Sunday, April 11, 2010

काय काय नाही शिकले मी..

हलकेच तिने तिच्या मनातली भावना सांडली...ती टिपून घेण्याचा हळुवार प्रयत्न आहे...
_______________________________________________________________

काय काय नाही शिकले  मी..
पूर्ण  रात्र कुशी बदलून झोपायला, कि  रात्र रात्र जागायला
डोळे मिटून जागे राहायला , कि उघड्या डोळ्यांनी स्वप्ने बघायला
एकटीच खुदकन हसायला कि सगळ्यांमध्ये एकटी राहायला
तू नसताना आठवणी काढून रडायला कि रडून तुझी आठवण काढायला
काय काय  नाही शिकले मी ...असे काही होताना
हलकेच पदर वार्यावरती सोडायला कि हळूच पदराशी चाळे करायला
आरशात उभे राहून रूप पाहायला कि आरशाला रोज रोज चिडवायला
हळूच गोड गुपित लपवायला कि प्रत्येक गोष्टच गुपित मानायला
गालवरती येणारी लाली लपवायला कि लटका राग नाकावर आणायला
काय काय  नाही शिकले मी ...असे काही होताना
हळूच आसवे गाळायला कि कोपर्यात बसून मुसुमुसु रडायला
नजर  हळूच चोरायला कि नजरेला नजर भिडवून लाजायला
हळूच कुशीत शिरायला कि मिठीत शिरून बिलगायला
हाक मारून तुला जवळ बोलवायला कि तुझ्या हाकेला ओ द्यायला

काय काय  नाही शिकले मी ...असे काही होताना
लोक म्हणू लागले मला पडली हि प्रेमात रे म्हणून असे काही होते हिला
शिकतो जो तो नेहमी असेच काही, आसे काही होताना
माहित नाही मलाही खरे  कि खोटे काय ते
परंतु उमगले मला फरक कोणता
वेदना म्हणजे काय आणि संवेदना म्हणजे काय
शिकले मी वेदना होवुनी, संवेदना व्हायला
शिकले मी वेदना होवुनी संवेदना व्हायला....
महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...