Monday, June 21, 2010

ती च्या मनीची वेदना.............

ती च्या मनीची वेदना लिहिताना, वेगळी प्रेम कहाणी छेडली आहे.........तिचा त्याला होकार आहे. पण तिच्या आणि त्याच्या नात्यातले अंतर खूप वेगळे आहे...त्याने तिला मिळवले तर तिने त्याला दिले.........त्याला ती मिळाली हि भावना गर्वाची, काहीतरी मिळवल्याची, परंतु तिची भावना मात्र सारे काही दिल्याची. प्रेम दोघांचे वेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहे......त्याची सुख संवेदना तिची वेदना आहे.
 
 
ती च्या मनीची वेदना.............
 
तू नाते शोधलेस ते धाग्यात बांधलेले,
मी तेवढी प्रेम विणत होते रेशीम धाग्यातले 
 
तू बंधन मानलेस आपल्या श्वासांना,
मी तेवढी राहात गेले स्पंदन बनून हृदयात तुझ्या
 
तू वचन मागितले माझ्या कडे आयुष्यभराचे
मी तेवढी आयुष्य गुंफत होते तुझी भवती रे
 
तू सुख दुख शोधत होतास डोळ्यात माझ्या
मी दुख तेवढी ते वेचत राहिले पायवाटी  तुझ्या
 
तू शोधत होतास स्वप्ने माझ्या डोळ्यात
मी तेवढी पापण्या मिटून तुलाच साठवत राहिले
 
तुला कधीच जाणीव नव्हती काय माझ्या मनी
शोधलीस तू तुला हवी ती स्वप्ने माझ्या जीवनी
 
तू मागितलास होकार माझा,
परी तुला न कळले कधी मी तेवढी बापडी,
श्वास बनून तुझ्या आसमंती दरवळत राहिले
पणती होवून जीवनी तुझ्या जळत मी राहिले
 
महेश उकिडवे
 
 
 
 

No comments:

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...