Monday, June 14, 2010

आता मला आवरा ..........................

 आता मला आवरा   
 
येता पाऊस असा आक्रीत काय काय घडे
सखे तुझ्या माझ्या प्रेमाला आले पुन्हा भरते
 
ओठात ओठ गुंतवून केलेस तू शब्द बंद 
शब्दाविन बोलण्याचा मला जडला न्यारा छंद
 
केस तुझे ओले मोकळे पाठीवरती रुळे
मुग्ध पारिजातक जसा उधळतो गंध चोहीकडे
 
बिलगलो तुझ्या ओल्या पाठी निथळताना तू
सुटण्या ऐवजी गुंतत जाती कशा  बांधल्यास गाठी तू
 
ओल्या बटान  वरती  दिसती पावसाच्या  नाजूक कळ्या
फुलवण्या  त्यांना मज ओठांचा परीस स्पर्श हवा
 
हरवतो केसात तुझ्या जीव माझा बावरा
आला रे आला पाऊस, आता मला आवरा
 
 आता मला आवरा   
 
महेश उकिडवे
 

No comments:

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...