'विदेश' म्हणून एक माझे मित्र आहेत, त्यांच्या "मी मोरपीस व्हावे" ह्या गझलेला दिलेले हे उत्तर आहे.
मला नेहमी वाटते कि मी एक मोरपीस व्हावे
हळुवारपणे तू मला गालावरून फिरवावे
मला नेहमी वाटे मी एक झरा व्हावे
तुझ्या अंतःकरणातून नेहमी वहावे
मला नेहमी वाटे मी करंगळी व्हावे
तू हळूच मला दाता खाली दाबावेस
मला नेहमी वाटे मी एक स्वप्न व्हावे
तू मला रात्री हळूच पाहावेस
मला नेहमी वाटे मी वार्याची झुळूक व्हावे
तुझ्या केसांना अलगद पणे मी उडवावे
मला नेहमी वाटे मी पाउस व्हावे
तू मला अंगावर घेवून चिंब चिंब व्हावे
मला नेहमी वाटे मी श्वास व्हावे
शेवट पर्यंत तुझ्या सोबत असावे
नेहमी नेहमी मलाच का असे वाटावे
होतात अश्रूंची फुले तरीही तुला हे का न पटावे?
कोडे हे मला नेहमी पडावे, कोडे हे मला नेहमी पडावे
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment