Sunday, May 16, 2010

बटांचा गुंता

बटांचा गुंता
 
माझ्या नकळत घेतलेला मजाह हात हातात
मी दिवस भर माझ्या केसातून फिरवत होते
तुझी आठवण म्हणून एक एक बट उगाच सारखी सावरत होते
वेड्या बटा माझ्या उगाच गुंतत होत्या सारख्या
 
तू काल स्वप्नात आल होतास, आणि ते सुद्धा दिवसा 
आठवून मी फिरवत बसले होते बोट केसातून माझ्या 
गुंतली एक बट मग आपोआप.
 
पहिली भेट, त्याच्यावरचा तो गुलाबी  कागद मी हळुवार पाहत होते,
अगदी सहज, सहज म्हणून केसात हात फिरवत होते
नकळत एक अल्लड बट पुन्हा गुंतली 
 
तुझ्या  बरोबरची पहिली भेट आणि तो पहिला बोसा
आठवून , हलकेच लाजत वळत होते कुशीवर सारखी
गुंतत होत्या अनेक बटा, आठवणीत तुझ्या
 
आज तू नाहीस जवळी म्हणून मन माझे खट्टू होतोय
येणार तू कधी म्हणून उगाचच सारखी वाट बघतंय
सारखे सारखे केस उडून तोंडावर येतात माझ्या पण  पण पण
एकही बट आज गुंतत नाही .....................
 
नाहीस तू जवळ सजणा म्हणून कि काय  
केसात  माझ्या माझी बोटे आज काल फिरतच नाहीत..
एकही बट हल्ली गुंतत नाही  
 
महेश उकिडवे
 

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...