Tuesday, June 8, 2010

अशी कशी तू, अशी कशी तू

अशी कशी तू, अशी कशी तू
 
पाडून केस चेहऱ्यावर  का लपवतेस चंद्र तू
सारून केस मागे मग का दाखवतेस चंद्र तू
 
ओढून पदर तुझा का झाकतेस यौवन तू
सोडून वार्यावर पदराला का उधळ्तेस यौवन तू
 
सळसळनार्या कामिनीला का अशी बांधतेस तू
सोडून मग खुली तिला का होतेस दामिनी तू
 
येवून स्वप्नात माझ्या का अशी लाजतेस तू
बेदुंध होवून अशी स्वप्नात स्वतःच्या काय मागतेस तू
 
फुलांचे रंग ओढून का अशी रंगून जातेस तू
फुलांना मग रंग देवून का अशी खुलून जातेस तू
 
मिटून पापण्या का थांबवतेस तो पाऊस तू  
डोळ्यातले पाणी होवून का अशी कोसळतेस तू
 
कधी अशी तर कधी तशी तू , जिकडे तिकडे तूच तू
सांग मला अशी कशी तू, अशी कशी तू
 
महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...