तुझ्या पासून किती दूर राहायचे
तुझ्या पासून दूर असे किती दिवस राहायचे
तुझ्या आठवणीत आजून किती झुरायचे
तुझ्या पासून दूर आता खरच राहवत नाही
या चातकाची तहान पाऊस पडला तरी भागात नाही .........
आयुष्याचा हिशेब मांडतो मी आता
गुणाकार केला, भागाकार केला, मिळवले आणि वजा केले
झाली सगळी सूत्रे वापरून, झाली सगळी समीकरणे मांडून
हिशेब कसला मांडू मी,प्रत्येक वेळेला उत्तर शून्यच येते,
तुझ्या पासून आता किती दूर दूर राहायचे,
प्रत्येक वेळेला मांडलेल्या हिशेबाचे उत्तर शून्यच यायचे
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment