Thursday, January 9, 2014

आस वेड्या मनाची




आताच सर पावसाची बेभान बरसून गेली
झाले काही क्षण ओले , निसरड्या जाणीवा ,
तशातच तोल अधरांचा ढाळून ती गेली
भिजवून चिंब  मनाला ती हुरहूर होवून गेली….

आताच सर पावसाची बेभान बरसून गेली
पूर अनामिक भावनांचा , उरी उसळते लाट
तशातच वेस लज्जेची  ती ओलांडून गेली
भिजवून चिंब  मनाला ती स्पंदन होवून गेली

आताच सर पावसाची बेभान बरसून गेली
बेभान सुटलेले श्वास, धुंध वेगळीच आली
तशातच बंधनाची सारी कडी तोडून गेली ,
भिजवून चिंब  मनाला ती माझीच होवून गेली….

वैशाख वणव्यात असा एकांती
वाट बघतो मी अशा बेभान सरींची
एकद तरी पुन्हा बरसावी …….
आस वेड्या मनाची ……………

एक थेंब तुझ्यासाठी
१० जानेवारी  २०१४



No comments:

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...