Monday, April 26, 2010

ओठ आणि डोळे

ओठ आणि डोळे

ओठ जरी अबोल तुझे , डोळे तुझे बोलतात
मनातील गुपित ओठ बघ सारखे लपवतात
ठरवून तू येतेस काही न सांगायचे गुपित
पुन्हा पुन्हा तुझे लबाड डोळे सारखे ते फोडतात

डोळ्यांची भाषा तुझ्या कशी मला कळणार
मिटून घेतेस पापण्या सारख्या मी कसे ते वाचणार
ओठांचे बोल मला कसे कळणार
मुग्ध ते असतात नेहमी , सांग  कधी ते बोलणार

डोळे तुझे एवढे गहिरे का ग
सागराला सुद्धा तळ असतो हे त्यांना कोण सांगणार
ओठ तुझे एवढे मोहक का ग
रत्ने देखील शेवटी फिकी त्या पुढे हे कोण त्यांना समजावणार

डोळे तुझे अबोल जरी बोलतात किती ते
हि भाषा त्यांना सारखी कोण शिकविते
ओठ तुजे किती किती म्हणून बोलतात
शब्द आणि अर्थ लावण्यात माझी आयुषे खर्ची होतात

डोळे आणि ओठ एवढेच मला कळतात
प्रेम दोघे करतात पण वेगवेगळे मांडतात
वेगवेगळे प्रेम जरी भावना एकच असते
मी तुझीच राहीन हीच तर सोप्पी गोष्ट असते

महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...