Tuesday, January 12, 2010

तिळगुळ घ्या गोड बोला

तिळगुळ घ्या गोड बोला

तू चंद्र नभातला, मी मात्र पृथ्वीवरचा
तू धवल कांतीचा , मी मात्र काळा कुट्ट
तू असतोस नेत्रात तिच्या, मला मात्र ती आठवत सुद्धा नाही
तुझ्या कलांची अपूर्वाई तिला, मला मात्र उपेक्षेच नाव सुद्धा नाही
तुझे चांदणे ती पांघरते रात्र भर, मला मात्र जागी बसून राहण्याची शिक्षा

केवढा फरक हा तुझ्या आणि माझ्यात,????????????????

तुझ्या नशिबी प्रेमिकांचे कोंदण, मला मात्र सर्वार्थाने बंधन,
तू किती सुंदर, मी मात्र काळाकुरूप,
तू मुक्त पणे वावरतोस, मला मात्र एका जागी खिळवून ठेवतोस,

आसशील प्रणयाच्या रात्रीचा स्वामी तू,
प्रणयाच्या रात्रीला देखील तुझेच नाव-मधुचंद्र

पण पण पण ..........................................

अरे मुर्खा नकोस करू इतका अभिमान, ............
आसशील तू धवल गोरा, आणि मी मिट्ट काळा,
खुलाविशी तू आसमंत सारा तर मज जवळ तिला खुलावंण्याचा मंत्र न्यारा
लक्षात ठेव राहतोस तू नभी, मला देते ती तिच्या जीवणीचा थारा,
येत रात्र प्रणयाची ..........लावती खिडकी सारे, पण सोडती मुक्त मला
जलतोस तू माझ्यावर ठावूक आहे मला, अरे इतके प्रेम कुंजन तुझ्या बरोबर करूनही,
चुम्बनाचा मान पहिला मला................................

ओळख आत तरी मला .....अरे जिवणी वरचे नक्षत्र मी
तीळ म्हणती मला

तिळगुळ घ्या गोड बोला.

महेश उकिडवे

4 comments:

Jai said...

This idea of such a blog is really nice. Mahesh your beautiful marathi songs and kavitas are like a garnish on it. I would like to wish everyone a very Happy Sankrant, the first marathi festival of the year and await for more words from all.

Unknown said...

मला अजूनही नक्की आठवते आहे कि तू मुंबई वरून शनिवार रविवार पुण्यात यायचास आणि आम्हाला सर्वांना उत्तम हॉटेल्स मध्ये घेऊन जायचास, कधी कधी तू काहीच जेवायचा नाहीस पण तरी सुद्धा तू आम्हाला कधीच नाही म्हणाला नाहीस आणि आम्ही सर्वजण बरेचदा त्याचीच वाट बघायचो, कितीही बिल आले तरी पैसे तूच भरणार असा तुझाच नियम होता कारण आम्ही तेव्ह्या कमवत नव्हतो. कदाचित हि तुझ्यासाठी फारच छोटीशी गोष्ट असेल पण असे कोणी असते आणि ते सुद्धा मित्रांनसाठी हे सर्वच आम्हाला (मला) नवीन होते. आम्ही कायम म्हणायचो कि M पासून मिळणाऱ्या सर्वे डिग्र्या तू घेणार आणि मग त्या संपल्या कि विषय बदलून परत शिकणार. :-)
तू कधीच आमच्या बरोबर शिकायला किंवा कॉलेजला नव्हतास आणि आपली मैत्री सुद्धा सख्खी नव्ह्ती. तुझ्याशी ओळख होण्याचे कारण पण दुसरेच कोणीतरी होते आणि मैत्री म्हणजे काय हे देखील कदाचित नीट कळत नव्हते. पण आता १५ - १६ वर्षांनी मागे वळून बघता आम्ही जी मैत्री समजत होतो ती आणि आत्ता जी मैत्री अनुभवत आहोत ती ह्यात जमीन आसमानचा फरक दिसतो. मित्र भरपूर असतात पण मैत्री काहीच लोकांशी होते. निहेतुक, निगर्वी, निरागस, निखळ मैत्री लाभणे हे खरंच भाग्यवान असण्याचे लक्षण आहे.
महेश तू नेहमीच आम्हाला सडेतोड आणि व्यावहारिक सल्ले देतोस. तुझी मते परखड असतात आणि तुझे सांगणे पोट तीडकीचे असते. पण तू कायमच सर्व दृष्टीकोनातून विचार करून तुझे मत व्यक्त करतोस आणि तू ते करतांना लोकांना काय वाटेल किंवा ते काय म्हणतील, मित्राचे मन दुखावेल म्हणून तोंडदेखले गोड बोलण्याचा तुझ्या स्वभाव नाही. ऐखादी गोष्ट हाती घेतल्या नंतर तू कायमच पूर्णत्व्याला घेऊन जातोस. मला अजूनही आठवत आहे कि मध्ये मित्रानसाठी तू शेयर्सवर काही मेल्स पाठवल्या होत्यास आणि १३ ते १८ महिन्यांनी तू परत आधीच्या मेल्सचा संदर्भ देऊन आता त्या शेयर्सचे काय केले कि चांगला फायदा होईल याचाहि सल्ला दिला होतास. त्याचं प्रमाणे याही वेळी तू हा जो ब्लॉग लिहायला घेतला आहेस त्यातून आम्हाला कॅपिटल मार्केट, आर्थ-शास्त्रा बरोबरच मानवी संबंधीची चांगली माहिती होईल याची मला खात्री आहे. अचानक उदभवलेल्या परीस्तिथी, त्यामुळे झालेली मनाची दोलायमान स्थिती आणि त्यामुळे अनुभवलेले मानवी नाते संबंधांचे पैलू तुझ्या नजरेतून बघताना आणि समजून घेताना आम्ही नक्कीच समृद्ध होवू, मित्र म्हणून तुझा कदाचित अजून एखादा नवा पैलू पण पाहायला आणि अनुभवायला मिळेल. तुझ्या या ब्लॉग साठी म्या पामाराकडून हार्दिक शुभेच्छा.

Unknown said...

Too Good....

अविनाश said...

your blog is excellent..I liked all poems..They are Romantic as well as realistic...
Keep writing...

Avinash

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...