मला आई सांगायची.............२ दिवसांचा होतो मी , झाल्या झाल्या दवाखान्यात मला इतर मुलां बरोबर ठेवत आसत. माझ्या वेळेला दवाखान्यात इतर बाय्कान्नासुद्धा मुलगेच झाले होते, एक बाई सोडली तर. तिला एक छान छोटीशी सावली मुलगी होती. नशीब बघा मला त्या मुली शेजारीच दवाखान्यात जागा मिळायची... नर्स सांगायच्या तुमच मुलगा खूप कमी झोपतो रडत पण फार नाही...त्याच्या उलट ती शेजारची मुलगी पहा फार रडते...पण ह्याला फरक पडत नाही... वस्ताद आहे बेटा. कट कट कट भाग १.
थोडा मोठा झालो असेन २-३ वर्षांचा, बोर्न्हाल्याला बोलवतात न त्यात मला नेहमी कृष्णरूप घेवून बसवत...सांगायलाच नको मला पण ते फार आवडत आसे...काही काळात नसे त्या वयात पण आई सांगते सोसायटी मधल्या सगळ्या वयाच्या मुली मला खेळायला घेवून जात आसत. मला मात्र त्यातली एक मुलगी भारी आवडत आसे.......माझा लहानपणी फोटो सुद्धा आहे तिच्या बरोबरच...काही खेल्याचे म्हटले म्हणजे मी नेहमी तयार तिच्या बरोबर खेळायला. कट कट कट भाग २
शाळेत जावू लागलो तसा थोडी आकल यायला लागली. शाळेत नेहमी शिक्षा ओढवून घ्यायचो...म्हणजे मग बाई मुलींमध्ये बसवून ठेवायच्या. त्या शिक्षेचा परिणाम आस झाला , अभ्यास सोडून इतर कामातच वेळ जावू लागला... कुणाची रिबीन ओढ, कोणाचीतरी वही ढाप, आसे काहीतरी .सगळी मुले मला चिडवायची हे रे बायल्या मुलींमध्ये बसवतात तुला. त्यांना काय माहित मला ते आवडत आसे, तसेच त्या मुलींनाही. शाळेत वेळ फार मजेत जावू लागला, ठराविक काही तासांना मस्ती केली कि पाहिजेती शिक्षा मिळत होती.......कट कट कट भाग ३
थोडी मोठी शाळा आता सुरु झाली होती, खर सांगायचे तर १० विची शाळा... सगळे आजू बाजूचे तसे गंभीर दिसायला लागले होते.. वर्गातील मुले मुली फार गंभीर वागायच्या.....आता हल्ली पूर्वी सारखी शिक्षा कोणी करत नसत...नालायक एवढे म्हणून बाई सोडून द्यायच्या....ठराविक मुली मात्र नेहमी हसायच्या... थोडा थोडा आर्थ आता त्या हस्न्यात्ला कळू लागला होता.....वायाच तसे होते काय करणार.....सेंडऑफ चा दिवस जवळ आला, त्या दिवशी ठरवला तिला सांगायचे मला आवडतेस तू..... कट कट कट भाग ४
कौलेज सुरु होवून सुद्धा आता २ वर्ष लोटली होती, कान्तीन मधल्या गप्पा, रोज दे, वालेन्तीने दय ह्यांची सवय झाली होती.....काही विशेष आसे दर वर्षी वाटत नसे. तेच ते त्याच मुली तोच तो मित्र परिवार थोडासा कंटाळून गेलो होतो. एकदम बाबानि जागा आणि नोकरी बदलली दुसर्या गावात आलो. नवीन सोसायटी .....आमच्या समोरच ती रहायची.... आगदी समोरचे शेजार... काय करू माझे तिचे चांगले जमायला लागले ती मेडिकल ला
होती आम्ही आपले वानिज्याचे विद्यार्थी भरपूर वेळच वेळ .........तिचे मात्र थोडे वेगळे होते कौलेज आणि तिचे विश्व काहीसे निराळे... तिच्या घरच्यांना सुद्धा याचे नवल वाटायचे एवढी अबोल मुलगी ह्याच्याशी बरी गप्पा मारते......... आमची दोस्ती आशीच पुडे वाढू लागली.....नवीन मित्र मिळाले...नवीन कौलेज लाएइफ़ थोड वेगळे वाटू लागले होते .........त्या दिवशी तिचा वाढदिवस होता ठरवला पक्का मनाशी आता हीच म्हटले तिला सांगून टाकूयात घरी पण काही प्रोब्लेम असणार नाही कट कट कट ५
यंदाच्या वर्षी MBA ची परीक्षा पास झालो आणि एकदम नवीन विश्वात जावून पडलो.....वेगळीच दुनिया होती.. फार फार वेगळे मित्र आणि मैत्रिणी होत्या. त्यातल्या त्यात माझी आणि जूनिइर्स चे छान जमू लागले होते..........त्यातली एक मुलगी मला उगाचच आवडू लागली होती. तशी तिची आणि माझी केमीस्त्तरी सर्वाना परिचयाची होती........ तसा मी थोडा घाबरत कारण तिच्या आणि माझ्या परिस्थिती मध्ये फारच फरक होता.....ती आपली बंगलेवाली आणि मी आपला १ बी एच के वाला .....तरी पण ती मात्र भिन्दास्त होती तिला कशाचीही फिकीर नसायची......तिचा तो मनमोकळा स्वभाव आणि वागणे मला फार आवडू लागले होते......................वाटला आपला शोध संपला मिळाली जीवनसाथी मला... आता तिला सांगून टाकूच मला काय वाटते ते. एक दिवस हिम्मत केली आणि तिला सांगितले . खो खो हसायला लागली ती , मला म्हणाली अरे वेड्या सांगतोस काय त्यात मला माहित आहे ते..........माझी काहीच हरकत नाही............मला वाटले कि तू विचारणार नाहीस ......म्हणून मग मीच स्वतहाला विचारले चालेल का हा ...............?????????? उत्तर आले धावेल ......... कट कट कट ६
घरच्यांनी मुलगी पहिली माझ्या साठी गोड आणि एकदम सरळ साधी , दिसायला खूप सुंदर नसली तरी हसरी होती, मुख्य म्हणजे आईला पण आवडली होती.....मग काय विधिवत साखरपुडा आणि मग लग्न.......हनिमूनला गेल्यावर उगाच वाटू लागले .........तिला बहुतेक आपण आवडत नसणार घरच्यांच्या जबरदस्ती करिता तिने बहुतेक लग्न केले आसवे......आगावू पण केला आणि तिला तसे सरळच विचारले........टचकन तिच्या बोलक्या डोळ्यातून पाणी आले ती म्हणाली मला दुसरे कोणी आवडायची संधीच कधी मिळाली नाही....आमच्या कडचे फारच जुन्या विचारांचे लोग आहेत त्यामुळे....तूच पहिला....आणि हो शेवटचा पण..... उफ उफ उफ म्हटलं चायला हल्ली आशी माणसा पण आसतात का? मला वाटले कि फक्त मराठी सिनेमात अशी पात्रं असतात... कट कट कट ७
ऑफिस मध्ये तसा मी नेहमीच आवडता असलो तरी विशेष करून माझी वरिष्ठा जरा जास्तच प्रेमात होती माझ्या. सुट्ट्या, ऑफिस मधली सगळी चांगली कामे, सगळ्या चांगल्या टूर मलाच मिळू लागल्या. बहुतेक इतरांच्या पत्रिके मध्ये त्यावेळेला साडेसाती असावी आणि माझी सुटली असावी ........बरेच वेळेला आम्ही दोघे टूरला बरोबर गेलो होतो...पण आजच्या टूर मध्ये तिचा मूड काहीतरी वेगळाच होता........वाईन घेवून (ढोसून) हमसाहमशी रडली ती माझ्या खांदयावर डोक ठेवून मला कळेना हिचे सांत्वन मी काय करणार...तिचा नवरा तिला विचारात नव्हता म्हणून हि दुसरीच्या नवरा धरणार मजेशीर होते सगळे........तिला म्हतातले तुला माझ्या कडून काय हवे आहे ? तिच्या उत्तरांनी मी थबकलोच ..........म्हटला मी आता ह्या वयात मझ्या बायकोला काडीमोड देवू म्हणतेस? का आणि कशा साठी? तिच्या कडे ह्याचे उत्तर नव्हते ? ती म्हणाली मला तू खूप आवडतोस बस एवढेच माझ्या साठी पुरे आहे............हळूहळू माझ्या टूर, चांगली काम, बंद झाली.........इतर सहकार्यांचा त्यांच्या पत्रिके वर आणि बहुधा त्यातल्या उपायांवर विश्वास बसला...........असावा.... कट कट कट ९
रिटायर होवून आता काही महिनेच लोटले होते.....घरी बायको खूप खुश होती मुलगी थोडी नाराज असली तरी. कारण आता बाबान शेंड्या लावता येणार नाहीत.....असा काहीतरी तिचा विचार असावा........मुलीने एक दिवस नेहमीचा घोळ घातला....म्हणाली मी लग्न ठरवले आहे? नशीब जातीतला तरी पकडला. घरी गेलो त्यांच्या आणि काय आश्चर्य .......MBA केल्याचा फायदा आता होतोय आस वाटला मला... म्हटला तू कशी काय इथे. अरे .......अमेरिकेतून आलो झाली ३ वर्ष, मुलांनी सांगितले लग्न ठरवला म्हणून ..........पण मला काही सामाझेना कि तुम्ही इकडे मग मुलगा तिकडे कसा काय ? ती म्हणाली आरे त्याला इथे येण्यात काही रस उरला नाहीये. मग काय बोल काय करूयात ? म्हटला जावूदेत ग ठरवला आहे पोरांनी तर होवून जावूदेत त्यांच्या मनासारखे ........लग्नात अक्षता टाकताना मोठी गम्मत वाटली .......आपल्या डोक्यावर ह्या पडायच्या त्या आता विहिणीच्या डोक्यावर टाकतोय......खूप हसलो .. बायको म्हणाली आहो मुलीचे लग्न झाले आता तरी जरा नीट वागत चला....विहिणबाई काय म्हणतील ? कट कट कट १०
दहा रिळांचा हा सिनेमा मला आता आठवत होता......हॉस्पिटल मधल्या खाटेवर पडून होतो. बघितले तर मुलगी सारखी रडत होती .....बाबा डॉक्टर म्हणतात आता काही खर नाहीये. म्हटला नकोस ग उगाच काही चिंता करूस झाले कि सगळे आयुष्य जगुन आता आणखी नको बस झाले कि..........बायकोला जावून २ वर्ष झाली होती ....तरी पण माझे आपले मस्त चालू होते... हा आपला बहुतेक परवा आलेला हृदय विकाराचा झटका असावा........मलाच आश्चर्य वाटले म्हटलं मला हृदय विकाराचा झटका यावा इतके का माझे मन कमकुवत होते........म्हटला जरा डॉक्टरांना बोलाव ...... परत खूप हसू लागलो आजू बाजूचे सगळे आवक झाले त्यांना वाटले म्हातार्याचे डोके पण बहुतेक फिरले असावे .....तिथल्या मुख्य डॉक्टर्स आल्या .........म्हटला त्या दिवशी वाद दिवसाल तुला ग्रीटिंग दिले होते आठवते का आज भेटत आहोत आपण ते सुद्धा आश्या अवस्थे मध्ये .....मुलगी, विहिणबाई, जावई सगळेच डोळे विस्फारून बघत होते ..........हॉस्पिटल मध्ये येवून आज १० दिवस झाले होते प्रकृती मध्ये फरक तर काहीच नव्हता थोडी खालावलेली होती. मुलीला सांगितले आता तू शांतपणे घरी जा माझे आरक्षण झाले आहे गाडी यायची वाट बघतोय इतकेच .....आता हॉस्पिटल मध्ये कोणी कोणी नव्हते ......आलेच यमदूत मला म्हणाले त काहीतरी पुण्यं केला आहेस म्हणून तुला आज १४ फेब्रुवारी ला घेवून चाललो आहोत.......मी नेहमी प्रमाणे हसलो ............................काही इच्छा आहे का शेवटची मी मानेनेच नाही म्हटले........दूर कुठेतरी गाणे आईकू येत होते Give me some sunshine , Give me some rains , Give me another chance wanna growup once again .
चित्रगुप्ताच्या दारात उभा होतो पाप पुण्याचा हिशोब चालू होता........त्याची सेक्रेटरी म्हणाली टाका ह्याला नरकात, जाताना हळूच तिला डोळा मारला .......तिने सणसणीत शिवी हासडली
flirt साला...................................................
1 comment:
Amazing goshta ahe....
that is a very gud start!
waitin for the next posts!
Post a Comment