Thursday, November 26, 2020

कथा शेवटी तुझीच होती

 

कालची ती पौर्णिमा , आजची हि अमावस्या 

दोन्ही मंजूर होत्या मला 

कधी तुझ्या असण्याची, कधी नसण्याची 

चर्चा तुझीच होती , 


कधी गायली कहाणी, कधी छेडली विराणी, 

सुरात होत्या दोन्ही तुझ्या 

कधी झाले होते भक्त तुझे , कधी झाले दास होते 

मूर्ती तुझीच होती 



कधी झालो होतो तुझा, कधी तू माझी झाली होती 

कथा शेवटी  तुझीच होती 


एक थेंब  तुझ्यासाठी 

26 Nov 2020


No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...