हि त्या हळव्या क्षणाची जागा आहे जिथे तो आणि ती जवळ येतात. स्थळ काळ याचे भान उरत नाही, पुढे काय होईल याचा विचार दोघाही करत नाहीत.तिला हवाहवास असणारा तो आणि त्याचा सहवास, त्याला हवी हवीशी असणारी ती आणि तिचा तो श्वास, ह्याची मांडणी आहे.
आमचे एक कवी मित्र Dr . अशोक एक कवितांचा थ्रेड चालवतात जिथे सध्या विषय हनिमून हा आहे, त्यांना हि कविता अर्पण.
तू अशी जवळ रहा सजणे......
नको बोलूस आता काही, मी तुझे ऐकणार नाही
हळुवार क्षणांना ओढून तू नेताना मी फक्त पाहणार नाही
मिसळून श्वासात श्वास , ओढून घेतेस तू मला
ओठानी मग गप्प राहावे असा का हट्ट तुझा
प्रणयाची धुंदी तू दिलेली अशी उतरणार नाही,
बाहुपाशातून माझ्या तुला मी अशी सोडणार नाही
घेता तू मिटून डोळे पाणीदार, विसरतो मी भान
का होतो मी कासावीस हे तुला कधीच कळणार नाही.
मकरंद ओठावरचा कसा सांडतेस,
हे गुपित मी कोणाला कधी सांगणार नाही.
जवळ अशी तू रहा सजणे मी आणखी काही देवाकडे मागणार नाही
दिले जरी देवाने मला आजूनही काही
उधळून टाकण्या ते सारे मी पुढे मागे पाहणार नाही
तू अशी जवळ रहा सजणे मी आजून काही मागणार नाही
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment