Sunday, May 23, 2010

हळवेपणा ..........

हळवेपणा ..........

दाटून कंठ येतो नाव घेता तुझे
आवंढा गिळतो नाव घेताना तुझे
राग रोज  वेगळा आळवतो नाव घेताना तुझे

टचकन  पाणी येते डोळा पाहता तुला
डबडबतात दोन्ही डोळे पाहुनी तुला
नवनवीन कारणे शोधतात अश्रू  बाहेर येण्या पाहता तुला

कापतात ओठ नुसत्या विचाराने तुझ्या
थरथरतात ओठ नुसत्या विचारातून तुझ्या
न बोलणार्या ओठांना कारणच पुरते विचारांचे तुझ्या

का मी आवंढा गिळतो, का कंठ दाटून येतो,
का डबडब ती डोळे, का येते डोळा पाणी,
कापतात का ओठ, थरथरतात उगाचच का

कमालच झाली या हळवेपणाची नको तितका हा का बोलका ...

महेश उकिडवे

No comments:

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...