तू भिजू नकोस ग पावसात एवढी,
पाहतो तुला भिजताना मी मात्र जळत राहतो,
होवुनी तो (पाउस) चिंब मला मात्र कोरडा पाडतो
त्याचे हे नेहमीच असे असते,
छत्रीत मी उभा
तर ती नेहमी धारांमध्ये नहात असते..
मग मी हि काही कमी नाही त्याला वेडावून दाखवतो,
म्हणतो साल्या (हि शिवी नाही) किती दिवस असे वागशील
चार महिने संपले कि काय करशील....????
आईकुन मग हे, तो आणखी मला चिडवतो
कोसळून मुसळधार तिला चिंब चिंब करतो....
संपतो त्याचा धिंगाणा मग चार महिन्यांनी
तिचेही मन तो तृप्त तृप्त करतो ......
एवढा तो कोसळूनही मी मात्र कोरडा कोरडा रहातो ....
येता थंडी मग, मला ती आठवू लागते......
थंडीत मग कधी गुलाबी, कधी रेशमी मिठी मला मारून बसते
उबदार मिठीत माझ्या हळू हळू ती फुलू लागते
पण आता तो जळत बसतो होवून शेकोटी
प्रणय माझा डोळे लाल करून बघत असतो
हळू हळू थंडीही मग पळते, तशी तीही दूर जाते
विरहाची आग मग आम्हा दोघांना जाळू लागते
मग तो पुन्हा पुढे होतो, थंडीतला सगळा राग तो काढतो
त्याच्या सहस्त्र किरणांनी दोघांना भाजून काढतो,
होते उदास मग मन दोघांचे
हळू हळू भेटीची ओढ वाढू लागते ,
एक मेकांच्या धुन्धीत बरसण्याची चाहूल लागू लागते
येतो मग आम्ही दोघे जवळ पुन हा एकदा
पाहून ते तो पुन्हा बरसू लागतो
मी भाबडा व्याकुळतेने तिला म्हणू लागतो
तू भिजू नकोस ग पावसात एवढी,
पाहतो तुला भिजताना मी मात्र जळत राहतो,
होवुनी तो (पाउस) चिंब मला मात्र कोरडा पाडतो
महेश उकिडवे
ज्ञानोबाच्या, ना तुक्याच्या वंशाचा मी, ना गदिमा, बोरकर, खानोलकर, कुसुमाग्रजांच्या जातीतला मी, ना मी पुलं, शन्ना, वपू च्या पंथातला मी, ना मी गुरु, संदीप च्या जात्कुळातील मी, मग मी कोण? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ह्या ब्लॉग च्या माध्यमातून लिखाण करणार आहे. सदर ब्लॉग हा, कॅपिटल मार्केट, आर्थ-शास्त्र , मानवी संबंध ह्याला समर्पित असेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार
मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी शोधीत होती , भरकटलेल्या वादळात मिळेल का मला एक हळवे बेट प्रश्नांच...
-
नजरबंदी नव्हे ती एक मुकी मैफिल होती .... मोकळ्या शब्दांची ती अनोखी कैद होती फुटतील कसे बापुडे, अधरांचीच तर ती कैफ होती
-
भलते सलते वागणे तुझे .... चांदण्यात फिरताना हळूच हात माझा धरतेस , हलकेच माझ्या कानात काहीतरी सांगतेस, गालातल्या गालात मग खुदकन हसतेस हल्ल...
No comments:
Post a Comment