Thursday, April 8, 2010

मला नेहमी प्रश्न पडतो हे असे का?

अनेक वेळा आपण नको ते प्रश्न उगाच मनात आणतो, नंतर कधीतरी कळते अरेच्या हे प्रश्न थोडी होते ते तर हळवे क्षण होते, जपून ठेवण्याच्या  आधीच उडाले ते  अशाच काही क्षणाची गुंफण.........

__________________________________________________________________________________

मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी तू घालतेस हिरवा  चुडा , कधी तो काढून टाकतेस 
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी चंद्र तुझा अमावास्येलाही  उजळतो तर कधी पौर्णिमेला तो निद्रिस्त असतो
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी केस मोकळे सोडतेस, तर कधी माझे विस्कटून टाकतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी समुद्राची रेती हातात घेतेस तर कधी ओंजळीतून पाणी सोडून देतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी घालतेस तू मोगरा तर कधी तो उधळून टाकतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी सकाळी मला उठवतेस आणि कधी हळूच मिठीत झोपतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी डोळ्यातून वाहतेस तर कधी डोळ्यातून हसतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी ओठांवर विसावतेस तर कधी ओठांवरून ओघळून जातेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी केस घट्ट बांधून घेतेस तर कधी मला त्यात गुंतवून टाकतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी हळुवार पणे फुंकर घालतेस तर कधी सोसाट्याचा वारा होतेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
कधी काळीज पोखरून जाईल अशी हाक मारतेस तर कधी काळीज होवून जातेस
मला नेहमी प्रश्न पडतो  हे असे का?
 
ह्या प्रश्नांची उत्तरे शोधत मी फिरतो वेडा .....
विसरून जातो कि हे प्रश्न थोडेच आहेत,  हे तर आहेत हळवे क्षण .......
उत्तरांच्या नादात ते सुद्धा गमावून बसतो...
 
महेश उकिडवे
 
 
 
 
 

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...