माळला मी मोगरा केसात माझ्या धुंद किती मी झाले ,
हरवले स्वप्नात तुझ्या काय काय नाही मी मिळवले,
हळूच येतो वार्यासरशी मोगर्याचा गंध करतो मला वेडे
तूच माझ्या स्वप्नी का येतोस हे कोडे सारखे मला पडे
घातला मी मोगरा वेणीत रुळते ती वेडी माझ्या वक्षी ,
हलकेच माझ्या मनाला ती सांगते तुझ्या गुजगोष्टी
येवून स्वप्नी लावतो तो वेड कसा करतो असा मुग्ध
हरवून जाते मी बापडी उडून जाती मग सारेच लाजबंध
काल तू काय केलेस येवून माझ्या स्वप्नी
कुठे हरवलीत ती काही फुले सांग बघू नक्की
का असे कुस्करलेस, का असे चुरगाळंलेस आम्हाला
चिडून चुरगळलेली फुले संगती कैफियत आम्हाला
त्यांची सुगंधी तक्रार का कोणी ऐकून घेत असते
चुरगळलेल्या फुलांची का कोणाला काळजी असते
हुरहूर किंवा काळजी असते ती उरलेल्या फुलांना
कधीना कधी तीही मोहित होतील ह्याच क्षणांना
चुंबिता तू माझ्या अधराना दिला मी मानेला असा झटका
पाठीच्या आधाराला गेली वेणी ठेवून राग तो लटका
हात तुझा फिरता पाठीवरती , अंग अंग माझे मोहरते
बाकदार त्या कमानिवारुनी एक एक फुल मग ओघळते
घेतलीस तू मिठीत मजला , धुंदीत गेली सारे फुले
आपल्या आवेगा पुढती कोणाचे म्हणून काही न चले
भान मग कोणाला कशाचे, फुलांची परवा कोणा असे
राहतील किती तुटतील किती ह्याचे कोणा वावडे असे
येता बहर तो प्रीतीला फुलेल माझे यौवन देह सारा उमलेल
प्रेमाच्या या बहरा पुढती मोगर्याचा बहर तो कसा मग टिकेल
मखमली आणि रसाळ देहावरती नाव तू तुझे कितीदा कोरशील
मोगर्याला मात्र रात्र रात्र तू असाच बेभानपणे कितीदा छळंशील
नको न येवूस असा स्वप्नी माझ्या , बघ मी हा मोगरा उतरवला
लाजून लाजून वेडा चूर झाला, उमलायचे कसा विसरला
असे काय बरे हे तुझे वागणे , कोण मला काय म्हणेल
सांग मला लाजलेला मोगरा कसा माझ्या अंगणात फुलेल
उगाच काय बर स्वप्नात येवून तुझा हा धीट पणा
जा आता मी बोलतच नाही
सांगितले न तुला मी नाही घालणार मोगरा ,
नाही मी घालणार मोगरा पुन्हा कधी असा......
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment