काल तुझे बोट कापले ; तुला माझी आठवण झाली
वाटले मी तुला मेसेज करावा, मी केला न तुला मेसेज.
त्या दिवशी तुला साहेब खूप रागावला होता , तुझा मूड फारच खराब होता
वाटले तुला मी आत्ता फोन करावा , केला होता न मी फोन त्या दिवशी.
त्या दिवशी पुण्यात तूच गाडी ठोकलीस, चूक तुझीच होती
सगळे तुला ओरडले, कोण चिडलेले मग? समजूत काढण्यासाठी मीच फोन केला होता.
तुला कंटाळा आला होता, तुला वाटत होते कि मी यावे भेटायला
कसा काय कोण जाणे पण त्या दिवशी मी आलो होतो भेटायला.
दर वेळेस हे असेच होते, तुला वाटते मी फोन करावा,
मेसेज करावा, भेटायला यावे, मी नेहमीच येतो.
तरी पण तुझे आपले दर वेळेस फुलाच्या पाकळ्या तोडत बसणे
त्याचे माझ्यावर प्रेम आहे कि नाही हा प्रश्न विचारत बसणे.
माहित असुन उत्तर का तोडतेस ती नाजूक फुले दरवेळेला
खेळ तुझा होतो राणी , दिलासा तुला मिळतो..
थोडा विचार कर ना, दरवेळेला तुझ्या खेळात
नेहमी नेहमी पास होवूनही,
जीव माझा सारखा त्याच त्याच परीक्षेला बसतो.......
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment