Thursday, April 22, 2010

सांगा मला काय चूक त्या थेंबाची, तिची आणि त्याची ......

तिने सांगितलेली कहाणी तिच्या अंगावरून ओघळणार्या थेंबाची, त्याच्या प्रवासाची, त्याची (तिचा तो)  इत्छा, तो थेंब त्याने व्हावे, तिची कल्पना त्याने आहे तसेच राहावे.
थेम्बाने मांडलेले प्रवास वर्णन थेंबा च्या शब्दात शब्दश:
__________________________________________________________________________________________________________
 
केसातून तुझ्या माळत येतो , एक एक वळण घेत येतो
गुरफटून जातो बटेत तुझ्या, वाट शोधात खाली येतो
 
येवून तुझ्या कपाळी औत्सुक्याने तुझे ललाट वाचतो मी 
कुंकवाचे नशीब नाही माझ्या साठी तरी  तिथेच रेंगाळतो मी
 
येवून पापण्यांवर तुझ्या डोळ्यात वाकून स्वप्ने बघतो मी
हरवून डोळ्यात तुझ्या, हलकेच गालावर येतो मी
 
तुझे गोबरे गोबरे गाल हळूच चुम्बुनी माझाच  मी लाजतो
तुझ्या आरक्त ओठांवर क्षणभर का होईना विसावतो मी
 
हलकेच हनुवटी वरून  तुझ्या चेहर्याला पाहतो मी
येता गळ्यावरून खाली , कंठी तुझ्या दाटतो मी
 
प्रश्न मला पडतो आता जावे आणि किती खाली जावे मी
हिम्मत धरून तुझ्या गळ्यावरून तुझ्या वक्षी उतरतो मी
 
सौंदर्य, गोलाई, उभारी,डोळे भरून  पाहता लोचनी तृप्त होतो मी
पाय निघता निघत नाही माझा असा लोचट मग होतो  मी
 
तुझ्या नितळ पोटा वर उतरता उतरता बेभान होतो मी
तुझ्या नाभीची खोली मोजण्या हलकेच आत डोकावतो मी
 
उतरुनी तुझ्या कामाक्षी मांडीवरुनी पोटरी तुझ्या स्थिरावतो मी
थांबून मग हलकेच, पाहून वरती मूर्तिमंत सौंदर्य  न्याहाळतो मी
 
वेगाने खाली येत पावलांवरून, अंगठ्याच्या टोकावर येवून थांबतो मी
वाट बघत तिथेच अडकतो , थांबतो  मी ......कोणीतरी सोडवावे आता मला
 
तो येतो मग तिच्या पायावर डोके ठेवून हलकेच मला
तीर्थ म्हणून पिवून मोकळा होतो..........
 
पाणी म्हणून सुरु झालेला थेंबाचा प्रवास , त्या प्रेमी साठी
तीर्थ होवून संपतो...
 
थेंबा थेंबा ची हीच कहाणी , ती रोज रोज पाहते
तो हि तसाच रोज रोज त्या थेंबा वरती जळत रहातो
 
सांगा मला काय चूक त्या थेंबाची, तिची आणि त्याची ......
 
महेश उकिडवे
 

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...