Wednesday, June 30, 2010

पुन्हा कोणीतरी फसवले होते............

पुन्हा कोणीतरी फसवले होते.................
 
तुळशीची कथा आणि व्यथा, एका प्रेयसीच्या रुपात मांडण्याचा प्रयत्न आहे हा.  एवढेच सांगायचे आहे कि तिचे जीवापाड प्रेम त्याच्या चाहुलीने आंधळे होते, सगळे काही विसरून ती त्याची होते. लक्षात येते तेन्ह्वा भलतेच काहीतरी घडलेले असते.......

 
मनाची लाही लाही, अंगाचा दाह होत होता
व्याकुळता तिची पाहून तोहि वेड्यासारखा कोसळत होता
वाटे तिला पावसाळा दारी तिच्या  आला होता
तिला भिजवून आस मनीची पूर्ण करत होता
 
थेंब थेंब तिच्या तनुवरून ओघळत होते
लाज लज्जा सोडून सगळी कडे धावत होते
थेंबा थेंबा ने ती आणखीनच खुलत होती
ओली कळी जणू फुल बनून हसत होती
 
आभाळ फाटलेले तो तसाच बरसतच होता
इतक्या दिवसांचा विरह सगळा पूर्ण करत  होता
ती हि खुशाल त्याला अंगभर नाचवीत होती
सुंदरतेची वीजच ती खुशाल ढगांशी खेळत होती
 
इतक्यात तिला कळेना असे काय झाले होते
आल्यासारखा निघून गेला तो क्षणात सारे संपले होते,
पुन्हा कसे धरतीला कोरडे कोरडे वाटू लागले होते
ओल्या अंगणात पुन्हा विरहाचे उन सांडले होते
 
मग मघाशी झाले ते काय होते,
असे अचानक कोण आले होते
वाट ज्याची पाहत होती तो तर साक्षात आला होता ?????
 
हाय रे तो भ्रम तिचा तिलाच फसवून गेला होता
पडलेला पाऊसच होता न? कि कोण होता?
पाऊस पाऊस म्हणून वळवाच्या पावसाने
ऐन  वेळेला डाव वेगळा साधला होता
 
वळवाचा तो पाऊस आकाशातून तिला बघत होता
चिंब भिजलेली पाहून तिला तो तसाच थिजला होता
तिचे भिजलेले मन मात्र कातर झाले होते
सखा सखा म्हणून त्या पवित्र तुळशीला
पुन्हा एकदा कोणीतरी फसवले होते
 
महेश उकिडवे
 

Monday, June 21, 2010

ती च्या मनीची वेदना.............

ती च्या मनीची वेदना लिहिताना, वेगळी प्रेम कहाणी छेडली आहे.........तिचा त्याला होकार आहे. पण तिच्या आणि त्याच्या नात्यातले अंतर खूप वेगळे आहे...त्याने तिला मिळवले तर तिने त्याला दिले.........त्याला ती मिळाली हि भावना गर्वाची, काहीतरी मिळवल्याची, परंतु तिची भावना मात्र सारे काही दिल्याची. प्रेम दोघांचे वेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहे......त्याची सुख संवेदना तिची वेदना आहे.
 
 
ती च्या मनीची वेदना.............
 
तू नाते शोधलेस ते धाग्यात बांधलेले,
मी तेवढी प्रेम विणत होते रेशीम धाग्यातले 
 
तू बंधन मानलेस आपल्या श्वासांना,
मी तेवढी राहात गेले स्पंदन बनून हृदयात तुझ्या
 
तू वचन मागितले माझ्या कडे आयुष्यभराचे
मी तेवढी आयुष्य गुंफत होते तुझी भवती रे
 
तू सुख दुख शोधत होतास डोळ्यात माझ्या
मी दुख तेवढी ते वेचत राहिले पायवाटी  तुझ्या
 
तू शोधत होतास स्वप्ने माझ्या डोळ्यात
मी तेवढी पापण्या मिटून तुलाच साठवत राहिले
 
तुला कधीच जाणीव नव्हती काय माझ्या मनी
शोधलीस तू तुला हवी ती स्वप्ने माझ्या जीवनी
 
तू मागितलास होकार माझा,
परी तुला न कळले कधी मी तेवढी बापडी,
श्वास बनून तुझ्या आसमंती दरवळत राहिले
पणती होवून जीवनी तुझ्या जळत मी राहिले
 
महेश उकिडवे
 
 
 
 

Monday, June 14, 2010

काल आमचे खूप भांडण झाले .....

काल माझे आणि त्याचे जाम भांडण झाले
इतके कि वेळ हाणा मारी पर्यंत गेली
 
तिच्या वरून सारे भांडण झाले
 
तसा मी नेहमी संयमी आणि लाजरा
तो तसा नेहमीच धीट आणि थोडा आगावू
 
त्याला कधीच नव्हती भीड तिला उघड पणे बघण्याची
भीती मला वाटायची तिला चोरून सुद्धा पाहण्याची
 
तिला तसे बघताना याची नजर कधीच नाही चुकायची
तिचे रूप न्याहाळताना माझी नजर मात्र नेहमीच झुकायची
 
तिला हि नव्हती कसलीच चाड, त्याला तसे बघू  द्यायची
ती मला मात्र संयमाची सारी कुंपणे नेहमीच घालायची
 
ती झेलू द्यायची त्याला उडणारे तुषार, तिचे मोकळे केस  
मला साधी फुल माळायला सुद्धा वाट पाहायला लागायची
 
तो निर्लज्ज वेळ काळ सोडून तिला बघत राहायचा
मला मात्र एका दर्शन साठी तासनतास तिष्टत ठेवायची
 
शेवटी मला खूप राग आला त्याचा, अरे असे काय तुझ्यात
जे माझ्यात नाही, एवढा काय तू निराळा जो मला होता येत नाही
 
चिडून  आणि रागावून दिला एक ठोसा त्याला
हाय कर्म माझे तो हसला पण हात माझा रक्त बंबाळ झाला
 
धावून आली ती सगळा प्रकार आईकून,
कळेना तिला काय ह्या वेड्याला पाहावे सांगून
 
ती म्हणाली वेड्या, असा राग का काढतोस,
मी तुझीच आहे नाही कोण्या दुसर्याची हे माहित असूनही
 
माझा आरसा का तोडतोस...
 
महेश उकिडवे

आता मला आवरा ..........................

 आता मला आवरा   
 
येता पाऊस असा आक्रीत काय काय घडे
सखे तुझ्या माझ्या प्रेमाला आले पुन्हा भरते
 
ओठात ओठ गुंतवून केलेस तू शब्द बंद 
शब्दाविन बोलण्याचा मला जडला न्यारा छंद
 
केस तुझे ओले मोकळे पाठीवरती रुळे
मुग्ध पारिजातक जसा उधळतो गंध चोहीकडे
 
बिलगलो तुझ्या ओल्या पाठी निथळताना तू
सुटण्या ऐवजी गुंतत जाती कशा  बांधल्यास गाठी तू
 
ओल्या बटान  वरती  दिसती पावसाच्या  नाजूक कळ्या
फुलवण्या  त्यांना मज ओठांचा परीस स्पर्श हवा
 
हरवतो केसात तुझ्या जीव माझा बावरा
आला रे आला पाऊस, आता मला आवरा
 
 आता मला आवरा   
 
महेश उकिडवे
 

Tuesday, June 8, 2010

अशी कशी तू, अशी कशी तू

अशी कशी तू, अशी कशी तू
 
पाडून केस चेहऱ्यावर  का लपवतेस चंद्र तू
सारून केस मागे मग का दाखवतेस चंद्र तू
 
ओढून पदर तुझा का झाकतेस यौवन तू
सोडून वार्यावर पदराला का उधळ्तेस यौवन तू
 
सळसळनार्या कामिनीला का अशी बांधतेस तू
सोडून मग खुली तिला का होतेस दामिनी तू
 
येवून स्वप्नात माझ्या का अशी लाजतेस तू
बेदुंध होवून अशी स्वप्नात स्वतःच्या काय मागतेस तू
 
फुलांचे रंग ओढून का अशी रंगून जातेस तू
फुलांना मग रंग देवून का अशी खुलून जातेस तू
 
मिटून पापण्या का थांबवतेस तो पाऊस तू  
डोळ्यातले पाणी होवून का अशी कोसळतेस तू
 
कधी अशी तर कधी तशी तू , जिकडे तिकडे तूच तू
सांग मला अशी कशी तू, अशी कशी तू
 
महेश उकिडवे

Thursday, June 3, 2010

लम्हो की गुज़ारिश है पास आ जाए....

लम्हो की गुज़ारिश है  पास आ जाए.....
 
तो,
गुंतवूनी श्वास मोकळे होवूदेत मला
वाढवून  हृदयाची स्पंदने एकरूप होवूदेत मला
येना जवळ अशी का लाजतेस,
सांग मला थांबवू का कणा कणा नि ह्या क्षणाना
 
 ती,
थांब ना जरा पाहूदेत डोळ्यात तुझ्या
अंतरीचा भाव शोधुदेत जरा,
दोन डोळ्यांच्या मिठीत शिरुदेत मला
नको ना थांबवू या अशा क्षणांना, 
वाहुदेत मला डोळ्यातून तुझ्या
 
तो,
कशी पाहशील तुला माझ्या डोळ्यात जरा
दाटून येतील ते काळे मेघ अशावेळेला,
ओघळेल मग काजळ गालावरी तुझ्या
लाजेने चुरून, हलकेच ओघळून पसरुदेत  मला

ती,
घेता जवळी मजला स्पर्श तुझा असा झाला,
बासरीतुनी या अवीट असा सूर निघाला
पदरात  माझ्या लपेटून तुला,  देह असा मी अर्पिला
सांग सार्या जगाला ओरडूनी आता

देह परी दोन पण भाव मनीचा तो एकची उरीला

भाव मनीच तो एकची उरीला.........................
 
महेश उकिडवे
 

Tuesday, June 1, 2010

मोक्ष असा देशील का?


मोक्ष असा देशील का?  काय म्हणायचे आहे मला.?????

हि कल्पना तिची म्हणून लिहिली आहे, दूर देशी गेला साजन, आठवण त्याची येते तिला. कधी डोळ्यात पाणी येते तर कधी त्याच्या आठवणीने व्याकूळ होते ती.

तिला ह्या सार्या मधुनी सुटून जायचे आहे.  रोज रोज जळणारा हा विरह एकदा मिटवून टाकायचा आहे.  अशा काहीश्या विचित्र भाव वियोगातून खालील ओळी साकारल्या आहेत.

हलकेच अधून मधून पडणार्या पावसाच्या सरींनी तिला कसे व्याकूळ आणि भेभान केले आहे त्याची हि कथा थोडीशी व्यथा म्हणून मांडली आहे..............................

__________________________________________________________________________________



मोक्ष असा देशील का?

डोळ्यात सांजवेळी आठवणींचे आभाळ दाटलेले
येवून तू अशावेळी साजणा, पाऊस होवून वाहशील का?

वेड्या मानस चाहूल लागते तुझी, होतात भास उगीच का
येवून तू अशावेळी  साजणा, ओल्या काळजाला पाहशील का?

मोहरून गेलीत गात्रे, माळून गजरा उभी  मी उंबरठ्यात 
येवून तू अशावेळी साजणा, स्पर्शुनी माझ्या तनुला जाशील का?

अंग अंग पेटलेले आणि असा हा अवेळी पाऊस कोसळणारा
येवून अशावेळी साजणा, ओला मारवा हा छेडशील का?

हळू हळू ओल्या मिठीत तुझ्या मी कापरापरी जळते
येवून अशावेळी साजणा, फुंकर मारून मला थांबवशील का?

सोडून लाज लज्जा जाळते  मी देह सारा तुझ्या साठी,
येवून अशावेळी साजणा, हा यज्ञ प्रेमाचा पुरा करशील का?

हवीत कशाला आणि कोणाला  मंत्र ,समिधा आणि अग्नीकुंडे....

ओल्या ओठांनी स्पर्शुनी मजला, आगळा वेगळा....

मोक्ष असा देशील का? मोक्ष असा देशील का?

महेश उकिडवे
 

प्रेम कशाला म्हणतात तेच हल्ली मला कळत नाही.

प्रेम कशाला म्हणतात तेच हल्ली मला कळत नाही.

तुझ्या ओठांचे ठसे आणि तू दिलेल्या जखमा
मला दोन्ही सारख्याच  वाटू लागल्या आहेत
खुण म्हणा कि व्रण दोन्ही कडे दिसतो
अंतरीचा दाह पण दोन्ही कडे सारखाच उरतो.

तुझी पावलांचे ठसे आणि तुझ्या आठवणी
मला दोन्ही सारख्याच वाटू लागल्या आहेत
हळव्या मनावर छाप तर दोन्ही पाडून जातात
प्रत्येक टप्प्यावर मैलाचा दगड बनून उरतात

आपले  कोवळे क्षण आणि तुझ्या गुंतलेल्या बटा
मला तर पुन्हा दोन्ही सारखेच वाटू लागले आहेत
आठवून सारखे सारखे मला छळू  लागले आहेत
ओल्या मनाला पुन्हा पुन्हा गुंतवू लागले आहेत

तू दिलेली हळवी स्वप्ने आणि तुझी सावली
मला दोन्ही हल्ली सारखीच वाटू लागली आहेत
दोन्ही माझी पाठराखण करू लागली आहेत
दिवसरात्र  दोन्ही  माझी सोबत करू लागली आहेत

अशा सारख्या सारख्या वाटणाऱ्या गोष्टींचा गुंता मला
सोडवता येत नाही.......................
प्रेम कशाला म्हणतात तेच हल्ली मला कळत नाही.

महेश उकिडवे

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...