असा एकांत कधी
असा एकांत कधी आपण अनुभवला होता का?
तुझ्या मिठीत जीव माझा सांग कधी गुंतला होता का?
असा एकांत कधी, कधी आपल्याशी बोलला होता का?
डोळ्यात डोळे घालून, मांडलेला विचार कधीतरी समजला होता का?
असा एकांत कधी आपणाला स्पर्शून गेला होता का?
हात तुझा हातात घेवून, हृदयाला कधी भिडला होता का?
असा एकांत कधी आपणाला धुंदीत गेवून गेला होता का?
हळुवार पणे गुंतता ओठात ओठ, मकरंद कधी सांडला होता का?
असा एकांत कधी आपणाला हरवून गेला होता का?
मी तुझा, तू माझी होवूनही, वेळ कधी संपला होता का?
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment