डांबिस नव्हे बावळट मी
तुला मी त्या दिवशी भेटलो, बहुतेक पहिल्यांदाच आपण भेटत होतो
हळू हळू ओळख वाढू लागली, ओढ एकमेकांना पटू लागली
त्यादिवशी धक्का लागून तुझी पर्स खाली पडली, अनेक गोष्टी मग रस्त्यावर
विखरून गेल्या, मी अधीरपणे विचारले त्यातल्या काही उचलुका ?
तू पटकन नको नको म्हणालीस.
आठवते का तुला त्या दिवशी फिरताना
पाय तुझा अचानक मुरगळला, खड्या कडे पाहून मग मीही डोळा मिचकावला
तुला म्हटले मी धरू का? घरी तुला सोडू का?
तू परत नको नको म्हणालीस
त्यादिवशी दोघेच जण बसलो होतो तळ्या काठी
हाती तुझ्या, शेंगदाण्याची पुडी, एक त्यातला खाताखाता
नको तिकडे उडाला, आणि आडकून बसला.
मी म्हटले काढू का ग त्याला? सोडवुका ग त्याला?
तू चटकन नको नको म्हणालीस
खाता खाता पाणीपुरी, एक पुरी ती टचकन फुटली
तुझ्या सार्या चेहर्यावरती पसरली,
मी झटकन रुमाल काढला, म्हटले तुला
पुसू का ग मी चेहरा तुझा?
तू परत नको नको म्हणालीस
फिरताना त्यादिवशी मधेच रस्ता ओलांडताना
भर्गाव वेगात गाड्या जाताना, तुझा चेहरा कावरा बावरा झाला
मी म्हटले तुला, धरू का ग हात तुझा?
तू बावरून नको नको म्हणालीस
त्यादिवशी कुठल्यातरी बहाण्याने सकाळी तुझ्या घरी आलो होतो
नुकतीच तू नाहून बाहेर आलेलीस, ओले मोकळे केस रुमालात बांधून
काही खात्याला केस मग त्या ड्रेस च्या हुक मध्ये आडकले
मी म्हटले तुला ते सोडवू का?
तू घाबरून नको नको म्हणालीस
त्यादिवशी सिनेमा बघताना, बुड्ढी के बाल खताना
काही तुझ्या नाकाला चिकटले
मी म्हटले तुला काढू देणा मला ते
तू पुन्हा एकदा नको नको म्हणालीस
त्या दिवशी आईसक्रीम खाता खाता हळूच तुझ्या
ओठांवरुनी एक थेंब हनुवटीवर ओघळला
मी अधीर पणे म्हटले टिपू का ग मी त्याला?
तू पुन्हा नको नको म्हणालीस
घरी होती आलेलीस तू, काहीतरी कामात होतीस मग्न तू
नकळत तुझे बोट कापले, रुधीरालाही मग पाय फुटले
मी म्हटले तुला पटकन, थांब मी हळद लावू का?
तू पुन्हा नको नको म्हणालीस
आज अचानक, घरी कोणी नाही बघून तू आलेलीस
मनात माझ्या घालमेल तू नजरेनेच जोखलीस
काही समजण्याच्या आता ओठ तुझे माझ्या ओठांवर टेकवलेस
आवेगाने मला मिठीत घेतलेस
पुरता बावरलो मी, तुझ्या अशा वागण्याने
घाबरत घाबरत तुला विचारले
काय ग काय झाले तुला आज एकदम?
ती- मुर्खा, किती दिवस नुसतेच प्रश्न विचारतोस,
सारे लक्ष तुझे माझ्या ओठांवरल्या नकाराकडे लावतोस.
डोळ्यांची भाषा तुला समजत का नाही?
दोनदा नकार म्हणजे! होकार असतो एवढे साधे तुला कळत नाही
वाट पाहुनी मी कंटाळले, म्हटले याचे प्रश्न हे करू का ते करू का संपणार नाहीत
किती झाले तरी तू हिम्मत काही करणार नाहीस
नुसतेच प्रोफाईल मध्ये नाव डांबिस लावतोस
प्रत्यक्षात बावळाटा सारखाच वागतोस.......
मुर्खा प्रश्न ओठांनी विचारतात उत्तर मात्र डोळ्यांनी देतात
........................................................
काही नाही तेंह्वा पासून मी माझे नाव डाम्बिस बदलून ............. ठेवले
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment