Thursday, March 11, 2010

मी आज पुन्हा मला...

हि त्याची कहाणी आहे, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करण्याचा त्याचा स्वभाव काही जात नाही आणि तिच्या मधून स्वतः ला तो काही मुक्त करू पाहत नाही.सुफी   रचना ज्यांना थोड्या अवगत आहेत त्यांना हि रचना थोडीफार समजू शकेल



मी आज पुन्हा मला....
 
मी आज मलाच पुन्हा एकदा छळंले  
तिच्या मोकळ्या केसात पुन्हा एकदा मलाच माळले
 
मी आज मलाच पुन्हा एकदा धुंध सोडले
तिच्या श्वासात पुन्हा एकदा गंध मोगर्याचे  भरले
 
मी आज मलाच पुन्हा एकदा विसरून आलो
तिच्या  ओठात पुन्हा एकदा मकरंद सांडून आलो
 
मी आज पुन्हा एकदा स्पर्श तिचा जाळून  आलो
तिच्या सर्वांगाला आज एकदा चंदन लपेटून आलो
 
मी आज पुन्हा एकदा स्वतःला चुंबून आलो
तिच्या मिठीत शिरून तिला कवेत घेवून आलो
 
मी आज पुन्हा एकदा जिंकून आलो
तिच्या प्रेमात मी स्वतःला   हरवून आलो
 
महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...