हळवेपणा ..........
दाटून कंठ येतो नाव घेता तुझे
आवंढा गिळतो नाव घेताना तुझे
राग रोज वेगळा आळवतो नाव घेताना तुझे
टचकन पाणी येते डोळा पाहता तुला
डबडबतात दोन्ही डोळे पाहुनी तुला
नवनवीन कारणे शोधतात अश्रू बाहेर येण्या पाहता तुला
कापतात ओठ नुसत्या विचाराने तुझ्या
थरथरतात ओठ नुसत्या विचारातून तुझ्या
न बोलणार्या ओठांना कारणच पुरते विचारांचे तुझ्या
का मी आवंढा गिळतो, का कंठ दाटून येतो,
का डबडब ती डोळे, का येते डोळा पाणी,
कापतात का ओठ, थरथरतात उगाचच का
कमालच झाली या हळवेपणाची नको तितका हा का बोलका ...
महेश उकिडवे
ज्ञानोबाच्या, ना तुक्याच्या वंशाचा मी, ना गदिमा, बोरकर, खानोलकर, कुसुमाग्रजांच्या जातीतला मी, ना मी पुलं, शन्ना, वपू च्या पंथातला मी, ना मी गुरु, संदीप च्या जात्कुळातील मी, मग मी कोण? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ह्या ब्लॉग च्या माध्यमातून लिखाण करणार आहे. सदर ब्लॉग हा, कॅपिटल मार्केट, आर्थ-शास्त्र , मानवी संबंध ह्याला समर्पित असेल.
Sunday, May 23, 2010
Thursday, May 20, 2010
आता कशास असे मोकळे सोडणे
फुलून तो मोगरा असा का वागतो,
लुटवून गंध सारा स्वतः का रिता राहतो.
असून पहाटेची लाली तो सूर्य का ग एवढा तापतो,
असूनही शांत तो चंद्र का ग एवढा लाजतो.
भिजवून धरतीला ते आभाळ का ग असे कोरडे
भागवली तहान तरी धरतीचे का ग वेडे मागणे
खवळला तरी अंतरी तो रत्नाकर शांत कसा एवढा
प्रत्येक लाट अंगावरी तरी तो किनारा कसा कोरडा
येवूनही जवळ आपण जवळ का नाही
नेत्रात येवूनही पाणी, ते ओघळत का नाही.
का बरं हे असे न समजणे
गुंतवलेस मला पुरते आता कशास असे मोकळे सोडणे
महेश उकिडवे
लुटवून गंध सारा स्वतः का रिता राहतो.
असून पहाटेची लाली तो सूर्य का ग एवढा तापतो,
असूनही शांत तो चंद्र का ग एवढा लाजतो.
भिजवून धरतीला ते आभाळ का ग असे कोरडे
भागवली तहान तरी धरतीचे का ग वेडे मागणे
खवळला तरी अंतरी तो रत्नाकर शांत कसा एवढा
प्रत्येक लाट अंगावरी तरी तो किनारा कसा कोरडा
येवूनही जवळ आपण जवळ का नाही
नेत्रात येवूनही पाणी, ते ओघळत का नाही.
का बरं हे असे न समजणे
गुंतवलेस मला पुरते आता कशास असे मोकळे सोडणे
महेश उकिडवे
Monday, May 17, 2010
सांग मला अजूनही हे असे कसे
सांग मला अजूनही हे असे कसे
गेलीस तू उठून मधूनच तरी, चांदणे धुंध अजूनही कसे सखी
जाता तू सोडून मजला , वेल जाईचा असा कसा फुलतो सखी
रात्र सरली प्रणयाची तरी , मोगर्याला सुंगंध कसा राहतो
उरत श्वास मागे काही, मोगरा मग का हळू हळू बहरू लागतो
सुटले ओठ ओठातुनी तरी, आग अजुनी का शमेना
पाऊस गेला सांडून प्रेमाचा तरी अंतरीचा दाह का मिटेना
हे असे कसे सांग मला ,उत्तरं नंतर प्रश्न असे का पडतात
सोडवला प्रत्येक प्रश्न तरी उत्तरे हि नवीन प्रश्न मांडतात
सांग मला अजूनही हे असे कसे.
महेश उकिडवे
Sunday, May 16, 2010
बटांचा गुंता
बटांचा गुंता
माझ्या नकळत घेतलेला मजाह हात हातात
मी दिवस भर माझ्या केसातून फिरवत होते
तुझी आठवण म्हणून एक एक बट उगाच सारखी सावरत होते
वेड्या बटा माझ्या उगाच गुंतत होत्या सारख्या
तू काल स्वप्नात आल होतास, आणि ते सुद्धा दिवसा
आठवून मी फिरवत बसले होते बोट केसातून माझ्या
गुंतली एक बट मग आपोआप.
पहिली भेट, त्याच्यावरचा तो गुलाबी कागद मी हळुवार पाहत होते,
अगदी सहज, सहज म्हणून केसात हात फिरवत होते
नकळत एक अल्लड बट पुन्हा गुंतली
तुझ्या बरोबरची पहिली भेट आणि तो पहिला बोसा
आठवून , हलकेच लाजत वळत होते कुशीवर सारखी
गुंतत होत्या अनेक बटा, आठवणीत तुझ्या
आज तू नाहीस जवळी म्हणून मन माझे खट्टू होतोय
येणार तू कधी म्हणून उगाचच सारखी वाट बघतंय
सारखे सारखे केस उडून तोंडावर येतात माझ्या पण पण पण
एकही बट आज गुंतत नाही .....................
नाहीस तू जवळ सजणा म्हणून कि काय
केसात माझ्या माझी बोटे आज काल फिरतच नाहीत..
एकही बट हल्ली गुंतत नाही
महेश उकिडवे
Monday, May 10, 2010
डोळे तुझे .......................
डोळे तुझे .......................
डोळे तुझे किती मोहक, पण खोटं का बोलतात नेहमी
असून प्रेम माझ्यावर वेगळेच नाव सांगतात नेहमी
नाहीत अपेक्षा कि त्यांनी खरे बोलावे नेहमी नेहमी
पण एकदा तरी खोटे टाळून बघावे त्यांनी...........
टाळून एकदा नजर माझी त्यांनी स्वतः कडे पाहावे
लपेटून केस तुझे त्याच्या आडून त्यांनी मज कडे बघावे
कदाचित खरे काय ते बाहेर येईल , अश्रू बनून वाहून जाईल
पण एकदा तरी माझ्या नजरेला टाळून बघावे त्यांनी...
पाहिलं जो माझ्या नजरेने तुला , ती दिवाना होऊन जाईल
चांदण्या काय चंद्र सुद्धा मग लाजून चूर चूर होवून जाईल
बघू नकोस आरशात सारखे सारखे आक्रीत होवून जाईल
तो आरसा देखील प्रेमात तुझ्या माझ्यासारखा विरघळून जाईल..
असे काय हे जीवघेणे डोळे तुझे , कशास त्यांना तू खुले सोडतेस
माझ्या सारखे किती पतंग असे , तू रोज रोज कापतेस...
महेश उकिडवे
Thursday, May 6, 2010
भलते सलते वागणे तुझे ....
भलते सलते वागणे तुझे ....
चांदण्यात फिरताना हळूच हात माझा धरतेस ,
हलकेच माझ्या कानात काहीतरी सांगतेस,
गालातल्या गालात मग खुदकन हसतेस
हल्ली तू भलतेसलते फार वागतेस.....
घरी जाताना नकळत मागे वळून बघतेस,
चेहरा लपवून पापण्यांच्या कडा टिपून घेतस
रुमाल मग मुद्दामून मागे विसरून जातेस,
हल्ली तू भलतेसलते फार वागतेस......
भेटलीस मजला कि अलगद बिलगतेस,
खुशाल आपले ओठ हलकेच चावतेस,
बोटांचे चाळे मग बिनदिक्कत करतेस
हल्ली तू भलतेसलते फार वागतेस......
रुमालाने बांधलेले केस मोकळे सोडतेस
बेधुंध बटाना हि मग खुशाल उधळतेस
मोकळ्या केसात वार्याला बांधू पाहतेस
हल्ली तू भलतेसलते फार वागतेस......
तुझ्या अशा भलत्या सलत्या वागण्याने मग
तो चंद्र, तो रुमाल, ते हास्य, त्या बटा
एवढ्या अनमोल होतात जपून ठेवण्य त्या
माझ्या सारखे अमीर उमराव गरीब होतात
महेश उकिडवे
Wednesday, May 5, 2010
नजर .................
नजर .................
नजर माझी भिरभिरते तुलाच पाहण्यासाठी
का तुला असे वाटे ती भटकते वासनेपाठी
कळत नाही का तुला माझ्या नजरेचे बोलणे
कि सदा आपले मज कडे त्याच दृष्टीने पाहणे
होशील का सदासाठी माझी हे विचारण्यासाठी
नजर माझी भिरभिरते तुलाच पाहण्यासाठी
सजणे करतेस किती बहाणे मला टाळण्यासाठी
आठव एकदा तरी नसतो का मी तिच्यासाठी
गुपचूप येवून भेटते मला जमान्याला टाळण्यासाठी
घेना नजराणा हा नजरेचा केसात माळण्यासाठी
माळ्शील नजर माझी दे हा दिलासा मला जगण्यासाठी
नजर माझी भिर भिरते तुलाच पाहण्यासाठी
नजर माझी येईल स्वप्नी तुला जागवण्यासाठी
मिटून घेशील मला नयनात तुझ्या सदा पाहण्यासाठी
उघडून नयन पाहशील मला खुदकन हसण्यासाठी
नजर कधी होईल कवडसा, फुले, गंध तुला भुलवण्यासाठी
आसवानी टिपशील मला हलकेच स्पर्शण्यासाठी
नजर माझी भिर भिरते तुलाच पाहण्यासाठी
राहील सदा तुझ्या भवती मृत्यू नंतरही तुलाच पाहण्यासाठी
करीन मी तुझी आयुष्य भर साधना नजरेला नजर मिळवण्यासाठी
महेश उकिडवे
Tuesday, May 4, 2010
बहरला असा हा मोगरा .....
माळला मी मोगरा केसात माझ्या धुंद किती मी झाले ,
हरवले स्वप्नात तुझ्या काय काय नाही मी मिळवले,
हळूच येतो वार्यासरशी मोगर्याचा गंध करतो मला वेडे
तूच माझ्या स्वप्नी का येतोस हे कोडे सारखे मला पडे
घातला मी मोगरा वेणीत रुळते ती वेडी माझ्या वक्षी ,
हलकेच माझ्या मनाला ती सांगते तुझ्या गुजगोष्टी
येवून स्वप्नी लावतो तो वेड कसा करतो असा मुग्ध
हरवून जाते मी बापडी उडून जाती मग सारेच लाजबंध
काल तू काय केलेस येवून माझ्या स्वप्नी
कुठे हरवलीत ती काही फुले सांग बघू नक्की
का असे कुस्करलेस, का असे चुरगाळंलेस आम्हाला
चिडून चुरगळलेली फुले संगती कैफियत आम्हाला
त्यांची सुगंधी तक्रार का कोणी ऐकून घेत असते
चुरगळलेल्या फुलांची का कोणाला काळजी असते
हुरहूर किंवा काळजी असते ती उरलेल्या फुलांना
कधीना कधी तीही मोहित होतील ह्याच क्षणांना
चुंबिता तू माझ्या अधराना दिला मी मानेला असा झटका
पाठीच्या आधाराला गेली वेणी ठेवून राग तो लटका
हात तुझा फिरता पाठीवरती , अंग अंग माझे मोहरते
बाकदार त्या कमानिवारुनी एक एक फुल मग ओघळते
घेतलीस तू मिठीत मजला , धुंदीत गेली सारे फुले
आपल्या आवेगा पुढती कोणाचे म्हणून काही न चले
भान मग कोणाला कशाचे, फुलांची परवा कोणा असे
राहतील किती तुटतील किती ह्याचे कोणा वावडे असे
येता बहर तो प्रीतीला फुलेल माझे यौवन देह सारा उमलेल
प्रेमाच्या या बहरा पुढती मोगर्याचा बहर तो कसा मग टिकेल
मखमली आणि रसाळ देहावरती नाव तू तुझे कितीदा कोरशील
मोगर्याला मात्र रात्र रात्र तू असाच बेभानपणे कितीदा छळंशील
नको न येवूस असा स्वप्नी माझ्या , बघ मी हा मोगरा उतरवला
लाजून लाजून वेडा चूर झाला, उमलायचे कसा विसरला
असे काय बरे हे तुझे वागणे , कोण मला काय म्हणेल
सांग मला लाजलेला मोगरा कसा माझ्या अंगणात फुलेल
उगाच काय बर स्वप्नात येवून तुझा हा धीट पणा
जा आता मी बोलतच नाही
सांगितले न तुला मी नाही घालणार मोगरा ,
नाही मी घालणार मोगरा पुन्हा कधी असा......
महेश उकिडवे
Subscribe to:
Posts (Atom)
रांगोळी ...
रांगोळी रंगारी तू माझा , सावळा रंगारी रंग तुझा लेवून सजले मी अंतरी रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...
-
बटांचा गुंता माझ्या नकळत घेतलेला मजाह हात हातात मी दिवस भर माझ्या केसातून फिरवत होते तुझी आठवण म्हणून एक एक बट उगाच सारखी सावरत होते वेड्य...
-
चिंब चिंब भिजताना .... ओले ओले चिंब कपडे, ओले चिंब मन होत होते ओले होते स्वप्न सारे , ओल्या ओल्या पावसातले ओल्या हातात माझ्या तुझा ...
-
मोकळे केस तुझे............ मोकळे सोडून केस , वर तुझे हे असे वागणे जणू मोगार्यालाही वेडावून असे खुले धुंध सोडणे मोकळे सोडून केस, वर तुझे...