Sunday, April 25, 2010

प्रश्न आणि उत्तर हि माझीच

प्रश्न आणि उत्तर हि माझीच........
 
असे काहीतरी वेड्या सारखे प्रश्न आणि त्याची वेड्या सारखी उत्तरे........त्या वेड्या मनाची हि अवस्था कि त्या मनावर तिने केलेले गारुड...सोडवत तो हा बसतो एकटा  ............................................................................

सांग न मला उन्हाळ्यात का पडतो पाऊस, असा वेडा
तू केस धुवून झटकलेस का सकाळी सकाळी...
 
सांग न मला का पडतो दुष्काळ असा पाऊस पडूनही
रोखलेस का अश्रू डोळ्यात तुझ्या तू असे अवेळी
 
सांग न मला हा कडक उन्हाळा एवढा छान का वाटावा  
हलकेच काल स्वप्नात मारलीस का मिठी मला
 
सांग न मला संध्याकाळी आकाश का होते गुलाबी
सूर्य वेडा लाजून लाल होतो संध्याकाळी म्हणून का?
 
सांग न मला चंद्र वेडा पांढरा फटक का पडला असा
तुला रात्री पाहताना तो सूर्य वेडा त्याला तुझ्या मिठीत दिसला
 
सांग न मला अमावास्येला कुठे जातो तो चंद्र आणि चांदण्या
माळतेस का तू चंद्र आणि चांदण्या केसात तुझ्या
 
सांग मला, प्रश्न माझे आणि उत्तरे हि वेडी आहेत का?
कि हि तुझी जादू मनावर माझ्या .....
 
 
महेश उकिडवे
 

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...