Monday, January 18, 2010

सखे जाताना.......

सखे जाताना.......

सखे जाताना तो जाईच्या फुलांचा गजरा तेवढा माळून जा...
धुंध झालेला गंध तेवढा माझ्या साठी ठेवून जा....

सखे का तुझी आठवण यावी आता....
का जीव एवढा कासावीस होई  आता....
असून सगळे माझ्या कडे काहीच नाही आता....
रात्रीचा तो निशिगंध तेवढा पुन्हा एकदा फुलवून जा...

सखे जाताना तो जाईच्या फुलांचा गजरा तेवढा माळून जा.......

गंधाचा  बाजार भरला आहे सभोवताली
कुठला त्यातला माझा माहित नाही मलाही
सखे तू सांडलेला तो गंध फुलांचा तेवढा आवरून जा
जाता जाता एक थेंब त्यातला मला देवून जा

सखे जाताना तो जाईच्या फुलांचा गजरा तेवढा माळून जा.......

संपेल रात्र हि अशीच स्वप्ना मधुनी
उतरेल मग तो चंद्र हि त्या झुल्यावारुनी
जाता जाता त्याचे चांदणे तू घेवून जा
कवडसा असेल जर तुझ्या कडे एखादा तो मला देवून जा

सखे जाताना तो जाईच्या फुलांचा गजरा तेवढा माळून जा.......

सखे  उद्याही येशील याचे वचन मला देवून जा...

महेश उकिडवे

No comments:

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...