Monday, June 14, 2010

काल आमचे खूप भांडण झाले .....

काल माझे आणि त्याचे जाम भांडण झाले
इतके कि वेळ हाणा मारी पर्यंत गेली
 
तिच्या वरून सारे भांडण झाले
 
तसा मी नेहमी संयमी आणि लाजरा
तो तसा नेहमीच धीट आणि थोडा आगावू
 
त्याला कधीच नव्हती भीड तिला उघड पणे बघण्याची
भीती मला वाटायची तिला चोरून सुद्धा पाहण्याची
 
तिला तसे बघताना याची नजर कधीच नाही चुकायची
तिचे रूप न्याहाळताना माझी नजर मात्र नेहमीच झुकायची
 
तिला हि नव्हती कसलीच चाड, त्याला तसे बघू  द्यायची
ती मला मात्र संयमाची सारी कुंपणे नेहमीच घालायची
 
ती झेलू द्यायची त्याला उडणारे तुषार, तिचे मोकळे केस  
मला साधी फुल माळायला सुद्धा वाट पाहायला लागायची
 
तो निर्लज्ज वेळ काळ सोडून तिला बघत राहायचा
मला मात्र एका दर्शन साठी तासनतास तिष्टत ठेवायची
 
शेवटी मला खूप राग आला त्याचा, अरे असे काय तुझ्यात
जे माझ्यात नाही, एवढा काय तू निराळा जो मला होता येत नाही
 
चिडून  आणि रागावून दिला एक ठोसा त्याला
हाय कर्म माझे तो हसला पण हात माझा रक्त बंबाळ झाला
 
धावून आली ती सगळा प्रकार आईकून,
कळेना तिला काय ह्या वेड्याला पाहावे सांगून
 
ती म्हणाली वेड्या, असा राग का काढतोस,
मी तुझीच आहे नाही कोण्या दुसर्याची हे माहित असूनही
 
माझा आरसा का तोडतोस...
 
महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...