Tuesday, June 1, 2010

प्रेम कशाला म्हणतात तेच हल्ली मला कळत नाही.

प्रेम कशाला म्हणतात तेच हल्ली मला कळत नाही.

तुझ्या ओठांचे ठसे आणि तू दिलेल्या जखमा
मला दोन्ही सारख्याच  वाटू लागल्या आहेत
खुण म्हणा कि व्रण दोन्ही कडे दिसतो
अंतरीचा दाह पण दोन्ही कडे सारखाच उरतो.

तुझी पावलांचे ठसे आणि तुझ्या आठवणी
मला दोन्ही सारख्याच वाटू लागल्या आहेत
हळव्या मनावर छाप तर दोन्ही पाडून जातात
प्रत्येक टप्प्यावर मैलाचा दगड बनून उरतात

आपले  कोवळे क्षण आणि तुझ्या गुंतलेल्या बटा
मला तर पुन्हा दोन्ही सारखेच वाटू लागले आहेत
आठवून सारखे सारखे मला छळू  लागले आहेत
ओल्या मनाला पुन्हा पुन्हा गुंतवू लागले आहेत

तू दिलेली हळवी स्वप्ने आणि तुझी सावली
मला दोन्ही हल्ली सारखीच वाटू लागली आहेत
दोन्ही माझी पाठराखण करू लागली आहेत
दिवसरात्र  दोन्ही  माझी सोबत करू लागली आहेत

अशा सारख्या सारख्या वाटणाऱ्या गोष्टींचा गुंता मला
सोडवता येत नाही.......................
प्रेम कशाला म्हणतात तेच हल्ली मला कळत नाही.

महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...