Monday, April 26, 2010

स्फटिकाचे मोल हे सोन्या पेक्षा जास्त आसते हे ते हरवले कि कळते..

ती विचारते त्याला मी उद्या भेटायला येताना तुझ्या साठी काय आणू.....तो सांगतो परत परत काही नको ...तरी टि खूपच हट्ट धरते ..सांग सांग काय हवे तुला?
त्याची मागणी बघून ती स्तब्ध होते आणि विचारते काय करणार आहेस तू ह्या सगळ्यांचे .....तो संवाद टिपलाय  एक स्फुटक म्हणून....
असे काहीसे किस्से आपल्या आयुष्यात घडतच असतात ....वेळीच त्यांच्या कडे बघा ....नाहीतर परीस शोधता शोधता, जीवनातील स्फटिक केन्ह्वाच हरवून जातील.......

स्फटिकाचे मोल हे सोन्या पेक्षा जास्त आसते हे ते हरवले कि कळते....

तो :

माझ्या साठी तू रात्री बघितलेली स्वप्ने आण
माझ्या साठी तू तुझ्या मानेवरून ओघळणारा घामाचा थेंब आण
माझ्या साठी तू केसातून खाली आलेला तो थेंब आण ज्याचा प्रवास झाला आहे
तुझ्या टॉवेल ला गळून अडकलेले  थोडेसे केस आण
तुझे खावून झाल्यावर ज्या पेपर टिशु ला तुझे ओठ पुसलेस तो आण
तुझ्या हाताने काढलेली केसांची पिन आण
तुझ्या ड्रेस ची मोडलेली इस्त्री आण
तुझ्या पायाची धूळ आण
तुझ्या आयुष्यातील सगळ्या कटकटी त्रास आण
तुझी तुटलेली चप्पल आण , तेवढी एक आठवण होईल मला
तुझ्या आठवणी आण तुझ्या मनातील साठवण आण
तुझे जुने नेलपेंट आण, त्याचा ब्रुश मला हवा आहे.
तुझी सावली आणशील का येताना


ती : हे सगळे घेवून तू काय करणार आहेस

तोच : 

तुझी रात्री ची स्वप्ने मी डोळ्यात साठवून ठेवीन , पुन्हा पुन्हा हवी तेन्हवा पाहीन
तुझ्या घामाच्या थेंब ला मी जीवनात स्थान देईन , मग जीवन कशाला अळणी होईल माझे
तुझ्या केसातून खाली आलेला थेंब, मी गंगा  म्हणून मनाच्या देव्हार्यात  ठेवीन,
मेल्यावर मी माझ्या तोंडात टाकायला सांगीन...
तुझे गाळलेले केस मी पांघरून झोपीन ,,तुला त्रास नको म्हणून
तुझी पिन मी हलकेच धरून ठेवीन तुझे केस मोकळे आहेत ह्याची आठवण म्हणून
तुझे ओठ ज्याला लागले तो पेपर मी जपून ठेवीन, लोक म्हणतील ह्याच्याकडे  सोन्याचा पेपर आहे कारण त्याला परीस स्पर्श झाला आहे
तुझ्या पायाची धूळ मी जपून ठेवीन, सांगेन कबरीवर टाका माझ्या , निदान जिवंत पाणी नाही तरी निदान मेल्यावर तरी तुला पांघरून घेईन कायम साठी.
तुझ्या ड्रेस ची मोडलेली इस्त्री मी जपून ठेवीन काही चुरगळून गेलेल्या आठवणी म्हणून
तुझे त्रास मी ठेवून घेईन तुझे आयुष्य सुखी व्हावे म्हणून
तुझी तुटलेली चप्पल मी ठेवीन माझ्या कडे माझ्या तुटलेल्या स्वप्नाची आठवण म्हणून
तुझ्या मनातील आठवणी आण त्या मुरवून मी साठवेन पाहिजे तेन्हवा चाखून बघण्या साठी
तुझे नेल पेंट आणि ब्रुश मी जपेन कारण एवढ्या हळुवार तुझ्या नखांवर कोण फिरतो त्याचा मला हेवा वाटतो म्हणून.
 
 
आता एवढे सांगून तू काहीच नाही आणलेस आणि नुसतीच आलीस तरी चालेल ........कारण ह्या सगळ्या पेक्षा तू आलीस कि मला आजून काहीच नको ...
 
महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...