Sunday, April 4, 2010

कितीदा?

मला बर्याच  जणांनी विचारले कि तू नेहमी रोमांटीक का लिहितोस? थोडा दुखः पण लिहित जा?
खरा आहे दुख लिहिणे वाटते तितके सोपे नाही, तरी पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
असाच एक प्रयत्न

कितीदा?

जिंकावयास डाव राहिले कुठे आताषा
सांग मला
हरलेले डाव मी खेळू कितीदा?

डोळे उघडून पाहण्या राहिले काय
सांग मला
मिटून डोळे तुला मी पाहू कितीदा?

नाहीत शिल्लक उरात स्वप्ने काही आता
सांग मला
संपलेली स्वप्ने मी जागवू कितीदा?

संपत नाही दिवस माझा येतही नाही रात्र
सांग मला
उरलेल्या रात्री मी जागवू कितीदा?

तू दिलेल्या आठवणी येत नाहीत, येवूनही त्या जात नाहीत
सांग मला
जखम झालेली उराशी मी वागवू कितीदा?

तुझ्या लेखी नाही मी कोणी सांगशील कितीदा
सांग मला
तू दिलेला घाव मी जगाला दाखवू कितीदा?

शोधूनही सापडत नाही वाट मला, हरवून जातो कित्येकदा
सांग मला
डोळ्यात तुझ्या मी मला हरवू कितीदा?

बरसत नाहीत हल्ली श्रावणात धारा
सांग मला
होवून अश्रू डोळ्यातुनी मी वाहू कितीदा?

जगणे काही संपता संपेना, श्वास माझा सुटता सुटेना
सांग मला
संपून श्वास मी जगू कितीदा?

जिंकावे आता काही न उरले जगात या
सांग मला
नियती पुढे मी हरावे तरी कितीदा?

येणार नाहीस तू, बोलावूनही माहित असूनही
सांग मला
वेडी आशा मी बाळगू कितीदा?

चालतो एकटा परी मी, चुकलेली दिशा धरुनी
सांग मला
चुकलेली पायवाट मी तुडवू कितीदा?

माहित असूनही उत्तर सार्यांचे
सांग मला  तोच तोच प्रश्न मी विचारू कितीदा?
त्याच त्याच चुका मी उगाळू कितीदा?
त्याच त्याच चुका मी उगाळू कितीदा?

महेश उकिडवे

1 comment:

vaishali said...

mahes... gr8 buddy. just great.. loved it.. keep it up.. lots of love

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...