Wednesday, May 5, 2010

नजर .................

नजर .................
 
नजर माझी भिरभिरते  तुलाच पाहण्यासाठी
का तुला असे वाटे ती भटकते वासनेपाठी
कळत नाही का तुला माझ्या नजरेचे बोलणे
कि सदा आपले मज कडे त्याच दृष्टीने पाहणे
होशील का सदासाठी माझी हे विचारण्यासाठी

नजर माझी भिरभिरते तुलाच पाहण्यासाठी
 
सजणे करतेस किती बहाणे मला टाळण्यासाठी
आठव एकदा तरी नसतो का मी तिच्यासाठी
गुपचूप येवून भेटते मला जमान्याला टाळण्यासाठी
घेना  नजराणा हा नजरेचा केसात माळण्यासाठी
माळ्शील नजर माझी दे हा दिलासा मला जगण्यासाठी

नजर माझी भिर भिरते तुलाच पाहण्यासाठी
 
नजर माझी येईल  स्वप्नी तुला जागवण्यासाठी
मिटून घेशील मला  नयनात तुझ्या सदा पाहण्यासाठी
उघडून नयन पाहशील मला खुदकन हसण्यासाठी
नजर कधी होईल कवडसा, फुले, गंध तुला भुलवण्यासाठी
आसवानी टिपशील मला हलकेच स्पर्शण्यासाठी

नजर माझी भिर भिरते तुलाच पाहण्यासाठी
 
 
राहील सदा तुझ्या भवती  मृत्यू  नंतरही तुलाच पाहण्यासाठी
करीन मी तुझी आयुष्य भर साधना नजरेला नजर मिळवण्यासाठी
 
महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...