पहिली तुला त्या दिवशी चोरून तुझ्या नकळत
कळेना काय झाले मला, राहिलो कुठे मी माझा
तुझी ती पाठमोरी आकृती कि सुंदर मूर्ती नक्षिवली
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली...
चित्र पुढे उभे कि, वास्तव मलाच कळेना
प्रतिमा कि आभास हा गुंताच सुटेना
पाहून तुला अशी, समाधी माझी भंग पावली
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली...
तुझे ते नाहून आलेले रूप, ओघळणारे काही थेंब
हलकेच केसांना बांधून ठेवलेला तो नाजूक रुमाल
ओल्या मानेवर रुळणारे केस कि ओला झालेला ड्रेस
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......
घाबरत कि चाचरत हळूच तुझ्या मागे मागे आलो
सोडवून रुमाल तो, नकळत ओठ मानेवर टेकवता झालो
ओली मान,ओले केस, ओघळणारे दोन थेंब मी पिता झालो
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......
शहारा तुझ्या अंगावर उठला, रोमा रोमात भिनला
मागे वळून डोळ्यांनी तुझ्या मला नकळत इशारा केला
टेकवून ओठ ओठांवर हलकेच तो क्षण हळवा केला
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......
कासावीस झालो त्या क्षणाला , विचारीत होतीस तू पुढे काय
विचार करूनही सुचेना पुढे काय , पुढे काय, करावे तरी काय
जागा झालो स्वप्ना मधुनी काही कळायच्या आताच
सावली माझी स्वप्ने ओलांडून केन्ह्वाच पुढे निघून गेली
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......
कळेना मला सावली कधी माझी हळूच पुढे गेली......
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment