मृगजळ.
इंद्रधनुचे रंग मी, इवल्याश्या किरणाने बनवलेले
होतात क्षणार्धात नाहीसे, त्यांना आपलेसे करू पाहतेस.
अमावास्ये नंतर चा चंद्र मी, त्याला तू न्याहाळू पाहतेस,
शित्ल्तेच्या चांदण्यात तू अंगावर घेवू पाहतेस
पाण्यातील मोती मी त्याला तू धरू पाहतेस
ओंजळीत पाणी तू साठवू पाहतेस.
काही करूनही येत नाही मी तुझ्या मिठी
मग मला तू मृगजळ म्हणू लागतेस...
धावत धावत माझ्या पाठी तू स्वतःलाच विसरू पाहतेस....
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment