Monday, July 21, 2014

पहिला पाऊस

पहिला पाऊस 

पहिला पाऊस काय पडला आणि तिची अवस्था काही विचारू नका. सगळे आपले भिजले पहिल्या पावसात तर हि आपली उभी उंबरठ्यात , त्याची वाट पाहात. अहो पण वाट कोणाची पाहात उभी आहेस विचारले तिला? तर म्हणे जावूदे ग माहित आहे त्याला. जिथे सगळी दुनिया पहिल्या पा
वसाची मज्जा लुटत आहे, तिथे हि आपली बसली आहे तिष्ठत. इतके दिवस बरे चालले होते. पाऊस नव्हता त्यामुळे होणार्या लाही लाही मध्ये काहीच सुचत नव्हते. आता मात्र तसे नाही, पाऊस पडून गेला कि म्हणे उन्हाळ्यात लागलेले वणवे शांत होतात. इथे तर चित्र वेगळेच दिसते आहे. तो पाऊसच इथे वणवा पेटवतो आहे. घ्या आता...

पहिला पाऊस हा काही नेहमी सुखद असेलच असे नाही....तर तिच्या मनीची वेदना त्या पहिल्या पावसात तरी त्याला कळेल का ? त्या बाहेर भिजणाऱ्या तिच्या सख्यांना तरी समजेल का? 

साजण माझा दूरदेशी...उभी मी उंबरठ्यात काय करील हा पाऊस असा बरसून...
कळेल का त्याला माझ्या मनीची व्यथा, कि पुन्हा हा बहार असाच ओसरून जाईल ???
सांगू कशी मी त्याला भावना मनीच्या, शब्दानाही असतात मर्यादा कधी ओठांच्या ...

मग तिचीही अवस्था त्या अनारकली सारखी होते , पहिल्या पावसात ती पुटपुटते ..

इस इंतज़ार -ए -शौक को जन्मों की प्यास है 
इक शमा जल रही है , तो वो भी उदास है 
मोहब्बत ऐसी धड़कन है , जो समझाई नहीं जाती 
जुबां पर दिल की बेचैनी , कभी लायी नहीं जाती



Tuesday, January 21, 2014

सांग ना काय होणार …सकाळी सकाळी

सांग ना  काय होणार …सकाळी सकाळी

मिश्किल डोळे ,गोड हसून गाली ,
आली सांगत काही, पहाट  गुलाबी
लावून वेगळ सूर, दावते आगळा नूर
सांग ना  काय होणार …सकाळी सकाळी

त्या गुलाबी सकाळी ,
मदहोश गंधत नाहलेली
माझ्या बाहुपाशात
थोडीशी जागी कि झोपलेली
सांग कधी मिळणार ??

आठवणीच्या पलीकडली ती
माझ्या ओंजळीत अलगद
सांडलेली  ती कळी
सांग कधी उमलेल का?

ते काळे आभाळ होते कि
डोळ्यातील काजळ माझे
नजरेच्या सुरईतून शिंपडलेले
ते अमृत दव  होते…

तिला म्हणू मी अमृताची धार
कि मरुतलातील  संजीवनी
ओष्ठी माझ्या लागली जरी
तृष्णा पुरी करेल का ?

एक थेंब तुझ्यासाठी
२२ जानेवारी २०१४ 

Saturday, January 18, 2014

चव्वनी के चाँद का इंतजार



किस्मत मुझे तुझसे दूर दूर खीच रही थी.…
दिल उतनाही पास ले आ रहा था........


दिल और किस्मत के बीच के फासले शायद
कयामत तक लम्बे है

इंतजार का मतलब शायद कुछ  और हि होता है ………
खाली  हाँथ शाम फिर  एक बार आयी है.……

शायद हथेली पे उसके फिरसे एक डूबताहुआ
सूरज  …


चव्वनी के चाँद का इंतजार कर रहा है

एक थेंब तुझ्यासाठी

Thursday, January 9, 2014

आस वेड्या मनाची




आताच सर पावसाची बेभान बरसून गेली
झाले काही क्षण ओले , निसरड्या जाणीवा ,
तशातच तोल अधरांचा ढाळून ती गेली
भिजवून चिंब  मनाला ती हुरहूर होवून गेली….

आताच सर पावसाची बेभान बरसून गेली
पूर अनामिक भावनांचा , उरी उसळते लाट
तशातच वेस लज्जेची  ती ओलांडून गेली
भिजवून चिंब  मनाला ती स्पंदन होवून गेली

आताच सर पावसाची बेभान बरसून गेली
बेभान सुटलेले श्वास, धुंध वेगळीच आली
तशातच बंधनाची सारी कडी तोडून गेली ,
भिजवून चिंब  मनाला ती माझीच होवून गेली….

वैशाख वणव्यात असा एकांती
वाट बघतो मी अशा बेभान सरींची
एकद तरी पुन्हा बरसावी …….
आस वेड्या मनाची ……………

एक थेंब तुझ्यासाठी
१० जानेवारी  २०१४



Sunday, January 5, 2014

महागाई महागाई म्हणजे काय?

महागाई महागाई म्हणजे काय?

वस्तूंच्या भावात जेन्ह्वा एक चढता आलेख दिसू लागतो त्या चढ्या आलेखाचे नाव महागाई  होय. अशी महागाई हि काही ठराविक अशा वस्तूंच्या ठोकळ भावांशी निगडीत असते. महागाई हि तशी कोणालाच नको असलेली परंतु अर्थशास्त्रात अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. खरे सांगायचे तर महागाई नसेल तर विकसित  आणि विकसनशील राष्ट्रात लोक सुखीच राहू शकणार नाहीत. हे म्हणजे औषध कडू असते पण ते आवश्यकच असते अशा प्रकारात मोडते. परंतु हेच औषध जरा जास्त झाले कि प्राण जातो हि वस्तुस्तिथी आहे हे नाकारून चालणार नाही.

ह्या बाबत एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते ..अमेरिकेच्या काही प्रांतानमध्ये आजही रेड इंडिअन लोकांची वस्ती आहे , जे लोक थंडीची चाहूल लागली कि लगेच सर्पणा करिता लाकूड गोळा करू लागतात. वर्षा नु वर्षाच्या अनुभवाच्या आधारे त्या रेड इंडिअन टोळीचा म्होरक्या हे ठरवतो कि ह्या वर्षी थंडी किती पडेल आणि तिला तोंड द्यायचे तर किती लाकूड फाटा जवळ असावा. अगदी साधे गणित आहे, जास्त लाकूड फाटा जास्त थंडी,  कमी लाकूड फाटा कमी थंडी. 
एकदा , ह्या रेड इंडिअन टोळीचा म्होरक्या काही कारण साठी सुट्टीवर होता आणि त्या टोळीची सूत्रे एका नव्या ( आय टी वाल्या) दमाच्या तरुण कडे होती. हा तरुण पारंगत होता पण अनुभव समृद्ध नव्हता. जस जशी थंडीची चाहूल लागू लागली टोळीतले लोक विचारू लागले या वर्षी किती लाकडे जमवायची? ह्या पाठ्य्याने अमेरिकेच्या हवामान खात्याची वेब साईट उघडून पहिले कि त्यांचे काय भाकीत आहे. तिथे त्याला तसे काहीच दिसले नाही म्हणून त्याने सांगितले कि जमवायला हरकत नाही लाकडे पण हळू हळू जमवा. काही दिवसांनी पुन्हा लोक विचारू लागले आता काय करायचे, ह्याने पुन्हा तोच उद्योग केला वेब साईट उघडून पहिली आणि सांगितले थंडी हळू हळू वाढत आहे, आता लाकडे जोरात जमवा...  काही दिवसांनी पुन्हा टोळी वाली लोक त्याच्या जवळ आली आणि म्हणाली....आता काय करायचे ह्यांनी पुन्हा वेब साईट उघडून बघितली आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला  त्यात लिहिले होते ...रेड इंडिअन जमातीची लोके जोमाने लाकडे गोळा करत आहेत म्हंजे ह्या वर्षी हि जोरदार थंडीची अपेक्षा करायला हरकत नाही...

आहे कि नाही गम्मत...

असेच काहीसे  महागाई आणि तिच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचे आहे...जो तो दुसर्या कडे बोट दाखवून महागाई चा बागुलबुवा उभा करतो...सरते शेवटी हाच बागुलबुवा खरा राक्षस होवून तुम्हा आम्हला खावून टाकतो...

उगाच नाही पिपली लाइव मध्ये महागाई ला डायन म्हणजे राक्षाशिनीची  ची उपमा दिली आहे   हा हा हा ...

पाऊस बाहेर पडतो ...

पाऊस बाहेर पडतो ...

तुझ्या मोकळ्या केसांखाली, गोर्या खांद्याच्या जरा वर 
मानेवरती ...कानाच्या मागे....काही विसरलो आहे ...
घेवू का टिपून ते क्षण जे अजून किंचित ओले आहेत...

तुझ्या कंचुकीच्या आत, तुझ्या डौलदार वक्षानवरती,
त्या खोलदार घळीत, मधेच काही  राहिले आहे
घेवू का ते क्षण टिपून जे अजून किंचित ओले आहेत

तुझ्या साडीच्या निर्यांमध्ये, तुझ्या कामाक्षी कमरेवरती,
त्या नाभीच्या जरा खाली, ओटीपोटावर....काही राहिले आहे
घेवू का ते क्षण टिपून जे अजून किंचित ओले आहेत

असे ओले ओले क्षण टिपता , मी ओला चिंब झालो.
पाऊस पडतो बाहेर मी आतल्या आताच पुरता भिजून गेलो

एक थेंब तुझ्यासाठी 

Thursday, November 28, 2013

कबरीला हि सुगंध असतो .....


घेवून उशाशी मोगरा तू अशी निजलीस का
जाळून आठवणीना तू अशी थिजलिस का

स्वप्नात रंगुनी रातराणी कोमेजलीस का
तरीही जहालेल्या चुकांना माळतेस  का?

उगीच जुन्या जखमांना तू कुरवाळतेस का
रुतून बसलेल्या खुणांना उरात सांभाळतेस का

कबरीवरच्या मातीला सुगंध असतो
बघ तुला पटते का?


एक थेंब तुझ्यासाठी
29 NOV 2013 

Tuesday, November 26, 2013

सांग सये ते देशील का?



मौनात तुझ्या मी अर्थ शोधलेले
ओठांवरती तुझ्या मी कोरलेले
सांग सये ते
बोल काही देशील का ?

हलकेच तेन्ह्वा सापडलेले
वाहताना लोचनी मी टिपलेले
सांग सये  ते
मोती मला देशील का?

धुंध प्रीतीने  मन बावरलेले
गंध होवून तुला बिलगलेले
सांग सये  ते
अत्तर मला देशील का ?

आभाळ सारे कोसळलेले
हलकेच तनुस बिलगलेले
सांग सये ते
थेंब  मला देशील का ?

सांग सये ते देशील का?
सांग सये ते देशील का?

एक थेंब तुझ्यासाठी
२७ नोव्हेंबर २०१३


निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा

रोज रोज का असे श्वासांचा पहारा
रोम रोमातुनी उठे हा नवीन शहारा
कातर वेळीस का हा फुलतो निखारा
निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा

थकलो मी उगाळून संयमाचे वेढे
देवून जाहले उसने अवसान काढे
सोडून उसासे मोजले रोजचेच पाढे
निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा ….

सुगंधी स्वप्नाची नशा मैफिलीला
गुंतनार्या बटांची साथ सोबतीला
उधळतो मग मोगरा संगतीला
निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा ….

एक थेंब तुझ्यासाठी
२७  नोव्हेंबर २०१३ 

Saturday, October 19, 2013

श्वास असा रोखतेस का ???



सुटून गेला हात जरी
तरी नाते कधी संपेल का
सोडून गेली वेळ तरी
आठवण कधी थांबेल का ?
विरून गेली लाट किनारी ,
गूज तिची मिटली का?
येवून गेले किती पावसाळे ,
तृष्णा कधी शमली का ?
मग आजच का अट्टाहास हा,
जाताना धरलास हात का?
गेले बोलून डोळे सारे ,
मग शब्दांची वाट पाहतेस का ?
थांब अजून पळभर सख्या ……म्हणून …
श्वास असा रोखतेस का?……

एक थेंब तुझ्यासाठी
२० ऑक्टोबर  २०१३ 

Thursday, October 17, 2013

भेटेल का ग सजण मला …

भेटेल का ग सजण मला …

पहाट अबोली, स्वप्न लोचनी ,
असे गुंफलेले , सोडले अधर,
नाद हा खुळा ,मग उगी लागला
सांग सये ……
भेटेल का ग सजण मला

ओल्या दिसाची, वाट कोवळी,
अशी कातरलेली, सोडली मिठी
गंध हा देही , मग भासे वेगळा ,
सांग सये ……
भेटेल का ग सजण मला

धुंद रातीला, कुंद प्रीतीचा
असा सुवासिक, सोडला अंबाडा,
बुडू लागला ,बघ प्राण खुळा,
सांग सये ….
भेटेल का ग सजण मला

(एक थेंब तुझ्यासाठी )
१७ ऑक्टोबर २० १ ३

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...