Tuesday, June 1, 2010

मोक्ष असा देशील का?


मोक्ष असा देशील का?  काय म्हणायचे आहे मला.?????

हि कल्पना तिची म्हणून लिहिली आहे, दूर देशी गेला साजन, आठवण त्याची येते तिला. कधी डोळ्यात पाणी येते तर कधी त्याच्या आठवणीने व्याकूळ होते ती.

तिला ह्या सार्या मधुनी सुटून जायचे आहे.  रोज रोज जळणारा हा विरह एकदा मिटवून टाकायचा आहे.  अशा काहीश्या विचित्र भाव वियोगातून खालील ओळी साकारल्या आहेत.

हलकेच अधून मधून पडणार्या पावसाच्या सरींनी तिला कसे व्याकूळ आणि भेभान केले आहे त्याची हि कथा थोडीशी व्यथा म्हणून मांडली आहे..............................

__________________________________________________________________________________



मोक्ष असा देशील का?

डोळ्यात सांजवेळी आठवणींचे आभाळ दाटलेले
येवून तू अशावेळी साजणा, पाऊस होवून वाहशील का?

वेड्या मानस चाहूल लागते तुझी, होतात भास उगीच का
येवून तू अशावेळी  साजणा, ओल्या काळजाला पाहशील का?

मोहरून गेलीत गात्रे, माळून गजरा उभी  मी उंबरठ्यात 
येवून तू अशावेळी साजणा, स्पर्शुनी माझ्या तनुला जाशील का?

अंग अंग पेटलेले आणि असा हा अवेळी पाऊस कोसळणारा
येवून अशावेळी साजणा, ओला मारवा हा छेडशील का?

हळू हळू ओल्या मिठीत तुझ्या मी कापरापरी जळते
येवून अशावेळी साजणा, फुंकर मारून मला थांबवशील का?

सोडून लाज लज्जा जाळते  मी देह सारा तुझ्या साठी,
येवून अशावेळी साजणा, हा यज्ञ प्रेमाचा पुरा करशील का?

हवीत कशाला आणि कोणाला  मंत्र ,समिधा आणि अग्नीकुंडे....

ओल्या ओठांनी स्पर्शुनी मजला, आगळा वेगळा....

मोक्ष असा देशील का? मोक्ष असा देशील का?

महेश उकिडवे
 

No comments:

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...