनी मी थबकलोच ..........म्हटला मी आता ह्या वयात मझ्या बायकोला काडीमोड देवू म्हणतेस? का आणि कशा साठी? तिच्या कडे ह्याचे उत्तर नव्हते ? ती म्हणाली मला तू खूप आवडतोस बस एवढेच माझ्या साठी पुरे आहे............हळूहळू माझ्या टूर, चांगली काम, बंद झाली.........इतर सहकार्यांचा त्यांच्या पत्रिके वर आणि बहुधा त्यातल्या उपायांवर विश्वास बसला...........असावा.... कट कट कट

रिटायर होवून आता काही महिनेच लोटले होते.....घरी बायको खूप खुश होती   मुलगी थोडी नाराज असली तरी. कारण आता बाबान शेंड्या लावता येणार नाहीत.....असा काहीतरी तिचा विचार असावा........मुलीने एक दिवस नेहमीचा घोळ घातला....म्हणाली मी लग्न ठरवले आहे? नशीब जातीतला तरी पकडला. घरी गेलो त्यांच्या आणि काय आश्चर्य .......MBA केल्याचा फायदा आता होतोय आस वाटला मला...  म्हटला तू कशी काय इथे. अरे .......अमेरिकेतून आलो झाली ३ वर्ष, मुलांनी सांगितले लग्न ठरवला म्हणून ..........पण मला काही सामाझेना कि तुम्ही इकडे मग मुलगा तिकडे कसा काय ? ती म्हणाली आरे त्याला इथे येण्यात काही रस उरला नाहीये.      मग काय बोल काय करूयात ? म्हटला जावूदेत ग ठरवला आहे पोरांनी तर होवून जावूदेत त्यांच्या मनासारखे ........लग्नात अक्षता टाकताना मोठी गम्मत वाटली  .......आपल्या डोक्यावर ह्या पडायच्या त्या आता विहिणीच्या डोक्यावर टाकतोय......खूप हसलो   .. बायको म्हणाली आहो मुलीचे लग्न झाले आता तरी जरा नीट वागत चला....विहिणबाई काय म्हणतील ?    कट कट कट १० 

दहा रिळांचा हा सिनेमा मला आता आठवत होता......हॉस्पिटल मधल्या खाटेवर पडून होतो. बघितले तर मुलगी सारखी रडत होती .....बाबा डॉक्टर म्हणतात आता काही खर नाहीये. म्हटला नकोस ग उगाच काही चिंता करूस झाले कि सगळे आयुष्य जगुन आता आणखी नको बस झाले कि..........बायकोला जावून २ वर्ष झाली होती  ....तरी पण माझे आपले मस्त चालू होते... हा आपला बहुतेक परवा  आलेला हृदय विकाराचा झटका असावा........मलाच आश्चर्य वाटले म्हटलं मला हृदय विकाराचा झटका यावा इतके का माझे   मन कमकुवत होते........म्हटला जरा डॉक्टरांना बोलाव ...... परत खूप हसू लागलो    आजू बाजूचे सगळे आवक झाले त्यांना वाटले म्हातार्याचे डोके पण बहुतेक फिरले असावे .....तिथल्या मुख्य डॉक्टर्स आल्या .........म्हटला त्या दिवशी वाद दिवसाल तुला ग्रीटिंग दिले होते आठवते का आज भेटत आहोत आपण ते सुद्धा आश्या अवस्थे मध्ये  .....मुलगी, विहिणबाई, जावई  सगळेच डोळे विस्फारून बघत होते ..........हॉस्पिटल मध्ये येवून आज १० दिवस झाले होते  प्रकृती मध्ये फरक तर काहीच नव्हता थोडी खालावलेली होती. मुलीला सांगितले आता तू शांतपणे घरी जा माझे आरक्षण झाले आहे गाडी यायची वाट बघतोय इतकेच .....आता हॉस्पिटल मध्ये कोणी कोणी नव्हते ......आलेच यमदूत मला म्हणाले त काहीतरी पुण्यं केला आहेस म्हणून तुला आज १४ फेब्रुवारी ला घेवून चाललो आहोत.......मी नेहमी प्रमाणे हसलो ............................काही इच्छा आहे का शेवटची मी मानेनेच नाही म्हटले........दूर कुठेतरी  गाणे आईकू येत होते       Give me some sunshine , Give me some rains , Give  me  another  chance  wanna  growup  once  again .  

चित्रगुप्ताच्या दारात उभा होतो पाप पुण्याचा हिशोब चालू होता........त्याची सेक्रेटरी म्हणाली टाका ह्याला नरकात, जाताना हळूच तिला डोळा मारला .......तिने सणसणीत शिवी हासडली

 flirt  साला...................................................

सोड वृथा अभिमान हा

सोड वृथा अभिमान हा

घेता तिने जवळ मजला, वादळा परी मिसळलो श्वासात तिच्या ,
जावून सांग त्या वाऱ्याला, सोड वृथा अभिमान हा (वादळाचा)

शिरलो मिठीत तिच्या, सर्वांग पेटलेले
जावून सांग त्या अग्नीला सोड वृथा अभिमान  हा (दाहकतेचा)

धुंदीत गेलो, बेहोष झालो, प्रीतीत तिच्या
जावून सांग त्या मोगर्याला सोड वृथा अभिमान हा (सुगंधाचा)

बरसली ती अशी कि झालो मी चिंब ओला
जावून सांग त्या पावसाला सोड वृथा अभिमान हा (बरसण्याचा, चिंब भिजवण्याचा)

पहिले डोळ्यात तिच्या, बुडलो पार खोलात मी
जावून सांग त्या सागराला सोड  वृथा अभिमान हा (खोलीचा)

चुंबिले ओठ तिचे , झालो असा मदहोष मी कि नशा हि फिकी पडावी
जावून सांग त्या मदिरेला सोड वृथा अभिमान हा (झीन्गण्याच्या, नशेला)

उडाला असा धुरळा प्रीतीचा तिच्या कि, झालो पाचोळा मग मी
जावून सांग त्या वादळाला सोड वृथा अभिमान हा (वादळी लाटांचा)

घेता मिठीत मजला तिने, व्यापून गेलो मी पुरता,
जावून सांग त्या नभाला सोड वृथा अभिमान हा (व्याप्तीचा)

वारा, अग्नी, पाउस, फुले, सागर, मदिरा, नभ आणि वादळे
सारे सारे फिके तिच्या पुढे, जाण आता तरी ह्या वेदांना

कशास वाचू मी वेद, पुराणे, आणि पोथ्या,
मोक्ष तो लाभला तिच्या मूळेच  आम्हाला...................................

महेश उकिडवे



सुफी संत नेहमीच अल्लाह म्हणजे ईश्वराला प्रेयसी ह्या स्वरुपात मानत आलेत. महाराष्ट्र मध्ये संतानी ईश्वराला विविध रुपात रंगवले आहे.  मीरा बाई ह्यांनी  ईश्वराला नवरा ह्या स्वरुपात रंगवून बहुतांश रचना लिहिल्या आहेत. संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या बाबत वेगळा आदर्श घालून  दिलेला आहे, त्यांनी ईश्वराला आई च्या रुपात रंगवले आहे.
शेवटी प्रत्येक जन कोणान कोणावर प्रेम तर करतोच , मग ते प्रेयसी किंवा प्रियकर असो, आई  असो कि इतर कोणीही.........
 
सुफी संत साहित्याचा थोडासा पगडा असलेली हि कविता आहे, जिथे  प्रेयसी ची  तुलना पंच-महाभूतांबरोबर  करून त्यांना दाखून  दिले आहे कि त्यांचा अभिमान हा किती तोकडा आहे ज्याच्या  जवळ प्रेम आहे...त्याला सारे जगच तोकडे वाटत.....नाही का?




Wednesday, January 13, 2010

एक थेंब तुझ्यासाठी....

एक थेंब तुझ्यासाठी....


ज्ञानोबाच्या, ना तुक्याच्या वंशाचा मी,

ना गदिमा, बोरकर, खानोलकर, कुसुमाग्रजांच्या जातीतला मी,

ना मी पुलं, शन्ना, वपू च्या पंथातला मी,

ना मी गुरु, संदीप च्या जात्कुळातील मी,

मग मी कोण?

ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ह्या ब्लॉग च्या माध्यमातून लिखाण करणार आहे.

सदर ब्लॉग हा, कॅपिटल मार्केट, आर्थ-शास्त्र , मानवी संबंध ह्याला समर्पित असेल.

आकृतीबंध, छंदबद्ध, सीमा, मर्यादा, व्याकरण ह्यांच्या पलीकडे जावून काही मानवी मनाशी निगडीत अश्या गोष्टींसाठी लिखाण करणार आहे.

बहुतेक वेळेला ते स्पष्ट , थोडे जास्त निर्भीड, नीलाजरे, परंतु मनाला मानवणारे आसे लिहायच्या हा साधा प्रयत्न आहे.

या ब्लॉग च्या मध्ये मी कविता, त्रिवेणी, उफाणीका, गोष्टी आणि कथा ह्यावर माझा भर असेल

आपल्या सर्वांचे ह्या ब्लॉग वर स्वागतच आहे. निर्भीड पणे आपली मते मांडा, कोणाच्याही कुठल्याही प्रतिक्रिया काढून टाकणार नाही ह्याची मी ग्वाही देतो.


महेश उकिडवे

Tuesday, January 12, 2010

तिळगुळ घ्या गोड बोला

तिळगुळ घ्या गोड बोला

तू चंद्र नभातला, मी मात्र पृथ्वीवरचा
तू धवल कांतीचा , मी मात्र काळा कुट्ट
तू असतोस नेत्रात तिच्या, मला मात्र ती आठवत सुद्धा नाही
तुझ्या कलांची अपूर्वाई तिला, मला मात्र उपेक्षेच नाव सुद्धा नाही
तुझे चांदणे ती पांघरते रात्र भर, मला मात्र जागी बसून राहण्याची शिक्षा

केवढा फरक हा तुझ्या आणि माझ्यात,????????????????

तुझ्या नशिबी प्रेमिकांचे कोंदण, मला मात्र सर्वार्थाने बंधन,
तू किती सुंदर, मी मात्र काळाकुरूप,
तू मुक्त पणे वावरतोस, मला मात्र एका जागी खिळवून ठेवतोस,

आसशील प्रणयाच्या रात्रीचा स्वामी तू,
प्रणयाच्या रात्रीला देखील तुझेच नाव-मधुचंद्र

पण पण पण ..........................................

अरे मुर्खा नकोस करू इतका अभिमान, ............
आसशील तू धवल गोरा, आणि मी मिट्ट काळा,
खुलाविशी तू आसमंत सारा तर मज जवळ तिला खुलावंण्याचा मंत्र न्यारा
लक्षात ठेव राहतोस तू नभी, मला देते ती तिच्या जीवणीचा थारा,
येत रात्र प्रणयाची ..........लावती खिडकी सारे, पण सोडती मुक्त मला
जलतोस तू माझ्यावर ठावूक आहे मला, अरे इतके प्रेम कुंजन तुझ्या बरोबर करूनही,
चुम्बनाचा मान पहिला मला................................

ओळख आत तरी मला .....अरे जिवणी वरचे नक्षत्र मी
तीळ म्हणती मला

तिळगुळ घ्या गोड बोला.

महेश उकिडवे

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...