Thursday, January 14, 2010

सोड वृथा अभिमान हा

सोड वृथा अभिमान हा

घेता तिने जवळ मजला, वादळा परी मिसळलो श्वासात तिच्या ,
जावून सांग त्या वाऱ्याला, सोड वृथा अभिमान हा (वादळाचा)

शिरलो मिठीत तिच्या, सर्वांग पेटलेले
जावून सांग त्या अग्नीला सोड वृथा अभिमान  हा (दाहकतेचा)

धुंदीत गेलो, बेहोष झालो, प्रीतीत तिच्या
जावून सांग त्या मोगर्याला सोड वृथा अभिमान हा (सुगंधाचा)

बरसली ती अशी कि झालो मी चिंब ओला
जावून सांग त्या पावसाला सोड वृथा अभिमान हा (बरसण्याचा, चिंब भिजवण्याचा)

पहिले डोळ्यात तिच्या, बुडलो पार खोलात मी
जावून सांग त्या सागराला सोड  वृथा अभिमान हा (खोलीचा)

चुंबिले ओठ तिचे , झालो असा मदहोष मी कि नशा हि फिकी पडावी
जावून सांग त्या मदिरेला सोड वृथा अभिमान हा (झीन्गण्याच्या, नशेला)

उडाला असा धुरळा प्रीतीचा तिच्या कि, झालो पाचोळा मग मी
जावून सांग त्या वादळाला सोड वृथा अभिमान हा (वादळी लाटांचा)

घेता मिठीत मजला तिने, व्यापून गेलो मी पुरता,
जावून सांग त्या नभाला सोड वृथा अभिमान हा (व्याप्तीचा)

वारा, अग्नी, पाउस, फुले, सागर, मदिरा, नभ आणि वादळे
सारे सारे फिके तिच्या पुढे, जाण आता तरी ह्या वेदांना

कशास वाचू मी वेद, पुराणे, आणि पोथ्या,
मोक्ष तो लाभला तिच्या मूळेच  आम्हाला...................................

महेश उकिडवे



सुफी संत नेहमीच अल्लाह म्हणजे ईश्वराला प्रेयसी ह्या स्वरुपात मानत आलेत. महाराष्ट्र मध्ये संतानी ईश्वराला विविध रुपात रंगवले आहे.  मीरा बाई ह्यांनी  ईश्वराला नवरा ह्या स्वरुपात रंगवून बहुतांश रचना लिहिल्या आहेत. संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या बाबत वेगळा आदर्श घालून  दिलेला आहे, त्यांनी ईश्वराला आई च्या रुपात रंगवले आहे.
शेवटी प्रत्येक जन कोणान कोणावर प्रेम तर करतोच , मग ते प्रेयसी किंवा प्रियकर असो, आई  असो कि इतर कोणीही.........
 
सुफी संत साहित्याचा थोडासा पगडा असलेली हि कविता आहे, जिथे  प्रेयसी ची  तुलना पंच-महाभूतांबरोबर  करून त्यांना दाखून  दिले आहे कि त्यांचा अभिमान हा किती तोकडा आहे ज्याच्या  जवळ प्रेम आहे...त्याला सारे जगच तोकडे वाटत.....नाही का?




No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...