भलते सलते वागणे तुझे ....
चांदण्यात फिरताना हळूच हात माझा धरतेस ,
हलकेच माझ्या कानात काहीतरी सांगतेस,
गालातल्या गालात मग खुदकन हसतेस
हल्ली तू भलतेसलते फार वागतेस.....
घरी जाताना नकळत मागे वळून बघतेस,
चेहरा लपवून पापण्यांच्या कडा टिपून घेतस
रुमाल मग मुद्दामून मागे विसरून जातेस,
हल्ली तू भलतेसलते फार वागतेस......
भेटलीस मजला कि अलगद बिलगतेस,
खुशाल आपले ओठ हलकेच चावतेस,
बोटांचे चाळे मग बिनदिक्कत करतेस
हल्ली तू भलतेसलते फार वागतेस......
रुमालाने बांधलेले केस मोकळे सोडतेस
बेधुंध बटाना हि मग खुशाल उधळतेस
मोकळ्या केसात वार्याला बांधू पाहतेस
हल्ली तू भलतेसलते फार वागतेस......
तुझ्या अशा भलत्या सलत्या वागण्याने मग
तो चंद्र, तो रुमाल, ते हास्य, त्या बटा
एवढ्या अनमोल होतात जपून ठेवण्य त्या
माझ्या सारखे अमीर उमराव गरीब होतात
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment