एक तर्फी प्रेम ते हि तिचे, थोडी वेगळी गोष्ट आहे, बहुतेक वेळेला एक तर्फी प्रेम हे मुलांच्या माथी मारले जाते.
तरीही, तिची भावदृष्टी, मनाची हुरहूर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न आहे.
_____________________________________________________________________________
कळतंय काय तुला
पाझरतात हल्ली अश्रू आठवणीत तुझ्या
देतात थंडावा मनाला माझ्या
कापतात ओठ माझे चाहूलीनी तुझ्या
घालतात साद मनाला माझ्या
भिरभिरतात डोळे माझे पाहुनी तुला
गुंफतात स्वप्ने मग मनी माझ्या
हुरहुरते मन माझे, भेटीस तुझ्या
का लावतोस ओढ हि जीवा
कळतंय काय तुला, काय होतंय मला
कि वेडी मी बघते चंद्राला, अमावास्येला
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment