Thursday, May 20, 2010

आता कशास असे मोकळे सोडणे

फुलून तो मोगरा असा का वागतो,
लुटवून गंध सारा स्वतः का रिता राहतो.

असून पहाटेची लाली तो सूर्य का ग एवढा तापतो,
असूनही शांत तो चंद्र का ग एवढा लाजतो.

भिजवून धरतीला ते आभाळ का ग असे कोरडे
भागवली तहान तरी धरतीचे  का ग वेडे मागणे

खवळला तरी अंतरी  तो रत्नाकर शांत कसा एवढा
प्रत्येक लाट अंगावरी तरी तो किनारा कसा कोरडा

येवूनही जवळ आपण जवळ का नाही
नेत्रात येवूनही पाणी, ते ओघळत का नाही.

का बरं हे असे न समजणे
गुंतवलेस मला पुरते आता कशास असे मोकळे सोडणे

महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...