Monday, March 29, 2010

म्हण कि एकदा तरी

काय  गम्मत आहे बघा, हे सगळे आपण अनुभवतो, निदान मी तरी अनुभवले आहे, खरच असे किती क्षण तुम्ही मनापासून वाटून घेतले आहेत, मी माझ्या कडे हळवे तर तिला गुलाबी दिले आहेत.

म्हण कि एकदा  तरी

त्या दिवशी तू किती सुंदर दिसत होतीस
वाटले तुझ्या डोळ्यात पाहत राहावे
तू लावलेले काजळ तसचे हळुवार पणे
माझ्या हि पापण्यांना लावावे
म्हणून धीर केला आणि पुढे झालो
म्हटलं डोळ्यात डोळे घालून बसू पण नेमकी तू ....... म्हणालीस
राहील मग

त्या दिवशी तुझा हात हातात घेवून बसावेसे वाटत होते
नाजूक ब्रेसलेट एका हातावर,  तर  सुंदर घड्याळ दुसर्या हातावर
वाटले कि घट्ट धरावे तुझे हात आणि कवटाळून घ्यावे
थोडासा धीर करून माझा हात पुढे केला
तुझा हात हातात घेणार एवढ्यात तू .......म्हणालीस
राहील मग

खांद्यावरून सारखी खालती येणारी तुझी ओढणी
तुझा गोरा गोरा खांदा पुन्हा पुन्हा मला बोलवत होता
वाटले कि हळूच ठेवावे माझा हात त्या खांद्यावर
मनाशी स्वप्ने बघत बघत हळू हळू हात पुढे नेला
मी ठेवणार खांद्य्वर एवढ्यात तू परत ....म्हणालीस
राहील मग

साडीमध्ये  उठून दिसणाऱ्या तुझ्या त्या मांड्यांवर माझी नजर गेली
विचार आल सहज कि ठेवू का माझे डोके त्यावर
हरवून जाईन   मग मीही डोळे मिटून राहीन पडून तसाच
विचार जसा आला मनात, गुदगुल्या मलाही झाल्या
डोके हळूच पुढे नेले ठेवणार तुझ्या मांडीत एवढ्यात तू परत.....म्हणालीस
राहील मग

पाठमोरी तुझी आकृती बघून खरा सांगतो मन माझे हेलावले
गोरी गोरी पाठ आणि नाजूक कंबर पाहून हात माझे चाळवले
वाटला सरळ धरावी तुला मागून, घ्यावी मिठीत सारी लाज सोडून
जसा विचार पक्का झाला, थोडा धीर मग माझाही वाढला
हात माझे पुढे झाले, विळखा तुला घालायला तू परत ......म्हणालीस
राहील मग

कळत नव्हते मला तू परत परत तेच का म्हणतेस
तुझ्या मनात तरी नक्की काय आहे
तू मात्र दरवेळेला दिलखुलास हसत होतीस

मी हताश होवून म्हणलो
छे  स्टाचू.....................     बोलले कि  काय करायचे मला आजूनही माहित नाही

पण आसे किती तरी क्षण आजही पास यु ची वाट बघत ताटकळत उभे आहेत
म्हण कि एकदा  तरी पास यु

महेश उकिडवे

Thursday, March 25, 2010

कोण आहे मी तुझ्या साठी...


कालच तिचा मला एस एम एस (SMS ) आला 
थोडाश्या रागाताच तिने मला तो पाठवला 
कोण आहे कोण मी तुझी...

पण  माझ्या साठी तू ....
हळुवार फुंकर आहेस तू 
पानावर राहिलेला शेवटचा थेंब आहेस तू 
समुद्रात सापडलेले शिंपले आहेस तू
पहिल्या पावसात भिजताना होणारा आनंद आहेस तू
वहीतल्या सुकलेल्या गुलाबाची पाकळी आहेस तू 
तू उन्हात मिळणारी सावली आहेस तू 
बोलताना हळूच अडखलणारा शब्द आहेस तू 
गालवर पडलेला पापणीचा केस आहेस तू 
मनात येणारा पहिला विचार आहेस तू 
तू माझा आभास आहेस, प्राण आहेस, श्वास आहेस तू 
पायात काटा गेला कि  होणारी वेदना आहेस तू 
रडू आल्यवार येणारा पहिला हुंदका आहेस तू 
रडून झाले कि फुटणारे पहिले हसू आहेस तू 
चिडलो कि येणारा राग आहेस तू 
झोपलो कि पडणारे  स्वप्न आहेस तू 
सकाळी उठल्यावर येणारा आळस आहेस तू 
आयुष्यातली सोबत आहेस तू

आयुष्य संपताना सोडून जाणारा श्वास आहे तू 

कमाल आहे बुवा या मुलीची एवढे सांगून सुद्धा विचारते 
कोण आहे मी तुझ्या साठी....

महेश उकिडवे





Sunday, March 21, 2010

किती वाट पाहिली होतीस तू ह्या क्षणांची?

अचानकपणे त्याची होणारी भेट, हे त्या प्रत्येकीचे एक स्वप्न असते, तेच स्वप्न प्रत्यक्षात येताना तिच्या मनाची आणि स्वप्नाची हि मांडणी आहे, त्याच्या नजरेतुनी. 
तुम आये तो आया मुझे याद गली में आज चांद निकला,  जख्म ह्या हिंदी सिनेमा च्या गाण्यावरून सुचलेली कल्पना तुमच्या समोर मांडत आहे.
__________________________________________________________________________________


किती  वाट पाहिली होतीस तू ह्या क्षणांची?

येवून तुझ्या घरी न सांगता भेटलीस तू अशी
एकदा झालेली भेट अशी ती  मी विसरू कशी,
नव्हते तुझ्या ध्यानी मनी, तरीही मी असा पुढे उभा
सावरू कशी स्वतःला कि मनाला हा उडाला गीन्ढाल तुझा

कुरळे केस वर मोकळे सोडलेले,हळूच  उडणार्या त्या बटा,
सावरू कुणाला हा प्रश्न, सगळाच पुरता गोंधळ उडाला होता,
बोट तुझे हे फिरत होते केसातून गुंतवत होते एक एक बट
सोडवण्या मी पुढे यावे त्यांना होते का तुझ्या मनात

प्रत्येक श्वास तुझा जणू एक कहाणी सांगत होता
येणार प्रत्येक उसासा जणू एक वेगळा गंध मागत होता
लाजलेली नजर , कि पेटलेले अधर, कि मोकळा श्वास
असे एक नाही अनेक पेंच तुझ्या पुडती कोण तो मांडत होता

नकळत का होईना पण पाऊल एक एक पुढे टाकत येत होतीस तू
लाजेने अशी चूर चूर झालेली, पावलं गणिक तोडीत होतीस सारे बंध तू
शिरुनी माझ्या मिठीत, बांधून तुझ्या बाहुपाशात सोडलेस तू स्वतःला मोकळे
तुझ्या प्रत्येक कृतीने हळूच उलगडले मला पडलेले ते नाजूक कोडे

मधाळ ओठांना तुझ्या स्पर्श तो वेगळा हवा होता
तनुलाही तुझ्या, तो गारवा हवा होता
रोमांचकता  ती रोमा रोमा तुनी तुझ्या वाहत होती
गुंतलेली मने, हळू हळू मोकळी होत होती


गुंतलेली मने मोकळी झाली, उसवलेले श्वास ते मोकळे झाले
बांधलेले गंध आज मोकळे झाले,पाहिलेले स्वप्न आज मोकळे झाले
मोकळे होवूनही सारे जपलेले क्षण पुन्हा पुन्हा तुला विचारू लागले
सांग मला सजणे किती किती  वाट पाहिली होतीस तू ह्या क्षणांची?

महेश उकिडवे

Saturday, March 13, 2010

मी नसे त्यातला हा कांगावा सगळा !!!!

रेशमी सौंदर्य तुझे टिपून, घेत होता तो


उगढ़या तनुवर तुझ्या स्पर्श करीत होता तो



मोहक जिवणीवरती तुझ्या ओठांचे ठसे मांडत होता तो

स्पर्शुनी तुझ्या ओठांना मुक्त होत होता तो



खेळूनी तुझ्या बटांशी हळुवार पणे फुंकर घालत होता तो

उडवून तुझे केस मोकळे, धुंद पणे तुला फुलवत होता तो



खुशाल आपला तुला मिठीत घेत होता तो,

करुनी लगट नको तेवढी तुला लाजवत होता तो



हात त्याचे तुझ्या वक्षी, मांडतो तो कामनक्षी

लपेटून तुझी काया, त्याने खेळ असा मांडला



तुला काही समजायचे आत डाव सगळा संपला

झालीस तू त्याची, गेलीस पुरती ओढली त्याच्या मिठी



हाय मी हे उगढ्या डोळ्याने पहातो, पण करू तरी काय शकतो

तुझे असे वागणे मला कधीच समजत नाही



सगळी सूट त्याला मला मात्र सभ्यतेची बंधने

करून तो होतो मोकळा आम्हाला मात्र सगळी कुंपणे



हाय मी मग माझ्या नशिबाला कोसतो, कशास आलो ह्या जन्माला

त्या पेक्षा चंद्रा तुझा जन्म चांगला, करून च्या करून वर

मी नसे त्यातला हा कांगावा सगळा



महेश उकिडवे

Thursday, March 11, 2010

हे असे का होते सांग ना?

हे असे का होते सांग ना?
 
ओढून घेतलास तू पदर झाकलेस यौवनाला
तरीही तो चंद्र वेडा का लाजतो सांग ना?
 
मिटलेस तू डोळे, लपविलीस  सारी स्वप्ने त्यात
तरीही तो निशिगंध वेडा रात्री फुलतो कसा सांग ना?
 
हलकेच चावून ओठ, दाबलास तू विचार त्यातुनी
तरीही तो केवडा वेडा एवढा गंधित का सांग ना?
 
झोपलीस तू रात्री निशब्ध, न बदलूनी कुसही
तरीही पहाटे पारिजातक कसा फुलला सांग ना?
 
भाव लपवण्यासाठी झाकतेस चेहरा दोन्ही हातानी ,
तरीही तो झरा वेडा अवखळ पणे का धावतो सांग ना?
 
काढून टाकलास तू गजरा, सोडवायला केस मोकळे
तरीही तगरीच्या फुलाला गंध मोगार्यचा कसा सांग ना ?
 
हलकेच उठून तू सकाळी, गेलीस निघुनी दूर,
शब्द माझे संपले, संपला प्रवास, सोडून गेला प्राण,
 
तरीही वेड्या मनात हि धुगधुगी कशी सांग ना?
 
हे असे का होते सांग ना?
 
महेश उकिडवे
 

मी आज पुन्हा मला...

हि त्याची कहाणी आहे, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करण्याचा त्याचा स्वभाव काही जात नाही आणि तिच्या मधून स्वतः ला तो काही मुक्त करू पाहत नाही.सुफी   रचना ज्यांना थोड्या अवगत आहेत त्यांना हि रचना थोडीफार समजू शकेल



मी आज पुन्हा मला....
 
मी आज मलाच पुन्हा एकदा छळंले  
तिच्या मोकळ्या केसात पुन्हा एकदा मलाच माळले
 
मी आज मलाच पुन्हा एकदा धुंध सोडले
तिच्या श्वासात पुन्हा एकदा गंध मोगर्याचे  भरले
 
मी आज मलाच पुन्हा एकदा विसरून आलो
तिच्या  ओठात पुन्हा एकदा मकरंद सांडून आलो
 
मी आज पुन्हा एकदा स्पर्श तिचा जाळून  आलो
तिच्या सर्वांगाला आज एकदा चंदन लपेटून आलो
 
मी आज पुन्हा एकदा स्वतःला चुंबून आलो
तिच्या मिठीत शिरून तिला कवेत घेवून आलो
 
मी आज पुन्हा एकदा जिंकून आलो
तिच्या प्रेमात मी स्वतःला   हरवून आलो
 
महेश उकिडवे

Tuesday, March 9, 2010

तू अशी जवळ रहा सजणे......

हि त्या हळव्या क्षणाची जागा आहे जिथे तो आणि ती जवळ येतात. स्थळ काळ याचे भान उरत नाही, पुढे काय होईल याचा विचार दोघाही करत नाहीत.तिला हवाहवास असणारा तो आणि त्याचा सहवास, त्याला हवी हवीशी असणारी ती आणि तिचा तो श्वास, ह्याची मांडणी आहे.
 
आमचे एक कवी मित्र Dr . अशोक एक कवितांचा थ्रेड चालवतात जिथे सध्या विषय हनिमून हा आहे, त्यांना हि कविता अर्पण.


तू अशी जवळ रहा सजणे......

नको बोलूस आता काही, मी तुझे ऐकणार  नाही
हळुवार क्षणांना ओढून तू नेताना मी फक्त पाहणार नाही

मिसळून श्वासात श्वास , ओढून घेतेस तू मला
ओठानी मग गप्प राहावे असा का हट्ट तुझा

प्रणयाची धुंदी तू दिलेली अशी उतरणार नाही,
बाहुपाशातून माझ्या तुला मी अशी सोडणार नाही

घेता तू मिटून डोळे पाणीदार, विसरतो मी भान
का होतो मी कासावीस हे तुला कधीच  कळणार नाही.

मकरंद ओठावरचा कसा सांडतेस,
हे गुपित मी कोणाला कधी सांगणार नाही.

जवळ अशी तू रहा सजणे मी आणखी काही देवाकडे मागणार नाही
दिले जरी देवाने मला आजूनही काही
उधळून टाकण्या ते सारे मी पुढे मागे पाहणार नाही

तू अशी जवळ रहा सजणे मी आजून काही मागणार नाही

महेश उकिडवे

Monday, March 8, 2010

असा एकांत कधी

असा एकांत कधी 
 
असा एकांत कधी आपण अनुभवला होता का?
तुझ्या मिठीत जीव माझा सांग कधी गुंतला होता का?
 
असा एकांत कधी,  कधी आपल्याशी बोलला होता का?
डोळ्यात डोळे घालून, मांडलेला विचार कधीतरी समजला होता का?
 
असा एकांत कधी आपणाला स्पर्शून गेला होता का?
हात तुझा हातात घेवून, हृदयाला कधी भिडला होता का?
 
असा एकांत कधी आपणाला धुंदीत गेवून गेला होता का?
हळुवार पणे गुंतता ओठात ओठ, मकरंद कधी सांडला होता का?
 
असा एकांत कधी आपणाला हरवून गेला होता का?
मी तुझा, तू माझी होवूनही, वेळ कधी संपला होता का?
 
महेश उकिडवे
 
 

दोनच पावले दूर उभे होतो आपण

थोडा डोक्याला ताणून, विचार केला कि, दोघांची भेट कशी रंगवावी
मग सध्या पार्किंगलॉट, मॉल किंवा ऑफिस मधले आठवले. चला म्हटले तिथेच दोघांची भेट घालून द्यावी
:-)
__________________________________________________________________________________


दोनच पावले दूर उभे होतो आपण
आठवते का कालची पार्किंग मधली भेट?

काल किती जवळून पहिले तुला,  मुग्ध  लब्ध झालो मी
तुझ्या चेहऱ्यावरचा भाव टिपता टिपता भावविभोर झालो मी
तुझ्या ओठांच्या त्या मनमोहक हालचाली हलकेच पाहताना,
धुंदीत जावून चुंबिले त्या अधराना मी,
घेतली मीही मग जवळ ओढून तुला, विसरलीस देहभान  तुही
कळेना तुलाही हा आवेग आला कुठून , कि भागविली  प्रेमाची तहान तुही आपणहून ?
मन तुझे हि मग एवढे धुंद झाले, तोडून लाज पाश सारे
माझ्या मिठीत ते लुप्त झाले.
पार्किंग मध्ये गाडीच्या हॉर्न मुळे धुंदी एकदम उतरली,
कळेना दोघानाही काय झाले, कुठे हरवून गेलो होतो आपण
दोन पावलांचे अंतर दोघातील केन्ह्वाच ओलांडून गेलो होत आपण
महेश उकिडवे

उन्हाळ्याचे गुपित


मला अनेक जणांनी हा प्रश्न विचारला आहे कि, ह्या सगळ्याचे inspiration कोण आहे?
सांगायची गरज नाही माझी बायको, वृषाली. कालचीच गोष्ट आहे, वृषालीने काळ्या रंगाचा नवीन कुर्ता आणला होता त्यावरून एवढे सगळे सुचले



उन्हाळ्याचे गुपित

तुझा काळा कुर्ता आणि वर मोकळे केस  
ओलीचिंब भिजलेली तू आणि थरथर कापणारे ओठ तुझे
वार्याचा प्रत्येक स्पर्श तुला हुडहुडी आणत होता
अंगभर उठलेला शहारा, मला वेड लावत होता
तुझ्या थार्थारणाऱ्या ओठांनी ,सांगितलेली उशिरा येण्याची कारणे
मला काही पटत नव्हती, तरी पण आवडत होती
हळूच घेतला तुझा थरथरणारा हात हातात
यायचे नव्हते तरी आलीस अगदीच जवळ तू
हात सोडवण्याचा प्रत्येक प्रयत्न अगदीच नाजूक होता
माझ्या सारखा डांबिस, थोडाच बधणार होता
हळूच का होएना तुझी चोरटी नजर मला विचारात होती
पुढे काय होईल ह्याचे अंदाज बांधत होती
काही कळायच्या आत तुझा हात मी चुंबिला
तुलाही पावसात भिजल्याचा आनंद मिळाला
गेलीस परत तू निघून पटकन हात सोडवून
विचारत होते सगळे जन
अगं एवढ्या उन्हाळ्यात तू कशी एवढी भिजलेली
कोणाल माहित थोडाच होते,  एका चुंबनाने उघडलेले
उन्हाळ्यातल्या पावसाचे गुपित.....
महेश उकिडवे

Tuesday, March 2, 2010

'सोड नाद माझा'

रात्री बाहेर पडलो, आकाशात पहिले तर


एकही तारा नव्हता कि चंद्र पण नव्हता



पाऊसात भिजावे म्हणून छत्री न घेता फिरायला आलो,

पाऊस पडत होता पण पाणी कुठेच नव्हते



बागेत फिरायला गेलो म्हटले चला फुलांच्या सहवासात राहावे

सगळी कडे फुले फुलली होती पण कोणालाच रंग नव्हते



हळूच मी हृदयावर हात ठेवला, तर काय, धड धड आईकुच येत नव्हती



सगळे म्हणाले काय वेड्या सारखे लिहितो आहे हा? शक्य आहे का कधीतरी असे उगाच आपले ...



पोलीस पंचनामा लिहित होते, बहुधा आत्महत्या असावी,



कारण मोबाईल वर शेवटचा मेसेज आहे 'सोड नाद माझा'



महेश उकिडवे

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...