ह्या ला मूर्खपणा म्हण किंवा काहीतरी बरळणे म्हण पण जे आज सुचत आहे ते लिहित आहे ...कदाचित काहीतरे वेगळे अर्थ हीन आहे असे वाटेल पण दरवेळेला प्रत्येक गोष्टीन मधून अर्थ निघालाच पाहिजे का? मला नाही वाटत काही वेळेला अर्थहीन गोष्टी केल्या तरी चालतात .......
आज नाही का पाऊस पडला , मुंबई मध्ये कधीतरी एप्रिल मध्ये पाऊस पडतो का? पण बरे वाटले न एप्रिल मध्ये मातीचा वास घेवून ? तसेच काहीतरे झाले मला आज, सकाळी सकाळी मातीचा वास आला मला वाटले तूच आलीस कि काय ....तू अंघोळ करून येतेस तेन्ह्वा आसाच वास येतो बरेच वेळेला.... कळला का ह्यातला अर्थ तुला.
आग धरती जशी तापली आसते आणि पावसा मुले मोहरून जाते मग जी धुंधी तिला चढते तिला लोक सुगंध म्हणतात ...तू अंघोळ करून आलीस कि मग केस झटकताना जे थेंब माझ्या अंगावर उडतात त्याचमुळे माझे हि काही असेच होते ...लोक ऑफिस मध्ये गेलो कि म्हणतात आज काय निराळाच रंग आहे तुमचा.
त्यादिवशी तुला पहिले, तसा आधी नेहमीच आपण भेटत होतो एकमेकांना , पण त्या दिवशी तुझ्या डोळ्यात का कुणास ठावूक काय दिसले....
मला हलकेच जाणीव झाली प्रेमाची , काही न काळात आपोआप दोन अश्रू खाली आले डोळ्यातून, उगाच मी ते पुसून टाकले पटकन, आणि समजूत घातली कि डोळ्यात काहीतरी गेले असेल, किंवा जोरात जांभई दिली मी म्हणून पण असेल... कबूल करेल लगेच तर ते मन कुठले हजार शंका उगाचच आढेवेढे घेण्यात त्याला मजा येत असावी बहुतेक...
मग कळले इतके दिवस आपण जे करत होतो ते प्रेम नव्हते मग काय होते ? फसवणूक मनाची..... येह दिल जो है ना इसे बेवकूफ बनके रखाथा.....
आता सगळेच वेगळे घडू लागले आहे, साध्या साध्या गोष्टीत सुधा मन किती रमू लागले आहे.. एखादे पडलेले मोगर्याचे फुल, किंवा सांडलेल्या कुठेतरी गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा आता अगदी आवडू लागल्या आहेत.. अगदी कचरा कुंडीत फेकून दिलेले गिफ्ट चे रंगीत कागद सुद्धा आता हळवे वाटू लागले आहेत. जुना ड्रेस , जुने पेन अगदी तुटलेली चप्पल सुद्धा तुझी आठवण सांगू लागली आहे.. आणि गम्मत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता चं आठवू लागल्या आहेत , पूर्वी ठरवून सुद्धा अनेक गोष्टी आठवत नव्हत्या ......
चहा पिताना वाटते कोणी तरी शेअर करायला हवे, आईसक्रीम खाताना एकटे खावू नये असे वाटते , पाणीपुरी कोणाला तरी हाताने भरवावी, एरवी स्वतः साठी भर भरून खरेदी करायचो आता तिच्या साठी करण्यात मजा येत आहे..
एवढे सगळे होवून पण मजा येत आहे पण कोणालाच हे सगळे पटत नाहीये ........कारण काय तर म्हणे लग्न झाल्यवर नवरा बायकोने एकमेकांवरच प्रेम केले पाहिजे.
तसे नाही झाले तर ........................
विचारू नका काय वाटेल ते बोलायला लोक तयार होतात .........
आणि हो हे सगळे बोलणारे ...कभी कभी , कभी अलविदा ना केहना सारखे चित्रपट मोठ्या आवडीने बघतात अगदी मज्जा घेत घेत ....
अर्थात चित्रपटात जे दाखवतात ते अगदीच उथळ असते , बाकी जीवनात तसे काही नसते....वगैरे वगैरे ठरलेल्या कमेंट टाकायला मोकळे
एकदा मोकळा श्वास घेवून बघा ...तुम्हाला समजेल ........भारतातील (मी इथे फक्त अरेंज विवाह बद्दल बोलत आहे) अरेंज विवाह ना मोडण्या मागचे कारण हे कि तो आपण मोडायला तयार नसतो म्हणून...अन्यथा किती जण मनापासून प्रेम करतात जोडीदारावर ....... सवय म्हणून नाही...
परंतु हे समजण्या इतपत आजून आपला समाज मंगळसूत्र मधेच अडकला आहे .......कारण विवाह बंधन हे शरीर बंधन जास्त आहे मनोमिलन कमीच....
थोडेसे काय बर्याच जणांना न पटण्या सारखे आहे ..... पण काय करणार सत्य आहे...
शेवटी काही ओळी गुणगुणत रहावेसे वाटत आहे ...... इन दिनो दिल मेरा मुझसे है केह रहा तू ख्वाब सजा ....तू जिले जरा .......
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment