पुन्हा कोणीतरी फसवले होते.................
तुळशीची कथा आणि व्यथा, एका प्रेयसीच्या रुपात मांडण्याचा प्रयत्न आहे हा. एवढेच सांगायचे आहे कि तिचे जीवापाड प्रेम त्याच्या चाहुलीने आंधळे होते, सगळे काही विसरून ती त्याची होते. लक्षात येते तेन्ह्वा भलतेच काहीतरी घडलेले असते.......
मनाची लाही लाही, अंगाचा दाह होत होता
व्याकुळता तिची पाहून तोहि वेड्यासारखा कोसळत होता
वाटे तिला पावसाळा दारी तिच्या आला होता
तिला भिजवून आस मनीची पूर्ण करत होता
थेंब थेंब तिच्या तनुवरून ओघळत होते
लाज लज्जा सोडून सगळी कडे धावत होते
थेंबा थेंबा ने ती आणखीनच खुलत होती
ओली कळी जणू फुल बनून हसत होती
आभाळ फाटलेले तो तसाच बरसतच होता
इतक्या दिवसांचा विरह सगळा पूर्ण करत होता
ती हि खुशाल त्याला अंगभर नाचवीत होती
सुंदरतेची वीजच ती खुशाल ढगांशी खेळत होती
इतक्यात तिला कळेना असे काय झाले होते
आल्यासारखा निघून गेला तो क्षणात सारे संपले होते,
पुन्हा कसे धरतीला कोरडे कोरडे वाटू लागले होते
ओल्या अंगणात पुन्हा विरहाचे उन सांडले होते
मग मघाशी झाले ते काय होते,
असे अचानक कोण आले होते
वाट ज्याची पाहत होती तो तर साक्षात आला होता ?????
हाय रे तो भ्रम तिचा तिलाच फसवून गेला होता
पडलेला पाऊसच होता न? कि कोण होता?
पाऊस पाऊस म्हणून वळवाच्या पावसाने
ऐन वेळेला डाव वेगळा साधला होता
वळवाचा तो पाऊस आकाशातून तिला बघत होता
चिंब भिजलेली पाहून तिला तो तसाच थिजला होता
तिचे भिजलेले मन मात्र कातर झाले होते
सखा सखा म्हणून त्या पवित्र तुळशीला
पुन्हा एकदा कोणीतरी फसवले होते
महेश उकिडवे