Monday, May 17, 2010

सांग मला अजूनही हे असे कसे

सांग मला अजूनही हे असे कसे
 
गेलीस तू उठून मधूनच तरी, चांदणे धुंध अजूनही कसे सखी
जाता तू सोडून मजला , वेल जाईचा असा  कसा फुलतो सखी
 
रात्र सरली प्रणयाची तरी , मोगर्याला सुंगंध कसा राहतो
उरत श्वास मागे काही, मोगरा मग का हळू हळू बहरू लागतो
 
सुटले ओठ ओठातुनी तरी, आग अजुनी का शमेना
पाऊस गेला सांडून  प्रेमाचा तरी अंतरीचा दाह का मिटेना
 
हे असे कसे सांग मला ,उत्तरं नंतर प्रश्न असे का पडतात
सोडवला प्रत्येक प्रश्न तरी उत्तरे हि नवीन प्रश्न मांडतात
 
सांग मला अजूनही हे असे कसे. 
 
महेश उकिडवे
 
 
 

No comments:

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...