सुटून गेला हात जरी
तरी नाते कधी संपेल का
सोडून गेली वेळ तरी
आठवण कधी थांबेल का ?
विरून गेली लाट किनारी ,
गूज तिची मिटली का?
येवून गेले किती पावसाळे ,
तृष्णा कधी शमली का ?
मग आजच का अट्टाहास हा,
जाताना धरलास हात का?
गेले बोलून डोळे सारे ,
मग शब्दांची वाट पाहतेस का ?
थांब अजून पळभर सख्या ……म्हणून …
श्वास असा रोखतेस का?……
एक थेंब तुझ्यासाठी
२० ऑक्टोबर २०१३
No comments:
Post a Comment