मौनात तुझ्या मी अर्थ शोधलेले
ओठांवरती तुझ्या मी कोरलेले
सांग सये ते
बोल काही देशील का ?
हलकेच तेन्ह्वा सापडलेले
वाहताना लोचनी मी टिपलेले
सांग सये ते
मोती मला देशील का?
धुंध प्रीतीने मन बावरलेले
गंध होवून तुला बिलगलेले
सांग सये ते
अत्तर मला देशील का ?
आभाळ सारे कोसळलेले
हलकेच तनुस बिलगलेले
सांग सये ते
थेंब मला देशील का ?
सांग सये ते देशील का?
सांग सये ते देशील का?
एक थेंब तुझ्यासाठी
२७ नोव्हेंबर २०१३
No comments:
Post a Comment