हा प्रश्न मी अनेकांना विचारला आहे, माझ्या मनातील इत्छा तुम्हालाही कधीतरी झाल्या असतीलच ना?
मी पुढे काही विचारत नाही कि कधी त्या पूर्ण झाल्या का? लोकच आपोआप उत्तर देतात....................................
इत्छापुर्ती
तुझ्या पदरात बांधू का ग चंद्राला,
तुझ्या हातात ठेवू का ग आयुष्याला
लपेटून टाकू का ग रात्रीला तुझ्या केसात
पाहू का ग स्वप्न तुझ्या डोळ्यात,
तुझ्या बटाना सावरू का ग ओठांनी माझ्या
फिरवू का ग बोटे तनुवरून तुझ्या
हळुवारपणे फिरवू का ग हात तुझ्या केसातून
घालू का ग विळखा तुझ्या कमरेला
ठेवू का ग हनुवटी माझी तुझ्या खांद्याला
टिपू का ग थेंब तुझ्या जीवणीवरचा
काढू का ग नक्षी तुझ्या पावलांवर
घासू का ग गाल माझे तुझ्या पोटावर
आठवतो आहे मी बसायचो आपण तळ्याकाठी
वाट बघत पहिल्या चुंबनाची
छे तुझ्या ओठांना ते कधीच मंजूर नव्हते
कोण म्हणतो सगळ्या इत्छा पूर्ण होतात ......
महेश उकिडवे
1 comment:
Kya baat hai... Very Romantic....
Post a Comment