Friday, April 30, 2010

जहाँ प्यार होता है वहां नाराजगी नहीं होती, उम्मीद होती है.......

जहाँ प्यार होता है वहां नाराजगी नहीं होती,  उम्मीद होती है..........
तेरी उम्मीद तेरा इंतजार जबसे है , इंतजार जबसे है...
न दिन को शब् से शिकायत, न शब् को दिन से है.............
 
स्वप्नात हरवून बसलो, प्रेमालाच नोकरी मानून करत बसलो

शोधले तुला आयुष्यभर, नंतर कळले हरवले स्वतःलाच,

आता शोधतो स्वतःला, मांडतो हिशोब काय गमावले काय मिळवले

मिळवले  काही, भंगलेली स्वप्ने, गुलाबाच्या जुन्या पाकळ्या,

रंग उडालेली काही दुखे , गंजलेल्या वेदना , ठसठसनार्या जखमा

एवढे सगळे झाल्यवर कळले ,प्रेमात काही मिळवायचे नसते

हिशेब मांडतात काय गमावले याचा

गमावले बरेच काही , आता काही आठवत नाही
 
पण लोक दबक्या आवाजात कुजबुज करतात सध्या ..........

जाना जाता था मै, आमिर उमराव, अशर्फियोंके तराजू में तोलता था हर चीज को |
तुने एक बार क्या नजर फेर दी आज कल एक आसूं की भी कीमत अदा नहीं कर पाता  हूँ  मै |
 
महेश उकिडवे

इन दिनो दिल मेरा मुझसे है केह रहा

ह्या ला मूर्खपणा  म्हण किंवा काहीतरी बरळणे म्हण पण जे आज सुचत आहे ते लिहित आहे ...कदाचित काहीतरे वेगळे अर्थ हीन आहे असे वाटेल पण दरवेळेला प्रत्येक गोष्टीन मधून अर्थ निघालाच पाहिजे का? मला नाही वाटत काही वेळेला अर्थहीन गोष्टी केल्या तरी चालतात .......
 
आज नाही का पाऊस पडला , मुंबई मध्ये कधीतरी एप्रिल मध्ये पाऊस पडतो का? पण बरे वाटले न एप्रिल मध्ये मातीचा वास घेवून ? तसेच काहीतरे झाले मला  आज, सकाळी सकाळी मातीचा वास आला मला वाटले तूच आलीस कि काय ....तू अंघोळ करून येतेस तेन्ह्वा आसाच वास येतो बरेच वेळेला....  कळला का ह्यातला अर्थ तुला.
 
आग धरती जशी तापली आसते आणि पावसा मुले मोहरून जाते मग जी धुंधी तिला चढते तिला लोक सुगंध म्हणतात ...तू अंघोळ करून आलीस कि मग केस झटकताना जे थेंब माझ्या अंगावर उडतात त्याचमुळे माझे हि काही असेच होते  ...लोक ऑफिस मध्ये गेलो कि म्हणतात आज काय निराळाच रंग आहे तुमचा.
 
त्यादिवशी तुला पहिले, तसा आधी नेहमीच आपण भेटत होतो एकमेकांना , पण त्या दिवशी तुझ्या डोळ्यात का कुणास ठावूक काय दिसले....
मला हलकेच जाणीव झाली प्रेमाची , काही न काळात आपोआप दोन अश्रू खाली आले डोळ्यातून, उगाच मी ते पुसून टाकले पटकन, आणि समजूत घातली कि डोळ्यात काहीतरी गेले असेल, किंवा जोरात जांभई दिली मी म्हणून पण असेल... कबूल करेल लगेच तर ते मन कुठले  हजार शंका उगाचच आढेवेढे घेण्यात त्याला मजा येत असावी बहुतेक...
मग कळले इतके दिवस आपण जे करत होतो ते प्रेम नव्हते मग काय होते ? फसवणूक मनाची..... येह दिल जो है ना इसे बेवकूफ बनके रखाथा.....
 
आता सगळेच वेगळे घडू लागले आहे, साध्या  साध्या गोष्टीत सुधा मन किती रमू लागले आहे..  एखादे पडलेले मोगर्याचे फुल, किंवा सांडलेल्या कुठेतरी गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा आता अगदी आवडू लागल्या आहेत.. अगदी कचरा कुंडीत फेकून दिलेले गिफ्ट चे रंगीत कागद सुद्धा आता हळवे वाटू लागले आहेत. जुना ड्रेस , जुने पेन अगदी तुटलेली चप्पल सुद्धा तुझी आठवण सांगू लागली आहे.. आणि गम्मत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता चं आठवू लागल्या आहेत , पूर्वी ठरवून सुद्धा अनेक गोष्टी आठवत नव्हत्या ......
 
चहा पिताना वाटते कोणी तरी शेअर करायला हवे, आईसक्रीम खाताना एकटे खावू नये असे वाटते , पाणीपुरी कोणाला तरी हाताने भरवावी, एरवी स्वतः साठी भर भरून खरेदी करायचो  आता तिच्या साठी करण्यात मजा येत आहे..
 
एवढे सगळे होवून पण मजा येत आहे पण कोणालाच हे सगळे पटत नाहीये  ........कारण काय तर म्हणे लग्न झाल्यवर नवरा बायकोने एकमेकांवरच प्रेम केले पाहिजे.
 
तसे नाही झाले तर ........................
 
विचारू नका काय वाटेल ते बोलायला लोक तयार होतात .........
 
आणि हो हे सगळे बोलणारे ...कभी कभी , कभी अलविदा ना केहना सारखे चित्रपट मोठ्या आवडीने बघतात   अगदी मज्जा घेत घेत ....
 
अर्थात चित्रपटात जे दाखवतात ते अगदीच उथळ असते , बाकी जीवनात तसे काही नसते....वगैरे वगैरे ठरलेल्या कमेंट टाकायला मोकळे
 
एकदा मोकळा श्वास घेवून बघा ...तुम्हाला समजेल ........भारतातील (मी इथे फक्त अरेंज विवाह बद्दल बोलत आहे) अरेंज विवाह ना मोडण्या मागचे कारण हे कि तो आपण मोडायला तयार नसतो म्हणून...अन्यथा किती जण मनापासून प्रेम करतात जोडीदारावर ....... सवय म्हणून नाही...
 
परंतु हे समजण्या इतपत आजून आपला समाज मंगळसूत्र मधेच अडकला आहे .......कारण विवाह बंधन हे शरीर बंधन जास्त आहे मनोमिलन कमीच....
 
थोडेसे काय बर्याच जणांना न पटण्या सारखे आहे .....  पण काय करणार सत्य आहे...
 
शेवटी काही ओळी गुणगुणत रहावेसे वाटत आहे ...... इन दिनो दिल मेरा मुझसे है केह रहा तू ख्वाब सजा ....तू जिले जरा .......
 
महेश उकिडवे

Monday, April 26, 2010

ओठ आणि डोळे

ओठ आणि डोळे

ओठ जरी अबोल तुझे , डोळे तुझे बोलतात
मनातील गुपित ओठ बघ सारखे लपवतात
ठरवून तू येतेस काही न सांगायचे गुपित
पुन्हा पुन्हा तुझे लबाड डोळे सारखे ते फोडतात

डोळ्यांची भाषा तुझ्या कशी मला कळणार
मिटून घेतेस पापण्या सारख्या मी कसे ते वाचणार
ओठांचे बोल मला कसे कळणार
मुग्ध ते असतात नेहमी , सांग  कधी ते बोलणार

डोळे तुझे एवढे गहिरे का ग
सागराला सुद्धा तळ असतो हे त्यांना कोण सांगणार
ओठ तुझे एवढे मोहक का ग
रत्ने देखील शेवटी फिकी त्या पुढे हे कोण त्यांना समजावणार

डोळे तुझे अबोल जरी बोलतात किती ते
हि भाषा त्यांना सारखी कोण शिकविते
ओठ तुजे किती किती म्हणून बोलतात
शब्द आणि अर्थ लावण्यात माझी आयुषे खर्ची होतात

डोळे आणि ओठ एवढेच मला कळतात
प्रेम दोघे करतात पण वेगवेगळे मांडतात
वेगवेगळे प्रेम जरी भावना एकच असते
मी तुझीच राहीन हीच तर सोप्पी गोष्ट असते

महेश उकिडवे

स्फटिकाचे मोल हे सोन्या पेक्षा जास्त आसते हे ते हरवले कि कळते..

ती विचारते त्याला मी उद्या भेटायला येताना तुझ्या साठी काय आणू.....तो सांगतो परत परत काही नको ...तरी टि खूपच हट्ट धरते ..सांग सांग काय हवे तुला?
त्याची मागणी बघून ती स्तब्ध होते आणि विचारते काय करणार आहेस तू ह्या सगळ्यांचे .....तो संवाद टिपलाय  एक स्फुटक म्हणून....
असे काहीसे किस्से आपल्या आयुष्यात घडतच असतात ....वेळीच त्यांच्या कडे बघा ....नाहीतर परीस शोधता शोधता, जीवनातील स्फटिक केन्ह्वाच हरवून जातील.......

स्फटिकाचे मोल हे सोन्या पेक्षा जास्त आसते हे ते हरवले कि कळते....

तो :

माझ्या साठी तू रात्री बघितलेली स्वप्ने आण
माझ्या साठी तू तुझ्या मानेवरून ओघळणारा घामाचा थेंब आण
माझ्या साठी तू केसातून खाली आलेला तो थेंब आण ज्याचा प्रवास झाला आहे
तुझ्या टॉवेल ला गळून अडकलेले  थोडेसे केस आण
तुझे खावून झाल्यावर ज्या पेपर टिशु ला तुझे ओठ पुसलेस तो आण
तुझ्या हाताने काढलेली केसांची पिन आण
तुझ्या ड्रेस ची मोडलेली इस्त्री आण
तुझ्या पायाची धूळ आण
तुझ्या आयुष्यातील सगळ्या कटकटी त्रास आण
तुझी तुटलेली चप्पल आण , तेवढी एक आठवण होईल मला
तुझ्या आठवणी आण तुझ्या मनातील साठवण आण
तुझे जुने नेलपेंट आण, त्याचा ब्रुश मला हवा आहे.
तुझी सावली आणशील का येताना


ती : हे सगळे घेवून तू काय करणार आहेस

तोच : 

तुझी रात्री ची स्वप्ने मी डोळ्यात साठवून ठेवीन , पुन्हा पुन्हा हवी तेन्हवा पाहीन
तुझ्या घामाच्या थेंब ला मी जीवनात स्थान देईन , मग जीवन कशाला अळणी होईल माझे
तुझ्या केसातून खाली आलेला थेंब, मी गंगा  म्हणून मनाच्या देव्हार्यात  ठेवीन,
मेल्यावर मी माझ्या तोंडात टाकायला सांगीन...
तुझे गाळलेले केस मी पांघरून झोपीन ,,तुला त्रास नको म्हणून
तुझी पिन मी हलकेच धरून ठेवीन तुझे केस मोकळे आहेत ह्याची आठवण म्हणून
तुझे ओठ ज्याला लागले तो पेपर मी जपून ठेवीन, लोक म्हणतील ह्याच्याकडे  सोन्याचा पेपर आहे कारण त्याला परीस स्पर्श झाला आहे
तुझ्या पायाची धूळ मी जपून ठेवीन, सांगेन कबरीवर टाका माझ्या , निदान जिवंत पाणी नाही तरी निदान मेल्यावर तरी तुला पांघरून घेईन कायम साठी.
तुझ्या ड्रेस ची मोडलेली इस्त्री मी जपून ठेवीन काही चुरगळून गेलेल्या आठवणी म्हणून
तुझे त्रास मी ठेवून घेईन तुझे आयुष्य सुखी व्हावे म्हणून
तुझी तुटलेली चप्पल मी ठेवीन माझ्या कडे माझ्या तुटलेल्या स्वप्नाची आठवण म्हणून
तुझ्या मनातील आठवणी आण त्या मुरवून मी साठवेन पाहिजे तेन्हवा चाखून बघण्या साठी
तुझे नेल पेंट आणि ब्रुश मी जपेन कारण एवढ्या हळुवार तुझ्या नखांवर कोण फिरतो त्याचा मला हेवा वाटतो म्हणून.
 
 
आता एवढे सांगून तू काहीच नाही आणलेस आणि नुसतीच आलीस तरी चालेल ........कारण ह्या सगळ्या पेक्षा तू आलीस कि मला आजून काहीच नको ...
 
महेश उकिडवे

Sunday, April 25, 2010

प्रश्न आणि उत्तर हि माझीच

प्रश्न आणि उत्तर हि माझीच........
 
असे काहीतरी वेड्या सारखे प्रश्न आणि त्याची वेड्या सारखी उत्तरे........त्या वेड्या मनाची हि अवस्था कि त्या मनावर तिने केलेले गारुड...सोडवत तो हा बसतो एकटा  ............................................................................

सांग न मला उन्हाळ्यात का पडतो पाऊस, असा वेडा
तू केस धुवून झटकलेस का सकाळी सकाळी...
 
सांग न मला का पडतो दुष्काळ असा पाऊस पडूनही
रोखलेस का अश्रू डोळ्यात तुझ्या तू असे अवेळी
 
सांग न मला हा कडक उन्हाळा एवढा छान का वाटावा  
हलकेच काल स्वप्नात मारलीस का मिठी मला
 
सांग न मला संध्याकाळी आकाश का होते गुलाबी
सूर्य वेडा लाजून लाल होतो संध्याकाळी म्हणून का?
 
सांग न मला चंद्र वेडा पांढरा फटक का पडला असा
तुला रात्री पाहताना तो सूर्य वेडा त्याला तुझ्या मिठीत दिसला
 
सांग न मला अमावास्येला कुठे जातो तो चंद्र आणि चांदण्या
माळतेस का तू चंद्र आणि चांदण्या केसात तुझ्या
 
सांग मला, प्रश्न माझे आणि उत्तरे हि वेडी आहेत का?
कि हि तुझी जादू मनावर माझ्या .....
 
 
महेश उकिडवे
 

Thursday, April 22, 2010

सांगा मला काय चूक त्या थेंबाची, तिची आणि त्याची ......

तिने सांगितलेली कहाणी तिच्या अंगावरून ओघळणार्या थेंबाची, त्याच्या प्रवासाची, त्याची (तिचा तो)  इत्छा, तो थेंब त्याने व्हावे, तिची कल्पना त्याने आहे तसेच राहावे.
थेम्बाने मांडलेले प्रवास वर्णन थेंबा च्या शब्दात शब्दश:
__________________________________________________________________________________________________________
 
केसातून तुझ्या माळत येतो , एक एक वळण घेत येतो
गुरफटून जातो बटेत तुझ्या, वाट शोधात खाली येतो
 
येवून तुझ्या कपाळी औत्सुक्याने तुझे ललाट वाचतो मी 
कुंकवाचे नशीब नाही माझ्या साठी तरी  तिथेच रेंगाळतो मी
 
येवून पापण्यांवर तुझ्या डोळ्यात वाकून स्वप्ने बघतो मी
हरवून डोळ्यात तुझ्या, हलकेच गालावर येतो मी
 
तुझे गोबरे गोबरे गाल हळूच चुम्बुनी माझाच  मी लाजतो
तुझ्या आरक्त ओठांवर क्षणभर का होईना विसावतो मी
 
हलकेच हनुवटी वरून  तुझ्या चेहर्याला पाहतो मी
येता गळ्यावरून खाली , कंठी तुझ्या दाटतो मी
 
प्रश्न मला पडतो आता जावे आणि किती खाली जावे मी
हिम्मत धरून तुझ्या गळ्यावरून तुझ्या वक्षी उतरतो मी
 
सौंदर्य, गोलाई, उभारी,डोळे भरून  पाहता लोचनी तृप्त होतो मी
पाय निघता निघत नाही माझा असा लोचट मग होतो  मी
 
तुझ्या नितळ पोटा वर उतरता उतरता बेभान होतो मी
तुझ्या नाभीची खोली मोजण्या हलकेच आत डोकावतो मी
 
उतरुनी तुझ्या कामाक्षी मांडीवरुनी पोटरी तुझ्या स्थिरावतो मी
थांबून मग हलकेच, पाहून वरती मूर्तिमंत सौंदर्य  न्याहाळतो मी
 
वेगाने खाली येत पावलांवरून, अंगठ्याच्या टोकावर येवून थांबतो मी
वाट बघत तिथेच अडकतो , थांबतो  मी ......कोणीतरी सोडवावे आता मला
 
तो येतो मग तिच्या पायावर डोके ठेवून हलकेच मला
तीर्थ म्हणून पिवून मोकळा होतो..........
 
पाणी म्हणून सुरु झालेला थेंबाचा प्रवास , त्या प्रेमी साठी
तीर्थ होवून संपतो...
 
थेंबा थेंबा ची हीच कहाणी , ती रोज रोज पाहते
तो हि तसाच रोज रोज त्या थेंबा वरती जळत रहातो
 
सांगा मला काय चूक त्या थेंबाची, तिची आणि त्याची ......
 
महेश उकिडवे
 

Wednesday, April 21, 2010

त्याच परीक्षेला बसतो..

काल तुझे बोट कापले ; तुला माझी आठवण झाली
वाटले मी तुला मेसेज करावा, मी केला न तुला मेसेज.
 
त्या दिवशी तुला साहेब खूप रागावला होता , तुझा मूड फारच खराब होता
वाटले तुला मी आत्ता फोन करावा , केला होता न मी फोन त्या दिवशी.
 
त्या दिवशी पुण्यात तूच गाडी ठोकलीस, चूक तुझीच होती
सगळे तुला ओरडले, कोण चिडलेले मग? समजूत काढण्यासाठी मीच फोन केला होता.
 
तुला कंटाळा आला होता, तुला वाटत होते कि मी यावे भेटायला
कसा काय कोण जाणे पण त्या दिवशी मी आलो होतो भेटायला.
 
दर वेळेस हे असेच होते, तुला वाटते मी फोन करावा,
मेसेज करावा, भेटायला यावे, मी नेहमीच येतो.
 
तरी पण तुझे आपले दर वेळेस फुलाच्या पाकळ्या तोडत बसणे
त्याचे माझ्यावर प्रेम आहे कि नाही हा प्रश्न विचारत बसणे.
 
माहित असुन उत्तर का तोडतेस ती नाजूक फुले दरवेळेला
खेळ तुझा होतो राणी , दिलासा तुला  मिळतो..
 
थोडा विचार कर ना, दरवेळेला तुझ्या खेळात
नेहमी नेहमी पास होवूनही,
जीव माझा सारखा त्याच त्याच परीक्षेला बसतो.......
 
महेश उकिडवे
 
 

Saturday, April 17, 2010

अजून एक कवीमय.....(4)

अजून एक कवीमय.....(4)




घेवून बसलो तुला शरदाच्या चांदण्यात मिठीत मी

झाली पहाट तरी सुटेना मिठी,

सूर्याने हि पहिले तुला मला, तो हि अवाक झाला

तप्त होवून त्याने ग्रीष्माच्या बाणांनी हल्ला केला



कुठे परवा तुला आणि मला ते शरदाचे चांदणे कि , ग्रीष्माचे भाजणे

मिठीतून एकमेकांच्या एकमेकला असे ओळखणे

जसे रात्री ने चंद्राच्या चांदण्यात स्वतःला पहाणे



साठवून स्वप्ने बघा जरा डोळ्यात माझ्या

तहानलेल्या नजरेला देना दिलासा जरा माझ्या

वीरघळू देत मला खोल खोल डोळ्यात तुझ्या

कशास हे असे ओषाळायाचे



गेल्या कुठे त्या जागणाऱ्या रात्री , गेले कुठे ते चंद्र तारे

गेली कुठे ती पहाटेची स्वप्ने , गेल्या कुठे त्या सोनेरी कडा

रात्र कि दिवस फरक असा तुला नि मला का पडेना



वळून पाहती लोक पुन्हा पुन्हा माझ्या कडे

कुठे ती मिठी कुठे तिचे असणे

वेड्यागत माझे असे वाट पाहत बसणे



सांगून गेले "फ़ैज़ आहमेद फ़ैज़"

तेरी उमीद तेरा इंतज़ार जब से है

ना शब को दिन से शिकायत ना दिन को शब से है



महेश उकिडवे

Thursday, April 15, 2010

शमा कही जलती होगी

अजून एक कवीमय.....(३)
 
शमा कही जलती होगी
 
उभी मी वाट पाहत त्याची उंबरठ्यात , त्याची आपली रंगते संध्याकाळ गोकुळात
पदर पसरून मी अंथरल्या पायघड्या , तो आपला मश्गुल फुलांवर चालण्यात
 
अश्रू मी ठेवले वाढून पाय धुण्या साठी तो आपला पाय दुमडून  बसलाय  खुशीत
उबदार मिठींची कवाडे मी ठेवली खुली, तर सुटतोय कुठे तो नझर कैदेतून तिच्या
 
काळीज काढून मी अंथरले त्याच्या साठी , तो आपला अजूनही गुलाबी मिठीत
रडून रडून झाली फुले अश्रूंची  माझ्या , तो आपला अजूनही धुंध वेणीत गुरफटलाय
 
सुटले माझे श्वास , तुटला माझा ध्यास , तरी तो आपला गुंततोय श्वासातून तिच्या
 
कळेना मला आज काय होतंय , त्याला कि मला?
काय बिनसलंय आज त्याचे कि माझे? .......
 
ओह्ह्ह गुलझार साहेब म्हणतात ते खर असेल कदाचित.....
 
"शाम से शमा जली देख रही है रास्ता,
कोई परवाना इधर आया नही, देर हुई
सौत होगी मेरी, जो पास में जलती होगी"
 
महेश उकिडवे
 
 

Tuesday, April 13, 2010

बरळतो काहीही आज काल

कविमय च्या प्रकारातील अजून एक कविता.........................................................................................................
 

आजकाल नशेत असतो मी.. काहीही बरळतो
लोक टाळ्या वाजवून त्याला काव्य म्हणतात
कोणी वाह वाह म्हणून दाद देतात ........
 
काल तर चक्क मी तुझी तुलना चंद्राशी केली
बघ केवढा लाजला, रोज रोज थोडा कमी होतोय
लोक म्हणतात, बरळला काहीतरी हा , कारण अमावस्येला झाला..
 
मी तुझ्या देहाची तुलना नदीशी केली,
ऐकून  चक्क भेफाम ती धावू लागली
लोक म्हणतात ह्याच्या मूळे सरळ नदी नागमोडी होवू लागली
 
मी तुझ्या डोळ्यांची तुलना अंधार्या रात्रीशी केली
रात्रीलाही मग काय झाले कोणास ठावूक
चंद्राला विनवण्या करून ती रोज रोज बोलावू लागली
 
मी तुझ्या रुपाची तुलना केली काल पावसाशी
बेधुंध होवून कोसळतोय काल पासून वेडा
लोक म्हणतात आज काल पावसाचे काही खरे नाहीये...
 
आज काल सगळ्या दारू ची नशाच संपून गेली आहे
कुठलीही मी पितो तरी मिलावट वाटते
काही झाले तरी नशा चढतच नाही .......
 
"मोहम्मद  ईक़्बल  नकीब" म्हणतात कदाचित खरच असेल
येह  जो  हलका  हलका  सुरूर  है
सब  तेरी  नझर  का  कुसूर  है
तुन्हेय  जाम  लाबोन  से  पिला  दिया
मुझेय  एक  शराबी  बना  दिया  रे
 
महेश उकिडवे
 
 
 
 
 
 

Monday, April 12, 2010

तू ये ना प्लीज माझ्या साठी नाही तरी इतरांसाठी ये

खाली लिहिलेल्या प्रकाराला कवीमय असे म्हणतात, तुम्हाला आवडणाऱ्या कवीच्या काही ओळी शेवटी लिहायच्या, त्याच्या आधी त्या ओळींना धरून संपूर्ण कविता , काव्य, लघु काव्य लिहायचे. पंच हा त्या शेवटच्या ओळीतून आला पाहिजे, म्हणजे तुमच्या आवडत्या कवीचे समरन तर होतेच शिवाय तुम्ही लिहिलेल्या कवितेला आशयघनता प्राप्त होते.
बघा प्रयत्न करून मी करतोय. माझे आवडते कवी गुलझार साहेब.

___________________________________________________________________________



तू ये न काहीतरी सांग न प्लीज
माझ्या साठी नको येवूस, नाही आलीस तरी चालेल
इतरांसाठी तरी ये प्लीज.

जे तुझ्या अंगणात उभे आहेत तासंतास
वाट बघत तुझी , डोळ्यात अश्रू ठेवून
पायाही आता त्यांचे दुखू लागले असतील
नजर हि त्यांची मावळू लागली असेल

तू ये ना प्लीज माझ्या साठी नाही तरी इतरांसाठी ये
तू ये ना तयांचे साठी तरी ये

बघ ते किती थांबलेत तुझ्यासाठी, माझ्या  सारखेच...
डोळ्यातून वाहून , ओंजळीतून ओघळणारे पाणीही संपले आहे
पूजा तुझी बांधून झाली आता फुले सुकण्याची वेळ आहे
सकाळचा सूर्य देखील गेला कंटाळून , तोही मावळती कडे झुकतो आहे

तू ये ना प्लीज माझ्या साठी नाही तरी इतरांसाठी ये
तू ये ना त्यांचे साठी तरी ये

तू का येत नाहीस, तुझी जाणीव तरी त्यांना करून दे
मला विश्वास आहेस कि तू येशील माझ्या साठी नाही
तरी त्यांच्या साठी येशील, अस्तित्व तुझे सार्यांना दाखवून देशील
तुझ्या प्रेमाचा एक कवडसा सार्यांना थोडा का होईना पण मिळूदेत

मला नाही तर नाही तरी पण इतरांना तरी त्या चांदण्यात नाहुदेत
मला अंधाराची सवय आहे, इतरांना नाही ,
चांदणीच्या का होईना प्रकाशात त्यांना रस्ता दाखवून दे,
एक हलकासा कवडसा त्यांना भेट म्हणून दे

तू ये ना प्लीज माझ्या साठी नाही तरी इतरांसाठी ये
तू ये ना त्यांचे साठी तरी ये

नाहीतर मग गाइड मधला देव आनंद मला व्हावे लागेल
मिटवून मला, तुझे अस्तित्व त्यांना दाखवावे लागेल
मला उपास झेपत नाहीत, भक्ती हि माझी तेवढी खोलवर नाही
मग कसे दाखवू मी तुझे अस्तित्व त्यांना?

किमान मी नाही गुलझार म्हणतात तसे तरी कर
"जब धुआँ देता, लगातार पुजारी
घी जलाता है कई तरह के छौंके देकर
इक जरा छींक ही दो तुम...


तुझे अस्तित्व दाखवून दे

मला नाही दिलेस तरी चालेल पण प्रेम तुझे इतरांना भर भरून दे

महेश उकिडवे

Sunday, April 11, 2010

काय काय नाही शिकले मी..

हलकेच तिने तिच्या मनातली भावना सांडली...ती टिपून घेण्याचा हळुवार प्रयत्न आहे...
_______________________________________________________________

काय काय नाही शिकले  मी..
पूर्ण  रात्र कुशी बदलून झोपायला, कि  रात्र रात्र जागायला
डोळे मिटून जागे राहायला , कि उघड्या डोळ्यांनी स्वप्ने बघायला
एकटीच खुदकन हसायला कि सगळ्यांमध्ये एकटी राहायला
तू नसताना आठवणी काढून रडायला कि रडून तुझी आठवण काढायला
काय काय  नाही शिकले मी ...असे काही होताना
हलकेच पदर वार्यावरती सोडायला कि हळूच पदराशी चाळे करायला
आरशात उभे राहून रूप पाहायला कि आरशाला रोज रोज चिडवायला
हळूच गोड गुपित लपवायला कि प्रत्येक गोष्टच गुपित मानायला
गालवरती येणारी लाली लपवायला कि लटका राग नाकावर आणायला
काय काय  नाही शिकले मी ...असे काही होताना
हळूच आसवे गाळायला कि कोपर्यात बसून मुसुमुसु रडायला
नजर  हळूच चोरायला कि नजरेला नजर भिडवून लाजायला
हळूच कुशीत शिरायला कि मिठीत शिरून बिलगायला
हाक मारून तुला जवळ बोलवायला कि तुझ्या हाकेला ओ द्यायला

काय काय  नाही शिकले मी ...असे काही होताना
लोक म्हणू लागले मला पडली हि प्रेमात रे म्हणून असे काही होते हिला
शिकतो जो तो नेहमी असेच काही, आसे काही होताना
माहित नाही मलाही खरे  कि खोटे काय ते
परंतु उमगले मला फरक कोणता
वेदना म्हणजे काय आणि संवेदना म्हणजे काय
शिकले मी वेदना होवुनी, संवेदना व्हायला
शिकले मी वेदना होवुनी संवेदना व्हायला....
महेश उकिडवे

Thursday, April 8, 2010

कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......

कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......

पहिली तुला त्या दिवशी चोरून तुझ्या नकळत
कळेना काय झाले मला, राहिलो कुठे मी माझा
तुझी ती पाठमोरी आकृती कि सुंदर मूर्ती नक्षिवली
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली...

चित्र पुढे उभे कि, वास्तव मलाच कळेना
प्रतिमा कि आभास हा गुंताच सुटेना
पाहून तुला अशी, समाधी माझी भंग पावली
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली...

तुझे ते नाहून आलेले रूप, ओघळणारे काही थेंब
हलकेच केसांना बांधून  ठेवलेला तो नाजूक रुमाल
ओल्या मानेवर रुळणारे केस कि ओला झालेला ड्रेस
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......

घाबरत कि चाचरत हळूच तुझ्या मागे मागे आलो
सोडवून रुमाल तो,  नकळत ओठ मानेवर टेकवता झालो
ओली मान,ओले केस, ओघळणारे दोन थेंब मी पिता झालो
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......

शहारा तुझ्या अंगावर उठला, रोमा रोमात भिनला
मागे वळून डोळ्यांनी तुझ्या मला नकळत इशारा केला
टेकवून ओठ ओठांवर हलकेच तो क्षण हळवा केला
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......

कासावीस झालो त्या क्षणाला , विचारीत होतीस तू पुढे काय
विचार करूनही सुचेना पुढे काय , पुढे काय, करावे तरी काय
जागा झालो स्वप्ना मधुनी काही कळायच्या आताच
सावली माझी स्वप्ने ओलांडून केन्ह्वाच पुढे निघून गेली

कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......

महेश उकिडवे

मला नेहमी प्रश्न पडतो हे असे का?

अनेक वेळा आपण नको ते प्रश्न उगाच मनात आणतो, नंतर कधीतरी कळते अरेच्या हे प्रश्न थोडी होते ते तर हळवे क्षण होते, जपून ठेवण्याच्या  आधीच उडाले ते  अशाच काही क्षणाची गुंफण.........

__________________________________________________________________________________

मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी तू घालतेस हिरवा  चुडा , कधी तो काढून टाकतेस 
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी चंद्र तुझा अमावास्येलाही  उजळतो तर कधी पौर्णिमेला तो निद्रिस्त असतो
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी केस मोकळे सोडतेस, तर कधी माझे विस्कटून टाकतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी समुद्राची रेती हातात घेतेस तर कधी ओंजळीतून पाणी सोडून देतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी घालतेस तू मोगरा तर कधी तो उधळून टाकतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी सकाळी मला उठवतेस आणि कधी हळूच मिठीत झोपतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी डोळ्यातून वाहतेस तर कधी डोळ्यातून हसतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी ओठांवर विसावतेस तर कधी ओठांवरून ओघळून जातेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी केस घट्ट बांधून घेतेस तर कधी मला त्यात गुंतवून टाकतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी हळुवार पणे फुंकर घालतेस तर कधी सोसाट्याचा वारा होतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी काळीज पोखरून जाईल अशी हाक मारतेस तर कधी काळीज होवून जातेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
ह्या प्रश्नांची उत्तरे शोधत मी फिरतो वेडा .....
विसरून जातो कि हे प्रश्न थोडेच आहेत,  हे तर आहेत हळवे क्षण .......
उत्तरांच्या नादात ते सुद्धा गमावून बसतो...
 
महेश उकिडवे
 
 
 
 
 

Monday, April 5, 2010

कोडे हे मला नेहमी पडावे

'विदेश' म्हणून एक माझे मित्र आहेत, त्यांच्या "मी  मोरपीस व्हावे" ह्या गझलेला दिलेले हे उत्तर आहे.
 
मला नेहमी वाटते कि मी एक मोरपीस व्हावे
हळुवारपणे तू मला गालावरून फिरवावे
 
मला नेहमी वाटे मी एक झरा व्हावे
तुझ्या अंतःकरणातून नेहमी वहावे
 
मला नेहमी वाटे मी करंगळी व्हावे
तू हळूच मला दाता खाली दाबावेस
 
मला नेहमी वाटे मी एक स्वप्न व्हावे
तू मला रात्री हळूच पाहावेस
 
मला नेहमी वाटे मी वार्याची झुळूक व्हावे
तुझ्या केसांना  अलगद पणे मी उडवावे
 
मला नेहमी वाटे मी पाउस व्हावे
तू मला अंगावर घेवून चिंब चिंब व्हावे
 
मला नेहमी वाटे मी श्वास व्हावे
शेवट पर्यंत तुझ्या सोबत असावे
 
नेहमी नेहमी मलाच का असे वाटावे
होतात अश्रूंची फुले  तरीही तुला हे का न पटावे?
कोडे हे मला नेहमी पडावे, कोडे हे मला नेहमी पडावे
 
महेश उकिडवे
 
 

Sunday, April 4, 2010

कितीदा?

मला बर्याच  जणांनी विचारले कि तू नेहमी रोमांटीक का लिहितोस? थोडा दुखः पण लिहित जा?
खरा आहे दुख लिहिणे वाटते तितके सोपे नाही, तरी पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
असाच एक प्रयत्न

कितीदा?

जिंकावयास डाव राहिले कुठे आताषा
सांग मला
हरलेले डाव मी खेळू कितीदा?

डोळे उघडून पाहण्या राहिले काय
सांग मला
मिटून डोळे तुला मी पाहू कितीदा?

नाहीत शिल्लक उरात स्वप्ने काही आता
सांग मला
संपलेली स्वप्ने मी जागवू कितीदा?

संपत नाही दिवस माझा येतही नाही रात्र
सांग मला
उरलेल्या रात्री मी जागवू कितीदा?

तू दिलेल्या आठवणी येत नाहीत, येवूनही त्या जात नाहीत
सांग मला
जखम झालेली उराशी मी वागवू कितीदा?

तुझ्या लेखी नाही मी कोणी सांगशील कितीदा
सांग मला
तू दिलेला घाव मी जगाला दाखवू कितीदा?

शोधूनही सापडत नाही वाट मला, हरवून जातो कित्येकदा
सांग मला
डोळ्यात तुझ्या मी मला हरवू कितीदा?

बरसत नाहीत हल्ली श्रावणात धारा
सांग मला
होवून अश्रू डोळ्यातुनी मी वाहू कितीदा?

जगणे काही संपता संपेना, श्वास माझा सुटता सुटेना
सांग मला
संपून श्वास मी जगू कितीदा?

जिंकावे आता काही न उरले जगात या
सांग मला
नियती पुढे मी हरावे तरी कितीदा?

येणार नाहीस तू, बोलावूनही माहित असूनही
सांग मला
वेडी आशा मी बाळगू कितीदा?

चालतो एकटा परी मी, चुकलेली दिशा धरुनी
सांग मला
चुकलेली पायवाट मी तुडवू कितीदा?

माहित असूनही उत्तर सार्यांचे
सांग मला  तोच तोच प्रश्न मी विचारू कितीदा?
त्याच त्याच चुका मी उगाळू कितीदा?
त्याच त्याच चुका मी उगाळू कितीदा?

महेश उकिडवे

Thursday, April 1, 2010

करशील का?

करशील का?




सगळे सोडून मी चाललो,

तुझ्या केसातला मोगरा तेवढा मला देशील का?



सगळे दुख: मी कोळून प्यायलो,

उरले जे मनात ढाळायला खांदा तुझा देशील का?



मोकळे केले तुला सार्या शपथा मधुनी

राहिली तेवढी एक माझ्या ओठी सोडवून जाशील का?



वाचत राहिलो आयुष्य भर मी डोळ्यातुनी

कळली नाही काही पाने तेवढी वाचून जाशील का?



विसरून गेलो सारी स्वप्ने मी जाता जाता

राहिली काही मनात माझ्या सांग त्यांना जाळून जाशील का?



गेले उडून सारे गंध आता

आहे मागे तो वेडा एक गंध सांग त्याला देशील का?



पुसल्या मी खुणा सार्या जाता जाता

राहिली एक खुण तेवढी माथ्यावर तुझ्या ....



नको नको तेवढी एक तुलाच ठेवून घेशील का?



महेश उकिडवे

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...