ती येते आणि मग...
कधी कधी मग डोळ्यातून अश्रुंचे पूर येतात
कधी कधी मग मोकळ्या केसांचे वादळ घोंघावते
कधी कधी दिल खुलास मोकळ्या हास्याचे जाळे फेकते
कधी कधी मग हळुवार बोलाने, दडपून टाकते
कधी कधी मग नजरेच्या तीराने घायाळ करते
कधी कधी मग मोहक ओठांनी, गुंतवून टाकते
कधी कधी मग मादक चालींनी, वेडे बनवते
कधी कधी मग नाजूक बोटांनी, इशार्यात अडकवते
काही नाही हो ह्या सगळ्या मी संकटाना दिलेल्या सुंदर उपमा आहेत...
कधी कधी....
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment