Tuesday, January 19, 2010

मोकळे केस तुझे............

मोकळे केस तुझे............
 
मोकळे सोडून केस , वर तुझे हे असे वागणे
जणू मोगार्यालाही वेडावून असे खुले धुंध सोडणे
 
मोकळे सोडून केस, वर तुझे हे असे लाजणे
जणू उन्मत्त वणव्याला  असे  खुले बोलावणे
 
मोकळे सोडून केस, वर तुझे हे  असे पाहणे
जणू पावसालाही अवेळी असे  चिंब भिजवणे
 
मोकळे सोडून केस, वर तुझे हे असे बोलणे
जणू वादळ वार्याला हे असे केसात बांधणे
 
मोकळे सोडून केस, तुझे हे असे सांडणे
जणू चंद्रालाही चांदण्यात हे असे पाहणे
 
म्हणून तू मोकळे केस सोडू नको
अश्या वणव्यात मला लपेटू नको
पाचोळा मी असा, परीक्षा माझी घेवू नको
 
महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...